शरणगाथा क्रमशा.17

शरणगाथा क्रमशा.17
अनेक सहकारी अनुयायी हे आजच्या महाराष्ट्रातूनही होते. आजही आजऱ्यापासून – उदगीरपर्यंत पसरलेल्या दक्षिण महाराष्ट्रात लिंगायतांची संख्या मोठी आहे. इतकेच – नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत लक्षणीय संख्येने राहतात.
• सीमालढ्याला यश येऊन बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला
• तर महाराष्ट्रातली लिंगायतांची संख्या कर्नाटकइतकीही भरू शकेल.
राज्याच्या सीमा या कृत्रिम तटबंद्या आहेत. त्या तोडून संत नामदेव, ज्ञानदेव, * एकनाथ, तुकाराम कर्नाटकातल्या गावागावांत पोचले आहेत. ते दुसऱ्या राज्यांतले आहेत, असे तिथे कुणाला वाटत नाही. तसेच बसवण्णांच्या चळवळीतले संतकवीही महाराष्ट्राला आपले वाटले पाहिजेत. संत नामदेवरायांची आपण जितक्या प्रेमाने गळाभेट घेतो, तितक्याच प्रेमाने अल्लमप्रभूनाही भेटता यायला हवे. ज्ञानेश्वर – माऊली जितके आपले वाटतात, तितकेच सिद्धरामय्याही आपले वाटायला हवेत.
• जनाईंइतकीच अक्कमहादेवींनीही आपल्याला प्रेरणा द्यायला हवी. संत एकनाथ आणि
चन्नबसवण्णा या दोघांच्याही करुणेने ओथंबलेल्या काव्याने आपण सारखेच समृद्ध
– व्हायला हवे. गोरोबाकाका आणि गुंडय्या यांच्यातलं अद्वैत संपायला हवं. चोखोबाराय
। आणि मडिवाळ माचय्या या दोघांच्याही बंडखोरीने आपल्याला भारावून टाकायला
हवे. सावतोबा आणि कक्कय्या या दोघांसमोर आपण सारख्याच श्रद्धेने नतमस्तक
– करायला हवे. पण तसे होत नाही. कारण आपल्याला शरणांची चरित्रे, कर्तृत्त्व,
– विचार यांपैकी कशाचाही परिचय नसतो. म्हणून चन्नवीर भद्रेश्वरमठ यांचे ‘शरणगाथा’
■ करून दिली आहे.
संत नामदेवरायांनी आपल्या सोबतच्या संतांची चरित्रं सांगितलीत. त्यातून त्यांनी
– हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. या पुस्तकात त्यांनी बसवण्णांसह २१ शरणांची ओळख वारकरी परंपरेत देवाच्या कथांपेक्षाही संतांच्या कथांना जास्त महत्त्व आहे. – प्रसिद्ध वारकरी संत परिसा भागवत यांची एक गोष्ट आहे. ते आई रुक्मिणीसमोर – भागवताचं निरुपण करायचे. त्यांनी हट्ट धरला की, त्यांना रामकाळातल्या लंकेत फिरायचं आहे. त्यानुसार रुक्मिणीमातेने त्यांची इच्छा पूर्ण केली. आश्चर्य म्हणजे – लंकेत फिरत असताना त्यांना बिभीषणाच्या घरी संत नामदेव कीर्तन करत असताना दिसले. त्यामुळे त्यांचा पुराण आणि आख्यानांविषयी असलेला गर्व कायमचा संपला. ते नामदेवरायांना शरण आले. देवांच्या कथेत रमण्यापेक्षा संतांच्या कथांमधे रमावे, – असे ही कथा सांगते. संतकथांच्या थोरवीचे दाखले माऊलींपासून तुकोबारायांपर्यंत सगळ्यांच्या रचनांमधे सापडतात. एकीकडे हा आग्रह असताना, प्रत्यक्षात संतांची चरित्रे सविस्तर नोंदवून ठेवण्याच्या बाबतीत वारकरी परंपरा मागेच पडलेली आहे.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




