अरणला सावताभक्त निवासाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते आ रोहित पवार यांचे उपस्थितीत लोकार्पण!

आमदार रोहित पवार यांनी साडेचार पाच कोटी रुपये खर्च 0pकरून संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अ वर्ग तीर्थक्षेत्र अरण ला संत सावता भक्त निवास स्वखर्चाने बांधून आज खासदार अमोल कोल्हे 0pयांच्या 00शुभहस्ते रमेश पुजारी यांच्या कडे सुपूर्त करून लोकार्पण केले


याप्रसंगी 0विचार 0मंचकावर अनेकांनी आपले विचार0 मांडले मंचकावर अनेक राजकीय पुढारी बसले होते त्यांचा नाम उल्लेख सत्कार झाला नाही म्हणून ते मधूनच निघून गेले साठ समाजसेवकांना पुरस्कार देण्यात आले यापैकी अनेकांना याची कल्पना वेळेत मिळाली नाही त्यामुळे वीस पंचवीस जणांचे पुरस्कार वाटप झाले सत्कार झाले काही विशेष सत्कार झाले ज्यांची नावं पुकारली त्यापैकी 50 टक्के लोक सत्कार घेण्यासाठी आले नाहीत
कार्यक्रमाला महिलांची गर्दी लक्षणीय होती सर्व महिला आणि त्यांच्याबरोबर आलेले काही पुरुष हे प्रामुख्याने जामखेड कर्जत रोहित पवार यांच्या मतदारसंघातील होते त्यांना जाण्या येण्याची खाण्यापिण्याची गाडी घोड्याची चहा पाण्याची व्यवस्था रोहित पवार यांनी स्वखर्चाने उत्तम केलेली होती प्रत्येक गटाच्या सोबत एक पुरुष मॉनिटर म्हणून होता तो मॉनिटर सर्व महिलांना कंट्रोल करत होता खासदार अमोल कोल्हे यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे उशिरा आले त्यामुळे सभेला खूप वेळ झाला होता महिला आणि पुरुष एका जागेवर बसून कंटाळले होते परंतु मॉनिटर त्यांना वारंवार सूचना करून जागेवर बसवत होता सावता महाराजांची भावनिक साथ घालून त्यांना शपथ वगैरे देत होता काही महिला उठबस करू लागल्या सभेला आलेली लोकं कंटाळून गेली खाली बसायला खडबडीत जागा होती नाविलाजाने काही लोक बसून होते त्यांच्यामध्ये अजिबात उत्साह नव्हता मुख्य भाषण आमदार रोहित पवार रमेश वसेकर यांचे झाल्यानंतरही चार वाजेपर्यंत कोल्हे साहेब आले नाहीत तोपर्यंत मुख्य भाषणा नंतर पाच-सहा जणांची भाषण झाली कोणालाही भाषण ऐकण्यामध्ये रस नव्हता रोहित पवार यांच्या भाषणानंतर ही अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांची भाषणे झाली भाषण चांगली होती कार्यक्रम पाच तास लांबला होता प्रत्येकाला केव्हा एकदा सभा संपते न आपण गावाला जातो असं झालं होतं भाषणा मध्ये रोहित पवार पुजाऱ्यांचे कौतुक खूप करत होते आणि बाकीची सर्व रोहित पवारांचे कौतुक खूप करत होते एकंदर जामखेड कर्जत विधानसभेचा प्रचारच आज सभेमध्ये जास्त होता शेवटी कोल्हे साहेब आले कोल्हे साहेबांचे भाषण झाले त्यावेळेला उत्साह निर्माण झाला नंतर पाच वाजेपर्यंत कार्यक्रम चालला पाच वाजता भक्तनिवास उद्घघाटनाचा कार्यक्रम झाला सभेला आलेल्या प्रत्येका नाएक सावता महाराजांचा फोटो आणि फोटो ठेवण्यासाठी कापडी पिशवी देण्यात आली सावता महाराज यांच्या बरोबर रोहित पवार यांचा ० फोटो 9छपून प्रचार करण्यात 9आला होता रोहित पवार यांनी या अगोदरही रमेश वसेकर पुजारी यांच्या जागेत वारकरी ध्वज फडकवला होता तो ही मंदिराजवळ न फडकवता मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर हायवे रोड लगत फडकवला होता