ऊठ ओबीसी मानसिक गुलामितून मुक्त हो…

ऊठ ओबीसी मानसिक गुलामितून मुक्त हो…
महात्मा फुलेंच्यां सत्यशोधक समाजाचा धागा हो…
उघड नीट डोळे …
तुझ्या भविष्याकडे बघ….
वैज्ञानिक आधूनिक युगात …
तु कोठे आहेस शोधून बघ…
परकियावर अवलंबून न राहता..
स्वालंबी बनायला शिक….
पोपटपंची न बोलता…..
ज्ञानी बनायला शिक …
लोकशाहीतील तुझे हक्क..
लोकशाहीतील तुझा हिस्सा..
कोणी चोरले ,कोणी खाल्ले..
विचार करायला शिक …
येथे पशू-पक्षी यांची जनगणना होते आणि त्यांचा हिस्सा राखून ठेवला जातो …
मग तुझी जनगणना का करत नाहीत …
लोकशाहीतील तुझा हिस्सा का? तुला देत नाहीत विचार करायला शिक …
तुझ्या हातात ग्रामपंचायत आहे, ठराव बुक तुझ्या हातात आहे,मग भिंती कोणाची,” ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ” म्हणून ठराव घ्यायाला शिक.. ..
तु जिल्हा परिषदेचा,पंचायत समितीचा , नगरपालिकेचा, विधानसभेचा,लोकसभेचा सदश्य आहात तर ” ठराव घ्यायला भाग पाडा नाहीतर बहीष्कार टाकायला शिक..”
कुणाचा गुलाम नाहिस,लाचार नाहीस,स्वतःच्या भाकरीवर स्वतः जगतोस मग भितोस कोणाला आणि कशाला …
ऊठ ओबीसी आतातरी ऊठ .. सरकारला जाब विचारायला ऊठ..
७५वर्षा पासून लोकशाहीतील तुझी भागीदारी चोरली ,त्याला हिशोब विचारायला ऊठ..
लोकशाहीतील तुझा वाटा तुला मिळत नसेल तर…
तुझी जनगणना कोणा साठी ,कशा साठी …?
म्हणून म्हणतो जनगणनेत ओबीसी काॅलम नाही तर आमचा सहभाग नाही असे सरकारला सांगून टाकायला शिक ….
लोकशाहीतील आपले हक्क..
आपणच हिसकावून घेयाला शिक…..
तू तुझ्या समाजच कल्याण करतो म्हणून समाजाचा प्रमुख झालास ..
तू तुलाच विचार तू समाज कल्याण करण्यासाठी काय केलास..
तुझ्या समाजासाठी सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक, सांस्कृतिक, राजकिय न्याय मिळवून दिलास का?कोणाची गुलामगिरी केलास तुच तुझ्या मनाला ठरव आणि गेली ते वेळ गेली , आता एक क्षणही वाया जाऊ न देता समाजाच्या कल्याणासाठी आताच संघर्षासाठी रस्त्यावर उतर…
तुझ्या समाजाचा लोकशाहीतील वाटा मिळविल्या शिवाय गप्प बसणार नाही अशी शपथ घे ..
जातीनिहाय जनगणना करून घेवून संख्या निश्र्चित कर आणि संख्येच्या प्रमाणात समाजाची भाग्यदारी मिळवून घे आणि तू समाजाचा वाघ बन…
एकच दिवस वाघ म्हणून जग..
शेळी बणून मरू नको …
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून घेतलेल्या शिवाय राहू नको…
” प्रेम से कहो हम सब बन्दू है।”
— जय भारत
— गोविंदराम सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


