सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.18

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.18
संदर्भ- १. सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ १९३३-संपादक – माधवराव बागल, २. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणे-सुवर्ण महोत्सव ग्रंथ- १९३४-३५ – संपादक सी. रा. तावडे, ३. रामायणावर नवा प्रकाश – भास्करराव विठोजीराव जाधव.
जामोदकर सतीश माणिकराव (जन्म १५ जून १९७१)
विदर्भातील सत्यशोधक सतीश माणिकराव जामोदकर यांचा जन्म १५ जून १९७१ चा असून गजानन महाराज विद्यालय, हिवरा (बु.) तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथे ते विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत. मौजे राजणा (पूर्णा), तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती येथील ते मूळ रहिवासी आहेत.
जामोदकर विदर्भ विभागाच्या सत्यशोधक समाजाचे सचिव आहेत. तसेच सत्यशोधकी साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे ते सचिव आहेत. जामोदकरांनी विविध नियतकालिकांमधून आणि वर्तमानपत्रांमधून लेखन केले आहे. त्यांना आतापर्यंत विविध संस्थांचे सात पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
अ. भा. माळी शिक्षण परिषदेचे कार्य, करजगावातील सत्यशोधक चळवळ, वाशिम जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळ आदी त्यांच्या तीन सत्यशोधक मतांच्या पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात मूलगामी चिंतन करणारा ‘शेतकरी संघर्ष’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. इ. स. १९९३ सालापासून ते विदर्भ सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