दानशूर आमदार रोहित पवार यांनी रमेश पुजारी यांना गाठले आणि त्यांना चार चाकी नवी कोरी गाडी फिरण्यासाठी दिली त्यामुळे रमेश पुजारी यांनी रोहित पवार यांच्या कर्जत जामखेडमतदार संघात सावता महाराज यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करताना रोहित पवार ना मतदान करण्या ची गळ घातली त्यामुळे रोहित पवार पहिल्यांदा नवख्या जामखेड कर्जत मतदारसंघांमध्ये निवडून आले सावता महाराज आणि माळी समाजाचा वाढता पाठिंबा बघून त्यांनी रमेश पुजारी यांना हाताखाली धरून अनेक माळी समाजाची छोटी-मोठी काम करण्यास सुरुवात केली आणि आपला मतदार पक्का केला त्या ठिकाणी ओबीसीचा मंत्री राम शिंदे यांना अहिल्यादेवी होळकरांचा वारसा असतानाही सावता महाराजांच्या नावावर ओबीसीमध्ये मोठी फूट पडली त्याचा फायदा रोहित पवार यांनाझाला सर्व संत शिरोमणी सावता महाराज यांचे सर्व वंशज निमंत्रक म्हणून होते परंतु बरेच वंशज गैरहजर असल्याचे दिसले उभी फूट पडल्याची दिसली दोन महिन्यापूर्वी चार ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस छगनरावजी भुजबळ साहेब कर्जत जामखेड चे माजी आमदार मंत्री राम शिंदे ओबीसी विकास मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पाचशे फुटाच्या अंतरावर तीन एकर जागेमध्ये शंभर कोटी रुपये खर्च करून शासनामार्फत भव्य आणि दिव्य भक्तनिवास बांधण्यात येत आहे त्याची पायाभरणी झाली होती त्या कार्यक्रमाचे संयोजक सावता पुजारी होते रमेश पुजारी त्यावेळी हजर नव्हते
अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा 75 वर्षानंतर मिळाला 55 वर्षे राष्ट्रवादी व काँग्रेस सत्ता असूनही या तीर्थक्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते 1995 पासून सावता महाराज यांच्या 701 पुण्यतिथी ला 701 दिवे लावून अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा वनौषधी संशोधन केंद्र करावे अरण चा सर्वांगीण विकास करावा या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शासनास केला होता आणि आजही करत आहेत लिंगे यांनी 1995 पासून शेकडो कार्यक्रम करणला घेऊन प्रमुख मार्गावर 25 ठिकाणी दिशादर्शक फलक लावले होते 1998 पासून गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सातत्याने अरणला भेट देऊन अ वर्ग तीर्थक्षेत्राचा अ वर्ग दर्जा देण्याची घोषणा केली होती परंतु 99 ला त्यांचे सरकार गेले 2014 स*** सरकार आले तोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा मृत्यू झाला त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी बऱ्याच घोषणा करून अनेक विकासाची काम करण्याचा प्रयत्न केला रामदास आठवले ना स फरांदे सर सभापती विधान परिषद आमदार सुधाकर रावजी गणगणे साहेब यांच्या फंडातून अनेक सभागृह बांधण्यात आली हे सर्व काम सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या आठ सामुदायिक विवाह 712 जोडप्यांचा सत्यशोधक पद्धतीने मोफत विवाह लाखोंच्या जनसागराच्या उपस्थितीत झाले त्यामुळे आरणचे गावागावात राज्यात देशात आणि परदेशात महत्त्व वाढले होते लिंगे आणि आरण पासून अमेरिकेपर्यंत कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क डेट राईट शिकागो या ठिकाणी प्रचार आणि प्रसार केला होता उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी एक कार्यक्रम घेतला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी एक कार्यक्रम घेतला असे अनेक कार्यक्रमा ची मालिका अरन क्षेत्रावर चालू झाले लि आहे
