मंडलनामा क्रमशः 29.नक्षलवाद्यांनी अडवले

मंडलनामा क्रमशः
29.नक्षलवाद्यांनी अडवले
महाराष्ट्रभर ठिकठिकाणी सभा मेळाव्यांची धूम सुरू होती. या काळात विदर्भातील बल्लारशा-राजुरा येथे मुस्लिम ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या गावच्या परिसरात पेपर मिल आहेत. मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली. स्थानिक कार्यकर्ते जोमात होते. मी मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलो. लोकही जमले, तेवढ्यात मेळाव्याच्या ठिकाणी पाच ते सात जण आले व त्यांनी मला सोबत येण्यास सांगितले. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही कोण आहात व कोठे जायचे आहे?’ ‘आता मेळावा सुरू होणार असल्याने मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मेळावा झाल्यानंतर जाऊ’, असे सांगितले.
त्यांनी मला पुन्हा एकदा सोबत येण्यास सांगितले. ते सुशिक्षित दिसत होते. राहणीमान नीटनेटके, बोलण्यात दरडावणी नव्हती. त्यांना पाहून स्थानिक कार्यकर्ते जमा झाले, पण त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. ‘तुम्ही सोबत चला, आम्हाला तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. आमच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मेळावा घ्या’, असे त्या लोकांनी निग्रही आवाजात सांगितले. स्थानिक मंडळी गप्प आहेत व त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मेळावा होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यासोबत जाण्यास तयार झालो.
त्यांनी मला गावाजवळ असलेल्या एका डोंगरावर नेले. माझी कसून चौकशी केली. मी कोण?, कोठून आलो?, काय करतो ?, मुस्लिम ओबीसी म्हणजे काय ? असे अनेक प्रश्न विचारले. मी त्यांना ओबीसी, मंडल आयोग, कलम ३४०, भारतीय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ, मंडल आयोगानुसार मुस्लिमांना महाराष्ट्रात सवलती मिळाव्यात यासाठी केलेले प्रयत्न, निघालेले शासकीय जीआर याची माहिती दिली. त्यांनी माझी उभी-आडवी चौकशी केली. कसून चौकशीनंतर त्यांचे समाधान झाले व मला सभास्थळी आणून सोडले.
सभा पार पडली. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. सभा संपल्यानंतर मी स्थानिक मंडळीकडे विचारणा केली असता ते लोक नक्षलवाद समर्थक असल्याचे समजले. ‘तुम्हाला सोबत घेऊन गेल्यानंतर आम्हाला भीती वाटली. तुम्हाला सोडतात की नाही, अशी शंका येत होती’, असे त्यांनी सांगितले. तुम्ही त्यावेळी बोलला का नाहीत, असे मी विचारले असता, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांच्या मौनातच उत्तर होते.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




