महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.2

(सतरा)
महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.2
छायाचित्र आता रद्द झाले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाईंचेही एक चुकीचे छायाचित्र प्रस्तृत झाले होते. आपण सत्यशोधक पालकर यांच्या संग्रहातील निगेटीव्हवरून सावित्रीबाईंचे अस्सल चित्र मिळवून त्यावरून तेजस्वी तैलचित्र तयार करून घेऊन त्याला शासन मान्यता मिळवून दिल्याने आता ते मागे पडले आहे. सावित्रीबाईंचे हे रंगीत तैलचित्र सर्व शासकीय कार्यालयात आणि शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांत लावण्याचा शासनादेश काढण्याच्या कामी छगन भुजबळ यांचे मौलिक मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शासनातर्फे प्रकाशित महापुरुषांच्या “छायाचित्र मालिकेत ” या छायाचित्राचा आता समावेश झाला आहे. हे छायाचित्र मंत्रालयासकट सर्वत्र झळकले आहे.
त्याचे टपाल तिकीट काढले जावे यासाठी आपण भारत सरकारच्या टपाल खात्याकडे खूप प्रयत्न केले. त्याला यश येऊन सावित्रीबाईंचे टपाल तिकीट काढण्यात आले. न्हाव्यांच्या संपात सावित्रीबाईंचे विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यशोधक नेते, नारायण मेघाजी लोखंडे यांची स्मृती कायम रहावी यासाठी आपले नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून लोखंडे यांचेही टपाल तिकीट काढण्यात आले. त्याचे प्रकाशन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्लीत झाले. लोखंडे यांचे चरित्रकार मनोहर कदम यांचे कर्करोगाने अकाली निधन झाले. त्यांनी लिहिलेल्या लोखंडे चरित्राचा हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. सावित्रीबाईंच्या लेकींचा वारसा चालविणाऱ्या आणि त्यांचा अर्धपुतळा पुण्यात उभा करणाऱ्या फुलवंताबाई झोडगे आणि सत्यशोधक चळवळीचे इतिहासकार दादासाहेब झोडगे यांचे निधनही चटका लावून गेले.
सावित्रीबाईंचा जन्म नायगांव येथे ज्या घरात झाला त्याची संपूर्ण पडझड झालेली होती. गावातील लोक त्याठिकाणी कचरा टाकत असत. नेवशे मंडळी दि. ३ जानेवारीला तात्पुरती साफसफाई करून जयंतीचा कार्यक्रम करीत आणि पुन्हा तो उकिरडा कायम राही. मधल्या काळात काही मंडळींनी गावातील दुसऱ्याच एका ठिकाणी एक छोटासा पुतळा बसवला आणि त्यालाच सावित्रीबाई फुले स्मारक असे नाव दिले. छगन भुजबळ उप मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना नायगावला भेट द्यायची आपण विनंती केली. पुण्यातील महात्मा फुले स्मारक उभारण्यातला त्यांचा झपाटा माहीत असल्याने या कामी तेच न्याय देऊ शकतील असा विश्वास होता. १९७२ पासून प्रलंबित असलेले फुले चाड्याचे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा


