सत्यशोधक चित्रपट निर्माते सुनिल शेळके यांच्या साक्षीने सत्यशोधक विवाह सोहळा देऊळगाव राजात प्रथमच संपन्न

*सत्यशोधक चित्रपट निर्माते सुनिल शेळके यांच्या साक्षीने सत्यशोधक विवाह सोहळा देऊळगाव राजात प्रथमच संपन्न*
*6 मे 2003 रोजी सत्यशोधक पद्धतीने मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संपन्न झालेल्या 23 जोडप्यांच्या माळी समाज सामूहिक विवाह सोहळ्यातून मेहेत्रे कुटुंबाने घेतली प्रेरणा…*
दिनांक 22 मे 2024 वार बुधवारला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरीमध्ये कुठलेही वैदिक मंत्रोच्चारांचे स्तोम न करता साध्या सोप्या सत्यशोधक पद्धतीने अक्षदा धान्य तांदूळ ऐवजी फुले🍁🪸🌹🌺🪻🥀🌸🌛🌸 टाकून सत्यशोधक विवाह सत्यशोधक समाज विधीकर्ते भगवान रोकडे यांनी संपन्न केला.🟡🟡🟡🟡🟡🟡
सिंदखेड राजा नगरीतील प्रतिष्ठीत व्यावसायिक,माजी नगर सेविका सौ.रमा व श्री.एकनाथ बाबुराव मेहेत्रे यांचा मुलगा चि.सागर मेहेत्रे व जामवाडी ता.जि.जालना येथील श्रीमती सुनिता व कै.सुरेश बाबासाहेब बडदे यांची कन्या यांचा सत्यशोधक विवाह सोहळा महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पाच मंगलाष्टका म्हणून अक्षदा ऐवजी🌸🌛🥀🪻🌺🌹🪸🍁🍂 फुलांची उधळण, करून टाळ्यांचा कटकटाच्या संगीतनादात उत्साहात पार पडला.नंतर वधू-वरास आयुष्यभर एकमेकांनी एकमेकांना साथ देण्याची,एकत्र राहण्याची,मर्जी सांभाळण्याची शपथ देण्यात आली.प्रसंगी वर वधू हस्ते महापुरुषांचे स्मरण करून निर्मिकाचे पुजन करण्यात आले. सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनिल शेळके यांनी आशीर्वादपर शुभेच्छा देवून समाजाने ह्या पध्दतीचा अवलंब करून समाजाचा वेळ,पैसा,श्रम,मानपान, हुंडा देणे घेणे रुसवे फुगवे जुन्या चालीरीती रूढी परंपरा यांना फाटा देऊन अंधश्रद्धेपोटी होणारे वायफळ खर्च वाचवावे.सांस्कृतिक चळवळ बहुजनांनी ओरिजनल ओबीसी ने स्वतःच्या हातात घ्यावी असे आवाहन केले.
विधीकर्ते सत्यशोधक भगवान रोकडे यांनी या पध्दतीचे महत्त्व पटवून सांगितले.सत्यशोधक मौर्य आकाश मेहेत्रे यांनी सत्यशोधक चळवळीने समाज खरा सत्यशोधकी सुसंस्कृत बनावा,अवडंबर टाळून संत सावता महाराजांचा “स्वकर्मी व्हावे रत,मोक्ष मिळे हातोहात” असा कर्मवादी व्यक्ती घडविण्याचा आग्रह उपस्थितापुढे मांडला.विवाहासाठी जनसेवा प्रतिष्ठानचे श्री उमेश खरात,सागर मेहेत्रे यांनी अतोनात मेहनत घेतली.त्यांच्या या आदर्श विवाह सोहळा उपक्रमाचे उपस्थित समाज बांधवांनी तोंडभरून कौतुक केले.कित्येक जेष्ठ पुरुष व महिलांनी प्रत्यक्ष भेटून छान सत्यशोधक विवाह आपण संपन्न केला असे उद्गार काढले.
सिंदखेड राजा व बुलढाणा जिल्ह्यात असे सागर मेहेत्रे सारखे तरुण स्वतः पुढे आले तर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ त्यांच्या मागे भक्कम पणे उभे राहून आपली जबाबदारी पार पाडेल असे श्री.प्रकाश आढाव,जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय ठाकरे,तालुका अध्यक्ष श्री.नंदकिशोर खरात, तालुका सचिव,सहसचिव दत्तात्रेय खरात,एकनाथ मेहेत्रे,वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे यांनी अभिवचन दिले .
खरं म्हणजे ही चळवळ शिकले सवरलेले जे शिक्षक गुरुजन आहेत त्यांनी हाती घेतली पाहिजे आणि लोकांचे प्रबोधन केले पाहिजे ही काळाची गरज असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले.
🟡🟡🟡🟡
.🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴


