महात्मा जोतीराव फुले* यांची गणपती वरील

महात्मा जोतीराव फुले* यांची गणपती वरील
अखंडदी काव्य रचना … !
गणपती-अखंड काव्यरचना –
पशुपरी सोंड !! पोर मानवाचे !! सोंग गनोबाचे !! नोंद ग्रंथी !! बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड !! फुकितो शेंबूड !! सोंडेतून !!
अन्तेजासी दूर, भटा लाडू देतो !! नाकाने सोलीतो !! कांदे गणू !! चिखला तुडवूनी बनविला मोरया !! केला ढबू-ढेऱ्या !! भाद्रपदी !!
गनोबाची पूजा !! भाविका दावितो !! हरामाच्या खाती !! तूप-पोळ्या !! जय मंगलमुर्ती !! जय मंगलमुर्ती !! गाती नित्य कीर्ती !! टाळ्यासह !! उत्सवाच्या नावे, द्रवे भोन्दाडती !! वाटी खिरापती !! धूर्त भट !!
जाती मारवाडी गरीबा नाडीती !! देवूळे बांधती !! कीर्तीसाठी !! देवाजीच्या नावे, जगाला पीडिती !! अधोगती जाती !! निश्चयाने !!
खरे देव भक़्त !! देह कष्टविती !! पोषण करिती !! घरच्यांचे !! अजाणसी ज्ञान, पांगल्या अन्नदान !! हेच बा स्मरण !! निर्मिकाचे !! भोळा वारकरी, त्यास दिली हूल !!
स्मरणांत फळ !! आहे म्हणे !!
क्षत्रिय रामाचा, धूर्त बने दास !!
गांठी शिवाजीस !! मतलबी !!
दादू कोंडदेव, त्या ठेवी अविद्वान !!
करवी तुलादान !! ऐदि भटा !!
स्वजातीसाठी, बोधिले पाखंड !!
धर्मलंड खरे !! जोती म्हणे !!..
(महात्मा फुले समग्र वाङमय)
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा
जोतिराव विद्यापती
नाही ठाऊक आम्हास गजानन गणपती आम्हा ठाऊक जोतिबा देव खरा विद्यापती ॥धृ॥
ज्यांनी निर्मियली साऊ ज्ञानदेवी आम्हा प्रती किती वर्ण गुणगुणू माय साऊची महती ॥१॥
झिजलीही अव्याहत माय समाजाच्या प्रती जोति साऊंनी मानिला एक समाज भारती ॥२॥
केला त्यांवरी प्रहार ज्यांनी निर्मियल्या जाती किती सांगू आणि कशी जोति सावित्रींची ख्याती ॥३॥
धर्म मानवता एक एक सार्यांच्याच जाती जात मानव एकच जोति साऊंची ही निती ॥४॥
जोति साऊंची ही निती औघ्या विश्वावरी प्रिती साऊ आम्हा ज्ञानदेवी जोतिराव विद्यापती॥५॥


