सोशल

एकता परिषदेच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप माळी यांची नियुक्ती

4) एकता परिषदेच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप माळी यांची नियुक्ती

कळंब तालुक्यातील नागझरवाडी येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप उर्फ बाळासाहेब मगन माळी यांची एकता परिषदेच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्याचे गृह निर्माण आणि इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे यांच्या मार्गदर्शनात संस्थापक प्रदेशाध्यक्ष श्री अभिमन्यू मामा उबाळे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे निवडीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी कळंब तालुका अध्यक्ष म्हणून रांजणी येथील श्री धीरज आगरकर, तालुका कार्याध्यक्ष पदी मोहा येथील बिभीषण माळी तर तालुका उपाध्यक्ष पदी बोरगाव बु येथील कृष्णा जगताप यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजचे एकत्रिकरण करून समाजाचा विकास साधण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करावा असे आवाहन अभिमन्यू उबाळे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना केले. यावेळी मराठावाडा विभागीय अ ध्यक्ष श्री संजय आढाव,शामराव काळे, विभागीय उपाध्यक्ष जयप्रकाश सारंग, संजय जाधव,सावता माळी, मनोज माळी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

शुभेच्छुक:-अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button