सोशल

शरणगाथा क्रमाशा.23

शरणगाथा क्रमाशा.23

कन्या गंगांबिका (गंगम्मा) यांच्याशी विवाह झाला. दरम्यान राजा बिजळाने आपली राजधानी मंगळवेढ्याहून कल्याणला हलवली. आता बसवण्णा कल्याण राज्याचे महामंत्री झाले. महामंत्री बसवराज ते महात्मा बसवण्णा या प्रवासाचे कल्याण साक्षीदार ठरले. नंतर काही दिवसांनी बसवण्णांचा निलांबिका (निलम्मा) यांच्याशी दुसरा विवाह झाला. महात्मा बसवण्णा यांना एक मुलगा झाला होता. परंतु दुर्दैवाने तो अल्पायुषी ठरला. त्या मुलाचे नाव बालसंगय्या असे होते.

बसवण्णांनी प्रत्येकास कार्यनिरत कार्यमग्न राहण्याचा मंत्र दिला. आपली आवड आणि कार्यक्षमतेनुसार काम निवडण्याचा, पर्याय निवडण्याचा (choice) अधिकार दिला. तोच कायक सिद्धांत होय. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार काम करणे अनिवार्य आहे. काम हे कैलासाइतकेच पवित्र आहे. म्हणजेच ‘कायकवे कैलास.’ काम हेच ईश्वर आहे. त्याला इंग्रजीत work is worship म्हटले जाते. ईश्वर प्राप्तीसाठी कोणतेही कर्मकांड, जप- तप, तीर्थयात्रा, होम हवन करण्याची गरज नाही. आपले दैनंदिन काम निष्ठेने करणे हा ईश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग असल्याचे बसवण्णांनी सांगितले. म्हणूनच कायक ही संकल्पना बसव सिद्धांताचा गाभा आहे. ‘नसे राऊळी अन् नसे मंदिरी, जिथे राबती हाव तेथे हरि’ हे त्याचे मराठी रुप होय. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘आराम हराम है’ याचे मूळ आपल्याला शरणांच्या ‘कायकवे कैलास’ या सूत्रामध्ये मिळते. ‘कायक’ नंतर बसवण्णांनी ‘

दासोह’ ही संकल्पना मांडली.

कायक हा उत्पादनाचा तर दासोह हा वितरणाचा सिद्धांत होय. आपल्या कमाईतील आपल्या गरजेपुरते स्वतःकडे ठेवून उर्वरित वाटा समाजाला परत करणे म्हणजे दासोह. दासोह ही संकल्पना व्यापक आहे. दानापेक्षा दासोह ही संकल्पना भिन्न आहे. दासोहामध्ये कर्तव्य भावना आहे. दासोहात घेणारा आणि देणारा दोघेही समान पातळीवर असतात. परंतु दान हे ऐच्छिक असते. देणारा श्रेष्ठ तर स्वीकारणारा याचक या अर्थाने कनिष्ठ असतो. दासोहात श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसतो. दातृत्त्वाचा दंभ दासोहात मान्य नाही. संपत्तीची निर्मिती आणि त्याचे योग्य वितरण व्यवस्था म्हणजे कायक आणि दासोह सिद्धांत होय. नऊ शतकानंतरही तो विचार कालबाह्य न ठरता समकालीन संदर्भात अधिक उपयुक्त वाटतो, हा बसवण्णांच्या विचारांचा विजय आहे. या महात्म्याने समाजातील प्रत्येकाने कायक योगी होण्याचा, कार्यमग्न राहण्याचा आग्रह धरला. आज सुमारे ९०० वर्षांनंतरही बसवण्णांची कामगिरी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्यांची ही कामगिरी युगायुगांची शिदोरी आहे.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button