मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापिताचे राजकारण

🟡🟡🟡🟡मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापिताचे राजकारण🔴🔴🔴🔴🔴
१. मराठ्यांचे ओबीसीकरण : राजकीय लोकशाहीकरणाला आव्हान?
यशवंत झगडे
आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. एका बाजूला मराठा संघटना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची जोरदार मागणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला धनगर संघटना (जे सध्या भटक्या जमाती प्रवर्गात असून ओबीसी प्रवर्गांतर्गत त्यांना ३.५% आरक्षण मिळते.) त्यांच्या ओबीसी दजएिवजी अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून राज्यातील आदिवासी संघटना धनगरांना विरोध करत आहेत आणि ओबीसी संघटना मराठ्यांच्या मागण्यांना विरोध करत आहेत.
आरक्षणाच्या दोन्ही मागण्या या प्रदीर्घ असल्या तरी मराठा आंदोलनाने नुकतेच घेतलेल्या हिंसक वळणाने राज्यातील मराठा आणि बिगर मराठा मागासवर्गीय गटांमधील सामाजिक सलोख्यामध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे.
ओबीसीकरणाच्या मराठा मागणीचे मूळ
मराठा-कुणबी हा एक मध्यम शेतकरी जातींचा समूह असून, ज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांपासून ते पूर्वीचे सरदार, राजकर्त्या वर्गाचा समावेश आहे. या समूहात असे स्तरीकरण असले तरी राजकीय क्षेत्रात त्यांचे सहकार्य दिसून येते. अभ्यासकांच्या अंदाजानुसार मराठ्यांची लोकसंख्या सुमारे २४%, कुणबी अंदाजे ७%, तर ४०९ जाती असलेला ओबीसी हा सुमारे २७% आहे, परंतु जातनिहाय जनगणनेच्या अभावामुळे नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.
मराठा आंदोलकांची मुख्य मागणी ही राजकीय आरक्षण वगळून शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील संधीकरिता आरक्षण अशी होती. केंद्र सरकारकडून २०१९ मध्ये आर्थिक दुर्बल विभाग (EWS) वर्ग सुरू करून ही मागणी पूर्ण करण्यात आली होती. मराठा आरक्षणाबाबत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत, EWS आरक्षणाचा लाभ घेणारा सर्वात मोठा गट मराठा असल्याचे नमूद करण्यात आले. यावर्षी, अंदाजे ७६% शिक्षणासाठी आणि ८४% नोकऱ्यांसाठी
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




