महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशः ४

(एकोणीस)
महात्मा याच भव्य स्मारक देशाच्या राजधानीत, दिल्लीत व्हावे असा आमचा गेली पंधरा वीस वर्षे प्रयत्न होता. यश येत नव्हते. संसदेच्या प्रांगणात जोतीरावांचा अतिभव्य पुतळा उभारण्याच्या संकल्पाला गती येत नव्हती. अडचणी अनेकानेक होत्या. न थकता पाठपुरावा चालू होता. पुन्हा छगन भुजबळ मदतीला धावून आले. त्यांचा स्पर्श झाला आणि वर्षभरातच पुतळाचे उद्द्घाटन पंतप्रधान आणि उप राष्ट्रपती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा बनविला आहे. संसदेच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवराय यांचे पुतळे एका शेजारी एक असे उभे आहेत. विष्णुशास्त्री चिपळुणकरांची भविष्यवाणी (शापवाणी) कुचकामी ठरली. १८७४ साली ते म्हणाले होते, “फुल्यांचा टीचभरही पुतळा कोणी उभारणार नाही!” १९२५ साली पुणे शहरात फुले पुतळा उभारण्यासाठी जेधे जवळकरांनी प्रयत्न केले. मोठा संघर्ष झडला. ४४ वर्षे लढाई झाली. दिनांक ३१ मे १९६९ ला पुणे महानगर पालिकेच्या प्रांगणात पुतळा उभा राहिला. दिनांक २८ नोव्हेंबर १९८२ ला मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात पुतळा उभा राहिला आणि आता संसद भवनाच्या प्रांगणात महात्मा फुले विराजमान झाले ! (दरम्यान विष्णुशास्त्री कुठेयत ? पुण्यात सदाशिव पेठेत दीड फूट उंचीचा त्यांचाही अर्ध पुतळा आहे ना !)
उत्तर प्रदेशातील बरेली येथील विद्यापीठाला “महात्मा फुले रोहीलखंड विद्यापीठ” असे नाव देण्यात आले आहे. सुश्री मायावतींनी हे नामकरण केले. त्यांनी ‘महात्मा जोतीराव फुलेनगर’ या नावाचा जिल्हाही तयार केला आहे. पुणे विद्यापीठात महात्मा फुले यांच्या नावे अध्यासन निर्माण व्हावे असा आमचा प्रयत्न होता. उप मुख्यमंत्री श्री. छगन भुजबळ यांनी शासनातर्फे काही निधी विद्यापीठाला देऊन हे काम सुरू करायला लावले. सावित्रीबाई फुल्यांच्या जीवनकार्यावर महाराष्ट्र शासनाने चित्रपट काढावा असा आपण रस्ताव दिला होता. त्याला यश आले असून चित्रपट योजनेला शासनाने नान्यता दिली आहे. कामाला लवकरच सुरुवात होईल.
मध्यंतरी इंग्लंडच्या संशोधन दौऱ्यावर गेलो असताना तेथे आम्हाला महात्मा हुले, सावित्रीबाई आणि सत्यशोधक चळवळीचे असंख्य दस्ताऐवज मिळाले. थील जगप्रसिद्ध ब्रिटीश म्युझियम लायब्ररी, ct इंडिया ऑफिस लायब्ररी, लंडन
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




