सोशल

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.7

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.7

दादाराव मिसाळ, नाथा मिसाळ, तात्यावा बांगर, किसन सोनवणे, आण्णासाहेब सोनवणे खांबा गावातून धावून आले, तर लिंवा गावचे बप्पाजी कान्हू नागरगोजे, मल्हारी बापू गिते, चांगदेव नागरगोजे, कारभारी धांडे, सुभान धांडे, पौंडूळचे त्र्यंबक राजाराम सानप आणखी बरेच लोक आले.

कापड भिजवून आणून वावांच्या, वापूच्या अंगावर पाणी शिंपडले. बापू ताबडतोब सावध झाला; पण बाबांनी डोळे उघडायला बराच वेळ लागला. चांगदेवाने वप्पाजीला गडावर पाठविले. माणिकवावाला खबर दे, म्हणून सांगितले. कारभारीनी स्वतःच्या गोठ्यातील बाज सांगीतली. पौंडुळचे त्र्यंबक नामदेव सानप यांनीही तोपर्यंत बाज आणली होती. सावकारांनी आपला पालकुरचा फेटा काढून जखमेवर लंगोटासारखा करकचून वांधला. म्हणाले, “धरा, उचला घ्या बाजावर ! बाबाला घेऊन गावात जाऊ.” बाबा सावध झाले होते, म्हणाले, “मला लिंब्याला नेऊ नका, पौंडुळच्या बाजावर टाकून गडावर घेऊन चला.”

बाबांना त्रिंबक नामदेव सानप यांच्या बाजावर मांडले, निरगुडीची दाट झुडपे, शिंदीची झाडे, नदीतील गोटे, डोंगराची पायवाट, काटेरी झाडं होती. बाबाला गडावर घेऊन जायचे होते.

इकडे बप्पाजी कान्हू धावत पळत गडावर गेला. माणिकबाबा पिंप्रीला गेल्याचे कळले. पुन्हा डोंगर उतरून पिंप्रीकडे पळत सुटला. तेथे, बाबा धारवंटा गावाला गेल्याची माहिती मिळाली. तेथून धारवंटा गाव गाठले, पण हाय रे देवा ! वावा फुलसांगवीकडे गेले होते. बप्पाजी पायवाटेने धावतो आहे. फुलसांगवी गावाजवळ समोरून येणाऱ्या माणसाने बाबाला थांबवले, मागे कोण तरी पळत येत आहे, म्हणून सांगितले.

माणिकबाबांनी घोडा उभा केला. मागे वळून पाहिले तर बप्पाजी कान्हू ह हात वर करून उभे राहण्याचा इशरा करीत होता. बाबा थांबले, बप्पाजी जवळ आला. “का पळतो रे ?” बाबांनी प्रश्न केला.

“भगवानबाबांनी ऽऽऽ भगवानबाबांनी ऽऽऽ” धाप लागल्यामुळे त्याला बोलता येईना. तोंडाला कोरड पडली होती. हातपाय थर थर कापत होते. तोंडाला फेस आला होता. धाडकन खाली पडला.

माणिकबाबा घोड्यावरून खाली उतरले. कमंडलूतील पाणी पाजले. उठवून बसविले आणि विचारलं. “भगवानबाबांनी काय सांगितलं? काय निरोप आहे?” बप्पाजीला हुशारी आली म्हणाला, “निरोप नाही दिला. भगवानबाबांनी स्वतःचे लिंग कापून टाकलंय ! पखाल डोहाजवळ !”

“हाय रे देवा ! सावळ्या रामा ! कालच भेटून आलो होतो ! आज महत्त्वाचं काम करून गडावर येतो, म्हणाला होता. हेच त्याचं महत्त्वाचं काम होतं काय ? देवा नगद नारायणा ! अशी किती वेळा भगवानाची परीक्षा घेतोस रे !” मनाशी बोलत स्वतःला दोष देत, माणिकबाबांनी घोडा फिरवला. भरधाव पळवीत पौंडूळ ओलांडून पखाल डोहाला पोहोचले.

भगवानबाबांना बाजेवर टाकले होते. कमरेला फेटा गुंडाळलेला, मांड्यावर, पिंढरीवर रक्ताचे डाग आलेले, डोळे झाकलेले होते. आजूबाजूला पाहिलं, गर्दी जमलेली, लोकांची रडारड, कोणी मुसमुसून तर कोणी ओठ दाबून हुंदके देत होते. सगळ्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहात होत्या. जणू आज पखालडोह लोकांच्या डोळ्यातील अश्रूने भरला होता. अडाणी लोक फक्त रडत होते. औषधोपचार विसरले होते. दुःख सागरात बुडाले होते.

• औषधोपचार : माणिकवावांनी स्वतःला सावरले. शहाण्यांना समजावले. “भगवानाला उचला, चला राजुरीला घेऊन, दवाखान्यात घेऊन जाऊ. चला उचला बाज.” बाबांसह बाज उचलली, गडावर औषधपाणी काय करणार ? जडीबुटी करण्यापेक्षा दवाखान्यात जखम लवकर बरी होईल. चला राजुरीला घेऊन. माणिकबाबा म्हणाले. शे-पाचशे माणसं जमली होती. हात हाताळणी करून राजुरीला आणले. जीपची चौकशी केली. जीप बीडला गेलेली होती. मितृ शेठने घोड्यावर कारभारी पाठवून जीप बोलावून घेतली. सर्वजण बाजार तळावर महादेवाच्या मंदिरासमोर बसून राहिले.

जीप आली, बाबांना जीपमध्ये घातले, माणिकबाबा, दादाराव मिसाळ, कारभारी सावकार, आणि उमाजीबुवा गवते, बापू भिल्लासह जीपमध्ये बसले. दवाखान्यात जाताना माणिकवावा मिठू शेठला म्हणाले, “ही सर्व माणसं सकाळपासूनची उपाशी आहेत.”

“बाबा आत्ता व्यवस्था करतो, आलोच परत ! असं म्हणत गावात गेले.”

॥ राजयोगी ॥

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button