महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.17

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.17
महात्मा फुले : साहित्य आणि चळबळ
मनातले मनात कुरकुर पुष्कळ करतात व मुख्यत्वेकरून भट, पंडित, शास्त्री हे तर फार हैराण आहेत.” परंतु ही परकी सत्ता उलथून टाकण्याचा नुसता विचारदेखील मनात आणण्याची कुणाची छाती नव्हती. तेव्हा प्राप्त परिस्थितीशी निमुटपणे जुळते घेण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. खेड्यांपाड्यांतील शेतकऱ्यांना नव्या प्रशासनातील शांतता व सुव्यवस्था हे बरदान आहे असे वाटत होते. सरकारी नोकरीत शिरलेले उच्चवर्णिय सुशिक्षित आणि आधुनिक उद्योगप्रधान जमान्यात आर्थिक उत्कर्षाची संधी लाभलेले व्यापारी हे इंग्रजांच्या राजनीतीचे मुक्तकंठाने गोडवे गात होते. मात्र डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या रामेशी, कोळी यांसारख्या जमातींना शांतता व सुरक्षितता यांचे यत्किंचितही आकर्षण नव्हते.
उलट इंग्रजांच्या राजवटीतील निर्बंध त्यांना जाचक होत होते. त्यामुळे त्यांच्या स्वच्छंद वृत्तीला, दरोडेखोरीला व लुटमारीला व्यत्यय येत होता. शिवाय त्यांच्या नैसर्गिक प्रतिकारक्षमतेची धार अजुनही बोथट झालेली नव्हती. इ.स. १८२६ पासून रामोशी व कोळी यांचे उठाव अधूनमधून सारखे होत राहिले. समाजातील वरिष्ठ वर्ग हतबुद्ध व निस्तेज बनला असताना हे वन्य जमातीचे तडफदार तरुण ब्रिटिशांशी शर्थीने झुंजत होते याचे पुष्कळांना कौतुक वाटू लागले. उमाजी नाईक, राघू भांगरे यांच्यासारख्या बंडखोरांचे साहस, शौर्य, आत्मविश्वास, उमदेपणा, गरिबांविषयीची त्यांची सहानुभूती इत्यादी गुणांच्या आख्यायिका सर्वत्र पसरल्या आणि हजारो लोकांच्या प्रशंसेस ते पात्र ठरले.
इंग्रजी राजवट ही आपला सनातन धर्म व संस्कृती यांना हरताळ फासणारी फार मोठी आपत्ती आहे अशी जुन्या पुराणमतवादी ब्राह्मणांची धारणा होती. त्यांना या बंडखोरांच्या उठावाबद्दल विशेष उत्सुकता होती. त्यांच्यापैकी पेशवाईच्या पुनःस्थापनेची स्वप्ने पाहणारे भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना दरबारे व रामचंद्र गणेश गोरे यांसारखे जे धाडसी तरुण होते, त्यांनी स्वतःच बंडाचा झेंडा उभारला आणि त्यांच्या भोवती तळच्या थरांतील तीनचारशे लोक एकत्र आले. गुलामगिरी, मग ती धार्मिक असो किंवा राजकीय असो, जिची जोतीरावांना अतोनात चीड होती. म्हणून विदेशी राज्यकर्त्यांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या या लोकांच्या पराक्रमाचे वृत्तान्त ऐकून जोतीराव आणि त्यांचे मित्र यांना स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा मिळाली. शिवछत्रपती आणि जॉर्ज वॉशिंग्टन
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




