सत्यशोधकाचे अंतरंग

🟡🟡🟡🟡सत्यशोधकाचे अंतरंग
अमरावती इंद्रभुवन थिएटरात दुसरी सत्यशोधक व-हाड प्रांतिक परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. आंबेडकरांनी भूषविले होते.* 💐💐💐💐💐💐💐💐
१३ व १४ नोव्हेंबर १९२७ रोजी माधोराव त्रिभुवन आणि विदर्भातील सत्यशोधकांनी अमरावती येथील बुधवार पेठेतल्या भाजीपाला मार्केट परिसरातील
इंद्रभुवन थिएटरात दुसरी व-हाड प्रांतिक परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. आंबेडकरांनी भूषविले होते. या परिषदेत सत्यशोधक विदर्भ केसरी डॉ. पंजाबराव देशमुख, सिरसगावबंडचे सत्यशोधक काशीराव बापूजी देशमुख, मोशींचे सत्यशोधक अॅड. नानासाहेब अमृतकर, मोर्शीचे जहाल सत्यशोधक श्यामराव गुंड, अचलपूरचे भगवानराव पाटील, आर्वीचे सत्यशोधक दलपतसिंह चौहान, फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील, संपतराव गणपतराव नाईक, अॅड. बी. व्ही. चौबळ, अॅड. रणदिवे आदी अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार न होता अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना दर्शनासाठी अवघ्या तीन महिन्यांत खुले झाले. माधोराव गोविंदराव त्रिभुवन आणि विदर्भातील तमाम सत्यशोधकांनी डॉ. आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली हा एकहाती विजय प्राप्त केला होता; मात्र महाडच्या समता क्रांतिसंग्रामासारखी किंवा त्याच्या खालोखाल प्रसिद्धी अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रहाला प्राप्त झाली नाही. या सनदशीर क्रांतिकारी आंदोलनाचा फारसा गवगवा झाला नाही. त्यामुळे साहजिकच या क्रांतिकारी आंदोलनावर फारसे कुणी गांभीर्याने स्वतंत्रपणे लेखन केले नाही. म्हणून या आंदोलनातील क्रांतिकारी सत्यशोधकांचा परिचय व्हावा, म्हणून हा लेखनप्रपंच.
दुसरे असे की, एक कडवे सत्यशोधक वा. रा. कोठारी यांच्या जन्मशताब्दी
निमित्त “प्रभात’कार वा. रा. कोठारी: विचार आणि कार्य’ हा ग्रंथ त्यांनी संपादित केलेल्या दैनिक प्रभात वृत्तसमूहाने इ. स. १९९३ साली प्रसिद्ध केला. या संपादित ग्रंथाला तात्यासाहेब शिरवाडकर, य. दि. फडके, माधव खंडकर, ज. श्री. टिळक, डॉ. सदानंद मोरे, यशवंत सुमन, भास्कर भोळे आदी दिग्गजांचे लेखन लाभले आहे. दरम्यान, वा. रा. कोठारींची निपाणी येथील सहाव्या (२७ व २८ मे १९१६) सत्यशोधकी अधिवेशनात अ. भा. सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून नेमणूक झाली होती. कोठारींनी प्रचारकाचे काम आनंदाने केले होते. पुढे शनिवार व रविवार दिनांक १३ व १४ एप्रिल १९१८ रोजी विदर्भातील अकोला येथे आठवे सत्यशोधक अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष वा. रा. कोठारी होते. त्यांनी या प्रसंगी मूलभूत सत्यशोधकी विचार मांडले. मात्र, या संपादित ग्रंथात या अनुषंगाने कुठलेही अवाक्षर छापले गेले नाही. खरे तर १९१८ साली वा. रा. कोठारींचा
सत्यशोधक होता. तेव्हा त्यांच्या सत्यशोधकी विचारांचा परामर्श घेणारा स्वतंत्र लेख या ग्रंथात हवा होता. त्यांचे अध्यक्षीय भाषणही हवे होते. मात्र असे झाले नाही. या ग्रंथांच्या समारोपात प्रसिद्ध केलेल्या वा. रा. कोठारी जीवनपटात ‘१९१८ – अकोला येथे महाराष्ट्र सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष’ इतकाच अतित्रोटक उल्लेख केलेला आहे. खरे तर वा. रा. कोठारी यांनी ‘प्रभात’मध्ये १९७१-७२ मध्ये लिहिलेल्या आणि पुढे १९७३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘जुन्या आठवणी’ हा ग्रंथ संपादकांनी चाळला असता तर सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने कोठारींच्या काही आठवणी हाती लागल्या असत्या. त्या आठवणी या ग्रंथात समाविष्ट करता आल्या असत्या; मात्र असे झाले नाही. त्यामुळे या ग्रंथापुरते का होईना सत्यशोधक विचारांच्या अंगाने कोठारी झाकोळले गेले. यामुळे कडव्या सत्यशोधकांच्या सर्वांगीण सत्यशोधकी परिचयासाठी सत्यशोधक ग्रंथांची आवश्यकता भासते आहे. हे तर केवळ वाणगीदाखल उदाहरण झाले.
क्रमशः भाग 8
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴


