टॉप न्यूजदेश - विदेशसोशल

सोलापुरात गडीनाड कन्नड संमेलनाचे आयोजन!

सोलापुरात गडीनाड कन्नड संमेलनाचे आयोजन!

दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल

सोलापूर । कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण बैंगलोर आणि न्यासा मानव विकास संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवस्मारका येथे गडीनाड काड सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता मंलिकार्जुन मंदिर ते शिवस्मारक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्‌द्घाटन प. पू. श्रीकाशी जगद्‌गुरु डॉ. मल्लिकार्जुन विचाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणगंडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक सौ. दीपा मुधोळमुंडे, बेंगलोरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजशेखर मठपती, उद्योजक बिनोद दसनी, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे प्रो-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्द्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान श्री. सोमण्णा बेविनमरद (अध्यक्ष- कर्नाटक गड़ी प्रदेश अभिवृद्धी प्राधिकरण, बेंगलोर) आणि श्री. प्रकाश मत्तीहळ्ळी (कार्यदर्शी) हे भूषविणार आहेत.

या संमेलनामध्ये स्वरयोगिनी साधना योगलक्ष्मीजी, मुंबई ग्राचे “बचन अनुभुती” हा आध्यात्मिक सगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यांचे ६४ म्युझिकल अल्बम्स न्यासा मानव विकास संशोधन केंद्राने रिलिज केली आहेत. डॉ. राजशेखर मठपती, बेंगलोर यांच्या “गडीनाड कन्नड साहित्य संस्कृती समस्या” या विशेष उपन्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानतर कु. अनिता काराजेनगी यांचे “सोलापूर जिल्ह्यातील वचन साहित्य” या विषयाचर प्रबच्चन होईल. त्यानंतर डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी यांचे “सोलापूर जिल्ह्यातील संत साहित्य” वा विषयावर विवेचन होईल. त्यानंतर डॉ. शिवानंद तडवळ यांचे “सोलापुरातील आधुनिक कन्नड साहित्य” या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर डॉ. सुजाता शास्त्री यांचे “सोलापुर जिल्ह्यातील भाषा व संस्कृती” या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी २ ते ४ या वेळेत “बहुभाषिक कधीगोष्टी” सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक सत्रात शंकरलिंग महिला मंडळ, सोलापूर यांचे “अमर ज्योती अक महादेवी था विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी बचन नृत्य, भरतनाट्यम्, जानपद गीतगायन करणार आहेत.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने कन्नड भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण बंगलोरचे प्रकाश मसीहल्ली, न्यासा मानव विकास संशोधन केंद्राचे प्रा. रवीकुमार सोलापुरे, भीमाशंकर हुबळी, विनोद दुधनी, मीना बागलकोटी, रूपा स्वामी, सुनिल सोलापुरे, — आदी उपस्थित हो

[gspeech-button]

 

>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात आहे .

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button