शरणगाथा क्रमशा.40

शरणगाथा क्रमशा.40
भक्ती वा सामाजिक ढोंगावर भाष्य करणाऱ्या वचनांपेक्षा जीवनानुभावावर भाष करणारी वचने प्रभुदेवांनी अधिक लिहिली आहेत. मराठी भक्ती संप्रदायाती भारुडांप्रमाणे प्रभुदेवांनी रोजच्या जगण्यातील घटनांवर भाष्य केले. शरीर, मन मनाची अस्थिरता, काम-क्रोधादी षड्रिपू, वात्सल्य, करुणा, दया आणि आपण सा ईश्वराची लेकरे नव्हे तर ईश्वराचेच रूप अशा सर्वस्पर्शी विषयांचे मुक्त चिंतन करताः दिलेल्या समर्पक उपमा, वापरलेली रुपके, म्हणी सारेच विलोभनीय. अशी वचः ‘बेडगीन वचन’ म्हणून ओळखली जातात. प्रभुदेवांच्या वचनांत अशा वचनांचे प्रमा अधिक आहे. こ a
शरणांना काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद-अहंकार नाही, मत्सर नाही, भूक नाही, तहान नाही, विषय-वासना नाही, सांसारिक बंधने नाहीत, पुण्य-पापाची चौकट नाही आणि आचार-अनाचारची वांझोटी चर्चा नाही, असे सदाचार संपूर्ण तुझे शरण पाहा गुहेश्वरा. (समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक १०७८)
शरणांच्या सदाचारावर प्रभुदेवांनी विश्वास व्यक्त केला आहे. शरण हे सदाचार असून सुख दुःखापासून अलिप्त असल्याचे प्रभुदेव सांगतात.
ईश्वर हा परमसुखाचा दाता आहे. त्याला अन्योन्यभावाने शरण गेल्यास जीव मंगलमय होईल, याची कल्पना असूनही आशा, लालसा, विषय-वासनेमुळे कोटी कोटींचे बळी गेले. मात्र आपल्या गुहेश्वरांच्या चरणी समर्पण भावनेने शरण आलेल्यप्र कुणाला मी पाहिले नाही, अशी खंत प्रभुदेव व्यक्त करतात.
आशेमुळे बळी गेले कोटी-कोटी, लालसेमुळे बळी गेले कोटी-कोटी, संपत्तीमुळे बळी गेले कोटी-कोटी, स्त्री वासनेने बळी गेले कोटी कोटी,
प्रभु गुहेश्वरा आपल्यासाठी बळी गेलेले कुणी मला दिसले नाहीत.
(समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक ९१)
बसवण्णांचा लौकिक ऐकून त्यांना भेटण्याच्या ओढीने सिद्धरामेश्वरांना सोब घेऊन प्रभुदेव कल्याण नगरीला आले. बसवण्णांबद्दल जे काही ऐकून आनंद झाल त्याहून कैक पटीने अधिक आनंद त्यांना कल्याण नगरीत पोहोचल्यानंतर झाला नि इतर शरणांप्रमाणे बसवण्णांचा प्रभुदेवांवर मोठा प्रभाव आहे. प्रभुदेवांच्या उपलब्ब
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




