सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 82

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
82

विचारीत असत. कुमार यशवंतराव सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने गणपतरावांशी चर्चा करीत असत. शेवटी यशवंतरावांना सत्यशोधक पंढरीनाथ पाटलांचे ‘फुले चरित्र’ या ग्रंथाच्या अध्ययनाचा सल्ला गणपतरावांनी दिला. तसे तर पुढे गणपराव चव्हाण सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते झाले
आणि ब्राह्मणेतर पक्षाचेही. इ. स. १९४६ साली यशवंतराव, आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहावेत म्हणून त्यांनी यशवंतरावांना फार आग्रह केला. या पहिल्याच निवडणुकीत यशवंतरावांचा विजय झाला. या विजयासाठी गणपतरावांनी आपल्या परीने परिश्रम घेतले. दरम्यान, त्यांना ‘क्षया’च्या आजाराने ग्रासले आणि याच आजारात गणपतराव चव्हाणांचे इ. स. १९४७ सालच्या डिसेंबर महिन्यात निधन झाले. अशा या थोर बंधुवत बंधूस यशवंतराव चव्हाणांनी इ. स.

१९६९ साली प्रसिद्ध झालेला ‘भूमिका’ हा वैचारिक ग्रंथ अर्पण केला. संदर्भ कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण

चव्हाण
हरिभाऊ लक्ष्मणराव (जन्म १८६६ मृत्यू २५ नोव्हेंबर १९३८)

सत्यशोधक समाजाचे उपदेशक, प्रचारक, प्रसारक, सत्यशोधक पुरोहित, सत्यशोधक ग्रंथ लेखक, विक्रेते हरिभाऊ लक्ष्मणराव चव्हाण यांचा जन्म इ. स. १८६६ च्या सुमारास मौजे नागाव, जिल्हा रायगड येथे झाला. सनातनी संस्कारात त्यांचे बालपण गेले. शेवटी आयुष्याच्या उमेदवारीसाठी त्यांनी मुंबई गाठली. छापखान्यात काम करून त्यांनी आरंभीचे बस्तान मुंबईत बसविले. पुढे छापखान्याची नोकरी सांभाळून सत्यशोधक तत्त्वज्ञानाचा परिचय (अभ्यास) करून घेतला, ते १९०४ ते १९२८ या कालखंडात विदर्भात फिरतीवर गेले. या चार वर्षांत त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार केला. दरम्यान, विदर्भात त्यांनी छापखाना टाकला; परंतु ही प्रेस जळाल्याने ते परत कोल्हापुरात परतले. बिनीचे सत्यशोधक ना. भास्करराव जाधव हे हरिभाऊ चव्हाणांचे मामेबंधू होते (मामाचा मुलगा, मेव्हणा), चव्हाण सत्यशोधक मताकडे वळण्याचा किस्साही मनोरंजक आहे. इ. स. १८९७ दरम्यान मुंबई येथे वास्तव्यास असताना वडिलांनी नागावला येऊन सत्यनारायण घालण्याचा निरोप हरिभाऊंना पाठविला. वडिलांच्या आग्रहाखातर चव्हाणांनी नागाव येथे येऊन सत्यनारायण घातला. दरम्यान, ग्रामपुरोहित उपलब्ध न झाल्याने हरिभाऊंनी अन्य एका पुरोहिताकडून सत्यनारायणाची पूजा बांधली. या प्रकरणी क्रोधित होऊन ग्रामपुरोहिताने हरिभाऊंवर दहा रुपये नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने समज दिल्याने ग्रामपुरोहितांनी दाखल केलेला दावा मागे घेतला. दरम्यान, घडून आलेल्या धार्मिक दहशतवादाने मानसिकदृष्ट्या दुखावलेले हरिभाऊ चव्हाण
सत्यशोधकमताकडे आकर्षिले गेले. येथून पुढे धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करून ते सत्यशोधक तत्त्वज्ञान आत्मसात करते झाले. हरिभाऊ चव्हाण पुढे सत्यशोधक धार्मिक विधी करू लागले. १९०१ मध्ये सत्यशोधक रामचंद्रराव धामणसकरांच्या भाच्याचे लग्न चव्हाणांनी मुंबई येथे लावले. १९०४ साली चव्हाणांच्या आई-वडिलांचे निधन झाले. मृत माता- पित्यांच्या अनुषंगाने संपूर्ण धार्मिक विधी चव्हाणांनी सत्यशोधक मते केले. पुढे १९१३ साली पुणे येथून जाऊन लक्ष्मणराव ठोसरांच्या मुलीचे लग्न त्यांनी लावले. यानंतर अनेक सत्यशोधक धार्मिक विधी चव्हाणांनी केले.

११ जानेवारी १९११ रोजी परशरामराव घोसरवाडकर देसाई इनामदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरकर सत्यशोधकांची एक बैठक होऊन कोल्हापूर सत्यशोधक शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेचे हरिभाऊ चव्हाण सचिव होते. १९१३ सालात या शाखेचा प्रचंड आवाका वाढला. या सुमारास या शाखेचे १५० सदस्य होते. कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरात सत्यशोधक धार्मिक विधींची मागणी वाढली, स्वतः हरिभाऊ चव्हाणांनी सर्व धार्मिक विधी केले. दरम्यान, गंगावेशीतील, पोवार यांच्या माडीवर सत्यशोधक पुरोहित शाळा सुरू केली.

या शाळेला आरंभीच ३० विद्यार्थी मिळाले. या विद्याथ्यर्थ्यांना चव्हाणांनीच शिकविले, पुढे या शाळेत मराठी मुलखातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे जागेचा आणि शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला. कोल्हापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांनी या पुरोहित शाळेला दरमहा ४० रुपये अनुदान मंजूर केले, तसेच गंगावेशीत, महात्मा फुले चौकात २१६८ क्रमाकांची १२५२ चौ. मीटर जागा कोल्हापूर

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button