सोशल

शरण गाथा क्रमश.10

वच

वचन

वचन म्हणजे प्रतिज्ञा. वचन म्हणजे आत्मसाक्षीने केलेले निवेदन, वचन म्हणजे स्वतःच स्वतःला दिलेले वचन. एका अर्थाने हा आत्मसंवाद आहे. ती स्वतः साठीची आचारसंहिताही आहे. वचनामध्ये बोलण्याला नव्हे तर कृतीला महत्त्व आहे. ‘बोले तैसा चाले..’ नव्हे तर ‘चाले तैसा बोले…’ हेच शरणांना अभिप्रेत आहे. तत्कालीन समाजाच्या बोलीभाषेत निर्माण झालेले लोकसाहित्य म्हणजे वचन. शरणांची तर्कसंहिता धर्मसंहिता म्हणजे वचन. कन्नड भाषेला उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे साहित्य म्हणजे वचन. अंकितामुळे कोणती वचने कोणाची आहेत याचा बोध होतो. अंकित हे त्या त्या शरणांच्या गुरूचे, त्याच्या आराध्यदेवतेचे अथवा आध्यात्मिक मार्गदर्शकाचे नावही असू शकते. आपल्या आराध्यदेवतेला उद्देशून शरणांनी वचने लिहिली आहेत. म्हणून वचन म्हणजे शरण आणि त्यांचे आराध्य यांच्यातील संवादच होय. वचनांम ध्ये एक आंतरिक लय आहे.

त्यामुळे वचन गद्य दिसत असले तरी ते गेय आहेत, वचन साहित्य ही कन्नड भाषेने विश्वसाहित्याला दिलेली देणगी होय. वचने वाचताना वचनकार बोलत आहेत असे वाटते. ते आपल्याशी चर्चा करीत आहेत असा प्रत्यय येतो. षट्स्थल, अष्टावरण व पंचाचार यांचे निरूपण वचन साहित्यात आढळते. अध्यात्म, धर्म आणि नीती यांची अभिव्यक्ती वचन साहित्यात झालेली आहे. वचन साहित्याला वचनशास्त्र, वचनागम असेही म्हटले जाते. शरणांच्या वचनांना मंत्राची आणि प्रार्थनेची प्रतिष्ठा लाभली आहे. मंत्राप्रमाणे आणि प्रार्थनेप्रमाणे वचनांचा वापर केला जातो. वचनांमुळे कन्नड साहित्याला वेगळे आयाम, सौंदर्य लाभले. कन्नड साहित्य समृद्ध करण्यात वचन साहित्याचे योगदान मोठे आहे. मराठीतील अभंग रचनेप्रमाणे वचन साहित्य आहे.

शिवयोगी सिद्धरामेश्वर वचन लिहिणे कर्तव्य मानतात. बोलणे, चालणे शुद्ध असणाऱ्यांची मोडकी-तोडकी वाक्ये वचने झाली. वचनांची एकूण संख्या किती असावी, याबद्दल उत्सुकता असणाऱ्यांनी सिद्धरामेश्वराच्या या वचनांचा अभ्यास करावा. ते म्हणतात. अल्लय्यांची (अल्लमप्रभू) वचने एक कोटी ६० लाख, अण्णय्यांची (बसवण्णा) वचने चार लाख ३६ हजार, निलम्मांची वचने एक लाख ११ हजार, गंगांबिकांची वचने एक लाख ८ हजार, अक्क नागाईची वचने तीन लाख ९६ हजार, मडिवाळ माचय्यांची वचने तीन कोटी तीनशे, हडपद अप्पण्णांची वचने ११ हजार, मरूळसिद्धांची वचने ६८ हजार, इतक्या प्रचंड संख्येवरील वचनांचा हिशोब सांगितला आहे. आज प्रत्यक्षात सापडलेल्या वचनांची एकूण संख्या २५ हजारांपेक्षाही कमीच आहे. थोडक्यात कल्याणमधील हिंचाराचात वचन साहित्याच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो.

१६ । शरणगाथा….

10

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button