राजकारण

जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा जागो ओबीसी जागो

जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा जागो ओबीसी जागो
‌‌ ” प्रेम से कहो हम सब बन्धू है ”

” गोंधळलेल्या अवस्थेत धनगर- ओबीसी ”

१९८९ नंतरच धनगर ओबीसीना लोकशाही समजायला लागली म्हणटल तर वावग ठरणार नाही. कारण या पुर्वी आपल्या महापुरूष्यानी आपल्या हक्कासाठी संघर्ष केले त्या वेळेस आपण त्याना साथ दिली नाही.महाराष्ट्रात फुले,शाहू, आंबेडकर यांना आपण त्या वेळेस साथ दिली नाही आणि त्यांच्या विचाराला आजही साथ देत असलेले दिसत नाही,म्हणून आपण उपेक्षित अवस्थेत आहोत.
तामिळनाडू राज्यात (पुर्विचे मद्रास राज्य ) पेरियार रामास्वामी नायकर यांच्या चळवळीला ओबीसीनी लोकानी साथ दिली, म्हणून ओबीसींना एससी,एसटी, प्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले आणि आजही ते आरक्षणाचा फायदा घेत आहेत. या राज्यात प्रस्थापिताच राज्य नसून उपेक्षित ओबीसी सत्तेत आहेत. आपण पेरियार रामास्वामी नायकरला साथ दिली असतो तर आपण ही अपेक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलो असतो.
इतिहास असा घडत गेला,सत्तेचे पावर मध्ये पुढील प्रमाणे बदल होत गेले,मराठी राज्याचे पावर पेशव्या कडे होते त्यांनी पेशव्याचे पावर इंग्रजाकडे दिले, इंग्रजांच्या काळात उपेक्षित समाजाला न्याय मिळू लागला की प्रस्थापितानी इंग्रज चले जावचा नारा दिला आणि इंग्रजाकडून पावर टिळक,गांधी,नेहरू या प्रस्थापित काँग्रेस कडे सत्तेचे चाव्या घेण्यात आले.या लोकानी डॉ बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानला विरोध केला, पंरतू इंग्रजानी बाबासाहेबाचे म्हणणे ऐकल्या शिवाय सत्ता सोडायला तयार नव्हते,त्या वेळेस गांधीजीनी नेहरूना समजावले की नेहरू बाबासाहेबाचे म्हणण्याला समती द्या, कारण सत्ता तुमच्याच हातात राहाणार असल्याने अमलबजावणी करणे न करणे तुमच्याच हातात राहाणार आहे. इकडे पुणे कराराच्या वेळी डॉ बाबासाहेबाना गांधीजीनी आस्वासन दिले होते की भारताला स्वांतंत्र्य मिळाल्यावर आपणच ओबीसीचे प्रश्न सोडवू, त्या प्रमाणे घटनेतील कलम ३४० नुसार जातीनिहाय जनगणना करून संख्या निश्र्चित करणे व त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावयास पाहिजे होते परंतू तसे घटनेनूसार नये आणि गांधीजी अडसर ठरू नये म्हणून पुर्ण सत्ता हातात आल्यावर प्रस्थापितानी गांधीजीचा खुन करून त्यांचे कार्य संपविले.
त्या वेळेस आपण अशिक्षित, आधंळे होतो आजही तीच अवस्था दिसून येत आहे.
ज्याना समजले त्यानी चळवळी उभ्या केल्या परंतू त्याना साथ देण्याइतपत लायक झालो नाही असे वाटते. कोणीतरी आपल्यातला बुध्दीवान घटनेचा आभ्यास करून आपल्या हक्का बदल संघर्ष सूरू केले आहेत . त्याना आपण साथ देण्या ऐवजी शत्रु पक्षालाच साथ देवून आपल्याच पिड्या बरबाद करिता आहोत. ओबीसी आपले हक्क मिळविण्यासाठी जागृत होऊ नये म्हणून ओबीसीना देव-धर्माचे,जाती जातीत संघर्ष उभा करून प्रस्थापित पक्षानी ओबीसी समाजात दलाल निर्माण करण्याच काम केल. समाजातील हे दलाल प्रस्थापिताची सेवा करून त्या गुलामीचाच स्विकार केले.त्या मुळे समाजाचे प्रश्न सुटणे मुस्किलीचे झाले आहे.

आज ही धनगर ओबीसी लोकशाहीतील शासन, प्रशासन,न्यायासन आणि पत्रकारितेत शुन्य आहे,याचां एकही राष्ट्रीय पक्ष नाही.

बहुजनाचे पक्ष जनतादल, भारिप,सपा,द्रमुक,बसपा, रासपा हे पक्ष राष्ट्रिय पक्ष होऊ शकले नाहित कारण आपणच ते स्विकारण्यात कमी पडलो अथवा त्यागी नेत्रत्व मिळालेल नाहीत, आता बसपा व रासपा ला त्यागी नेतृत्व मिळाले आहेत,परंतू आपण आपल्या माणसावर विस्वास ठेवत नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागते.
आता काहीं कार्यकर्त्याना समजत आहे की काँग्रेस व भाजपा एकाच कुंटूबातील दोन राजकिय दुकान आहेत त्यांच्याकडून आपले प्रश्न सुटणार नाहित , आणि बहुजन आघाड्या कायमरूपी टिकण्याची गँरटी नाही.त्यासाठी एकच पर्याय निर्माण होणे गरजेचे आहे. ते राष्ट्रिय नेतृत्व ,राष्ट्रिय पक्ष निर्माण करण्याची जिमेदारी निस्वार्थी सामान्य मानसाची आहे. आता
या परिस्थितीत धनगर ओबीसी जागा होऊ लागला आहे,परंतू समाजातील प्रस्थापित काँग्रेस, भाजपातील नेते व कार्यकर्ते समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत, तर कांही लोक तिसरी आघाडीची भाषा करीत आहेत, हि चांगली बाब असली तरी , आपणाला परत कोणी फसवित तर नाही ना हे तपासणे गरजेचे आहे. त्या साठी आपण इतिहासा कडे जाऊ या.. क्रमशा..पुढील प्रबोधनात….
“जाती तोडा राष्ट्रीय समाज जोडा ”
— जय भारत
— गोविंदराम शूरनर
” राष्ट्रिय सत्यशोधक समाज संघ ”
[ सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button