महात्मा बसवण्णांचा आणि हडपद अप्पण्णांचा फोटो दिसतो. इस्त्री- लाँड्रीच्या दुकानात माचय्यांची-माचीदेवांचे काही ठिकाणी फोटो दिसतात.

महात्मा बसवण्णांचा आणि हडपद अप्पण्णांचा फोटो दिसतो. इस्त्री- लाँड्रीच्या दुकानात माचय्यांची-माचीदेवांचे काही ठिकाणी फोटो दिसतात. अनेक विणकर बांधवांच्या घरी एक एक धागा विणणाऱ्या दासिमय्यांची छायाचित्रे पाहताना मन अगदी भरून येते. सीमावर्ती भागात परंपरेने चप्पल व्यवसाय करणारे अनेक घराणी आहेत. त्यांच्या दुकानात हरळय्या आणि कल्याणम्मा आपल्या मांडीच्या कातडीने चप्पल शिवत आहेत, असे फोटो दिसतात. त्याच फोटोत एका कोपऱ्यात बसवण्णा आणि महादेव – शिवही दिसतात, आशीर्वाद देण्याच्या पोजमध्ये.
काही ठिकाणी संत रोहिदास महाराज यांचेही फोटो हमखास दिसत आहेत. सोलापूर, गुलबर्गा (बांबू बाजार) बार्शीसह अनेक गावांत बुरुड व्यावसायिकांची स्वतंत्र गल्ली आहे. त्यांच्या दुकानात केतय्यांच्या तसबिरी दिसतात. त्यांचा उल्लेख ‘केतेश्वर महाराज’, ‘केतेश्वर’, ‘केतय्या महाराज’ असा होताना दिसतो. असो. लिंगायत ही एक संस्कृती आहे, स्वतंत्र जीवनपद्धती आहे. म्हणूनच कोण कितीही नाकारले तरी लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहेच. त्याचा अतिशय सहजपणे घडलेला, घडणारा आणि तितकीच महत्त्वपूर्ण घटना मी मुद्दाम सांगणार आहे. असे प्रसंग आपल्याही अवतीभवती घडले असतील. कदाचित आपले लक्ष नसेल. आपण प्रयत्नपूर्वक नोटीस केले तर आपल्यालाही हा अनुभव येईल, ही खात्री आहे. म्हणूनच ‘लिंगायत स्वतंत्र धर्मच’ या भूमिकेस धर्ममार्तंड काय म्हणतात यापेक्षा लोकजीवन काय सांगते, हे समजून घेणे महत्त्वाचे वाटते.
झाले असे की, सर्वत्र गणेशोत्सवाची धूम होती. गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. मोठ्या गणपती मंडळांची खरेदी झाली तरी छोटे मंडळ आणि घरच्या गणपतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. या गर्दीत एक साठीतले आजोबा आपल्या नातीला घेऊन गणेश मूर्ती न्याहाळताना दिसले. अनेक विक्रेत्यांकडे त्यांनी चौकशी केली. गणेशमूर्तीच्या किमतीवरून नव्हे तर रचनेवरून मूर्तीची निवड होत नव्हती. त्यांना अपेक्षित मूर्ती मिळेपर्यंत अस्वस्थ दिसले. अनेक मूर्तिकारांकडील मूर्ती न्याहाळताना नातीशी त्यांची चर्चा अखंडितपणे सुरू होती. त्यांना मूर्तीच्या कपाळावर विभूती, शरीरावर विभूती असलेली मूर्ती हवी होती. त्याच वेळी गणपतीच्या गळ्यात जानवे नव्हे तर इष्टलिंग हवे होते. गळ्यात इष्टलिंग असलेली गणेशमूर्ती मिळण्याची शक्यता कमी असली तरी अशा मूर्तीच्या शोधात ते होते.
शेवटी एका मूर्तिकार विक्रेत्याने त्यांना अपेक्षित मूर्तीबद्दल सांगितले. त्यांचा चेहरा खुलला, नातीला घेऊन त्यांनी त्या स्टॉलकडे आपला मोर्चा वळवला. स्वतः मूर्तिकार असलेल्या विक्रेत्याच्या कपाळावर त्रिपुंड ठसठशीत विभूती पाहून आजोबा सुखावले. मग त्यांचे लक्ष गणेश मूर्तीकडे गेले. अंगभर विभूती लावलेला गणेश पाहून त्यांना आकाश हाती लागल्याचा
शरणगाथा


