सोलापुरातील कुडमुडे जोशी समाजाची दयनीय अवस्था!!.

सोलापुरातील कुडमुडे जोशी समाजाची दयनीय अवस्था!!.
दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही स्पेशल रिपोर्ट
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
कोंडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर पासून दहा किलोमीटर सोलापूर पुणे हायवे रोडवर 50,60 कुटुंबाची वस्ती गेल्या आठ-दहा वर्षांपासून दयनीय अवस्थेत रहात आहे मूळचे हे कुटुंब भालकी जिल्हा बिदर मधील मराठी भाषिक लोक आहेत यांचा मुख्य धंदा पोपटामार्फत भविष्य सांगणे आज ह्या धंद्यालाही त्यांना बंदी आलेले आहे त्यामुळे त्यांची उपासमार चालू आहे आता हे लोक सोलापूर शहराच्या बॉर्डरवर पुना नाक्याच्या सोलापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ सरकारी जागेमध्ये झोपडी पाल टाकून राहत आहेत
यांना स्वतःची जमीन जागा नाही घर नाही शिक्षण नाही कोणताही पुरावा नसल्यामुळे त्यांना जातीचा दाखला मिळत नाही ही जात भटक्या विमुक्त एन टी ब मध्ये आहे यांना शिक्षणासाठी नोकऱ्यासाठी कोणतीही सवलत नाही एवढेच काय आज परत यांचं कुठल्याही बँकेत खातं नाही आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही शिक्षणाचे प्रमाण नागाण्य आहे जातीचे दाखले नसल्यामुळे त्यांना आश्रम शाळेमध्ये किंवा इतर शाळेमध्ये प्रवेश मिळत नाहीत यांच्या या झोपडी वस्तीवर पाण्याची संडास बाथरूमची आरोग्याची कोणतीही सोय नाही आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जनावराला सुद्धा यांच्यापेक्षा चांगला गोठा आणि राहण्यासाठी जागा असते निवारा असतो
परंतु ते ही यांच्या नशिबी नाही आता हा समाज भंगार गोळा करणे विकत घेणे विकणे महिला मंडळी भांड्याचा व्यवसाय भांड्यावर जुनी कपडे घेणे विकणे आदी व्यवसायातून रोज चारशे पाचशे रुपये दोनशे रुपये कमवतात त्यावरच त्यांची रोजी रोटी चालते या समाजाची मागणी आहे आम्हाला 50 60 कुटुंबासाठी एक दोन एकर जागा द्यावी त्या ठिकाणी नळ पाणी संडास बाथरूम शासनाने बांधून द्यावे घरकुल द्यावे रेशन कार्ड जातीचा दाखला द्यावा मोफत धान्य वगैरे द्यावं विशेष सवलती देऊन या समाजाचे पुनर्वसन केलं जावं हा समाज महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील भालकी गावातील आहे मराठी भाषिक असल्यामुळे त्यातून हे स्थलांतरित झालेले आहेत
या समाजाची लोक वस्ती सोलापूर वेळापूर इंदापूर अकलूज निरनिम गाव अक्कलकोट तालुक्यामध्ये बोराटी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर गावाच्या शहराच्या बाहेर दहा-पंधरा किलोमीटरवर या लोकांची वस्ती असते पुणे मुंबई बाहेर शहरापासून दूर उघड्यावर राहतात उघड्यावरच संडास बाथरूम यांचे आहे लहान लहान मुलांची दयनीय अवस्था ऊन वारा थंडी पाऊस यापासून कसलेही संरक्षणाचे साधन नाही लहान मुलाचे आणि वृद्ध माणसांची खूपच तारांबळ हेळसांड हाल होत आहे अठरा विश्व दारिद्र्य आहे जनावरापेक्षाही यांचे जीवन खराब आहे जमीनदार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांचा जसा रातोरात जीआर काढून सर्वे केला जातो दाखला दिला जातो शोध घेतला जात आहे मग शासनाने ठरवावे आरक्षणाची गरज कोणाला आहे
आणि प्राधान्य कोणाला दिले पाहिजे आणि हा कुडमुडी जोशी समाज ओबीसी मध्ये एनटी ब मध्ये मोडला जातो अजून ह्यांना आरक्षणाचा गंधही नाही अरे यांच्याच पंक्तीमध्ये यांच्याच ताटामध्ये जर मराठा समाजाला तर याची काय अवस्था होईल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे अशा या भटक्या समाजाचा वाली कोणी आहे असं दिसत नाही यांना कोणाचेही कसलेही मार्गदर्शन नाही यांना लाडकी बहीण लाडका भाऊ मोफत राशन विधवा अपंगाचे अनुदान निराधार योजना मोफत शालेय शिक्षण जेवण कपडे पाठ्यपुस्तक कसलीही सुविधा मिळत नाही
त्यांच्या अगोदर या भटक्या समाजा साठी शासनाने विशेष बाब म्हणून एक समिती गठीत करावी ज्या महाराष्ट्रात 40 42 जाती आहेत त्या जातीचा सर्वे करून त्वरित त्यांना शासनाच्या सर्व सोयी आणि विशेष बाब म्हणून आर्थिक मदत कर्ज पुरवठा करावा धंद्यास प्राधान्य द्यावे पोपोट पाळण्यास सांभाळण्यास आता बंदी केलेली आहे इतर राज्यात बंदी नाही ती बंदी उठवावी अशी मागणी या समूहाकडून होत आहे बरेच नेते मंडळी त्यांना भेटून जातात परंतु अद्याप कोणीही काम केलं नसल्याचं सांगितलं आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी सुद्धा हा समाज अडगळीत आणि कितपत पडला आहे याचा शासनाने लोकप्रतिनिधीने गांभीर्याने विचार केला पाहिजे प्रत्यक्ष पाहणी करताना
गंगाराम कालोवा घायवत अकरन सजीवा शाइबर शिवाजी साधराम मोडे मोहब दादाराव घायवत देवराम नारायण घायवत वि जू काळवा भीरे विनोद शिवाजी भांड बालाजी सुन्ना शंकर भोडे मिथुन मित्रता घयवर संतोष विष्णुकटान धुर्वे सचिन रशियन घयवर गंगाराम
इत्यादी समाज प्रमुख उपस्थित होते
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा


