सेडा द्वारा सोलापूरकरांना आवाहन

प्रेस नोट
SOLAPUR ELECTRONICS SEDA DEALERS ASSOCIATION
Surana Market. Mechanic Chowk, Solapur.
सेडा द्वारा सोलापूरकरांना आवाहन
सोलापूर – सोलापूरच्या प्रगतीसाठी सोलापूरकरांनी आपली खरेदी सोलापूर बाजारपेठेतूनच करावी असे आवाहन सेडा चे अध्यक्ष आनंद येमूल यांनी पत्रकार परिषदेत केले. इतर प्रकारच्या खरेदीच्या तुलनेत ग्राहकांना सोलापूर बाजारपेठत खरेदी करण्याचे काय अनेक फायदे आहेत हे नमूद करताना त्यांनी सांगितले कि आपल्या गरजेची वस्तू प्रत्यक्ष पाहता येते, त्यातील विविध मॉडेल्स, अनेक रंगसंगती त्याचे प्रात्यक्षिक घेऊन निर्णय घेता येतो. गरजेनुसार विविध मॉडेल्स एकाचवेळी प्रत्यक्ष पाहून खरेदी करणे हे केव्हाही ऑनलाईन च्या तुलनेत अधिक फायदीशीर ठरते. विक्री पश्चात त्वरित सेवेचीही हमी असते. ऑनलाईन सारख्या माध्यमाद्वारे खरेदी ही फक्त दरामध्ये भुरळ पडणारी असते परंतु प्रत्यक्षात ती आल्यावर त्यातल्या अनेक अडचणी लक्षात येतात. शिवाय त्या वस्तूची डिलेव्हरीचा काळ निश्चित नसतो. याशिवाय बऱ्याच वेळा वस्तू खराब आल्यावर किंवा आवडली नसल्याने ती परत पाठवावी लागते. सर्व वस्तू स्थानिक बाजारपेठेत जवळजवळ ऑनलाईनच्या दरात उपलब्ध असून एलईडी साठी दोन ते तीन वर्ष वॉरंटी असते. तर फ्रिज, ए.सी. ई. साठी १० ते २० वर्ष वॉरंटी असते. शून्य टक्के व्याजदरात फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध आहेत ज्या आपल्याला प्रत्यक्षदर्शी आपल्या सोईनुसार निवडता येतात.
सर्व कंपन्यांचे सर्विस सेंटर सोलापुरात असल्याने ग्राहकाला त्वरित सर्विस मिळते. किंबहुना स्थानिक डीलर कंपनी कडून हक्काने मिळवून देतो. स्थानिक दुकानदाराकडे सणासुदीसांठी कुटुंबियांसोबत खरेदी करताना सणाचा खरा आनंद मिळतो स्थानिक बाजारपेठेत नवीन ऑफर्स व ५० टक्के पर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहेत शिवाय अनेक ऑफर्स, लकी ड्रॉ, खरेदीवर भेट वस्तू उपलब्ध आहेत, असे सेडा चे माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी सांगितले.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नुकतेच स्थानिक दुकानातूनच खरेदी करून शहर व देश बळकट करावे असे आवाहन केले आहे. आपल्या देशाने स्वीकारलेल्या” मेक इन इंडिया” धोरणामुळे आज देशात सर्व उत्पादने बनू लागली आहेत. भारतातील लोकांना रोजगार, कमी आयात व सर्वांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. तीच गोष्ट जर आपण आपल्या शहर पातळीवर राबवली तर AVAILABLE IN SOLAPUR अशी होईल, जेणे करून आपल्या शहराचे चलन शहरातच फिरेल व स्थानिक लोकांचे व्यवसाय चांगले चालतील व सर्वांना रोजगार मिळेल, पर्यायाने शहराचा विकास होईल.
सेडाचे सचिव भूषण भुतडा म्हणाले कि, यास्तव सर्व सोलापूरवासीयांना सेडातर्फे आम्ही निवेदन करतो कि, या सणासुदीत कोणतीही वस्तू बाहेरुन न मागवता स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करावी. पत्रकार परिषेदेस उपाध्यक्ष डॉ. सुरजस्तन धूत, सह सचिव हिरानंद कुकरेजा, खजिनदार सुयोग कालाणी, संचालक सर्वश्री गिरीष मुंदडा, यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शहापूरे, संदेश कोठारी, बसवराज नवले, राजेश जाजू, रवी पाचलग, गणेश सुत्रावे सह माजी अध्यक्ष खुशाल देढिया, केतन शाह, सतीश मालू, जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, विपीन कुलकर्णी, उपस्थित होते
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