0
आज सावता महाराज वंशज आणि माळी समाज दुभंगला असल्याचे जाणवले
रमेश वसेकर पुजारी यांचे 1998 ला सामुदायिक विवाह मध्ये लिंगे यांनी मोफत लग्न करून दिले होते त्याला महाराष्ट्रभर माझ्या गाडीत फिरवून सर्व माळी समाजाची ओळख करून दिली त्याला अनेक संकटातून बाहेर काढले तोच रमेश वसेकर पुजारी आज चार पैसे रोहित पवारांच्या नावावर काम करून देतो म्हणून मिळाल्याने रोहित पवारांच्या जवळ असल्याचे दिसत आल्यामुळे कोणालाही ओळखत नाही त्याला जे खोबरं देतात त्याचं तो चांगभलं करतो खोबरं तिकडे चांगभलं म्हणतो. आज समाज जागृतीसाठी अनेक लोक आपापल्या संघटनेचे पत्रक वाटत होती त्याचप्रमाणे शंकराव लिंगे यांनी आजच्या सध्याच्या ज्वलंत विषयावर ओबीसी वरील होणारे अन्याय विषयावर थांबविण्यासाठी काय केले पाहिजे ओबीसी जागृती करण्याचे एक पत्रक वाटत होते आणि रमेश वसेकर पुजारी यांचा किंवा रोहित पवारांचा पाळलेला एकl आला आणि ते पत्रकl वाटण्यासाठी मज्जाव केला त्यानंतर शंकरराव लिंगे यांनी हायवे वर उभा राहून पत्रक वाटली तेथेही येऊन ह्या पाळलेला आमचे फोटो काढून केस करण्याची धमकी देऊ लागला आणि पोलिसाकडे तक्रार केली पोलिसांनी पत्रक वाटण्याचे काम बंद केले!पत्रक वाटणाऱ्या कार्यकर्त्यास दमदाटी केली कारण हे पत्र ओबीसीचे होते आणि रोहित पवार आणि त्यांचे सहकारी तर ओबीसीच्या विरुद्ध जरांगे ला उभे केले होते रसद पुरवली होती त्यामुळेच हे पत्रक वाटप बंद केल असल्याचा संशय वाटतो. परवाच वडीगोद्री येथे कार्यक्रम झाला ओबीसींच् आंदोलन झालं ओबीसीच उपोषण झालं जरांगेचे हे उपोषण झालं जराlगेला रसद पुरवण्यासाठी रोहित पवार यांचे सहकारी माजी मंत्री आमदार राजेश टोपे अंतर्वली सराटीला रात्री बारा वाजता गेले होते त्यामुळे त्या ठिकाणी ओबीसी ने शपथ घेतलेली आहे रोहित पवार यांना जामखेड कर्जत मतदारसंघांमधये धडा शिकवण्याची. असल्या दडपशाहीपासून रोहित पवार यांनी सावध राहावे जय सत्यशोधक!
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात जो 4 ऑगस्ट 2024 रोजी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून सर्व समाजातील सर्व पक्षातीलनेते आमदार सावता भक्त लोक आले होते आज मात्र 80% च्या वर कर्जत जामखेड मतदार संघातील बचत गटाच्या महिला व त्यांच्या सुरक्षेसाठी आलेले पुरुष मंडळी दिसत होती माळी समाजाच्या अनेक नेत्यांना आमंत्रण दिलेली दिसत नव्हती एकंदरीत गड आला पण सिंह गेला सावता महाराजांचे वंशज दुभंगले माळी समाज दुबंगला प्रत्येकाने आपले आपली चूल वेगळी मांडून वंशज आणि समाज फुटीचे दर्शन घडविले यामुळे एका डोळ्यात आनंदाने आनंद अश्रू एका डोळ्यात दुःख अश्रू आले कोणत्या ना कोणत्या कारणाने संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अ वर्ग तीर्थक्षेत्र अरण चा विकास होत आहे जे विकास करताहेत त्यांना शुभेच्छा! जय सावता महाराज जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधानल!!! …



