मतदार जागृती-11.. पहिल्या व दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवणारे तिसरे डावे-पुरोगामी..!

मतदार जागृती-11..
पहिल्या व दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवणारे
तिसरे डावे-पुरोगामी..!
1) विषम समाजात सत्तेवर राजकीय पक्ष नसतात, शोषक जाती व शोषक वर्ग सत्ताधारी असतात.
2) भारतात ब्राह्मण+बनिया+क्षत्रिय “जाती” व त्या जातीतील अंबानी+अदानीसारखे “वर्ग” सत्तेत असतात
3) हे सत्ताधारी जात+वर्ग किमान दोन राजकीय पक्षांची निर्मिती करतात. एक पुरोगामी+समन्वयवादी (कॉंग्रेस) व दुसरा आक्रमक जात+वर्गवादी (भाजप)
4) सत्ताधारी जात+वर्गांनी निर्माण केलेल्या या दोन राजकीय पक्षांमध्ये करार झालेला असतो व ते ठरल्याप्रमाणे आलटून पालटून सत्तेवर येत असतात.
5) हे दोन्ही राजकीय पक्ष दर पाच वर्षांनी निवडणूक नावाची “नुरा कुस्ती” खेळत असतात.
6) स्वतःला क्रांतिकारक म्हणविणारे डावे-पुरोगामी या नुरा कुस्तीच्या खेळात कोणाची तरी एकाची बाजू घेऊन टाळ्या वाजवत असतात.
7) 1977 साली या डाव्या-पुरोगाम्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात संघ-जनसंघासाठी टाळ्या वाजवल्या आणी आता 2024 साली संघ-भाजपाच्या विरोधात कॉंग्रेससाठी टाळ्या वाजवत आहेत.
8) एखाद्या मर्दाला मुलगा झाल्यावर त्याच्या अंगणात जाऊन टाळ्या वाजवणारे डावे-पुरोगामी “A-Team” बनून सत्ताधारी कधीच होऊ शकत नाहीत.
-प्रा श्रावण देवरे,
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




