सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 76

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
76
घोरपडे यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे :-
१. कर्मवीर भाऊराव पाटील, २. बाबासाहेब आंबेडकर
३. महात्मा फुले, ४. छत्रपती शाहू
५. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
७ नोव्हेंबर १९५३ साली प्रसिद्ध झालेल्या महात्मा फुले ग्रंथात ‘सत्यशोधक चळवळ व तिचे टीकाकार’ या प्रकरणाचे अध्ययन केल्यावर ए. के. घोरपडे हे हाडाचे सत्यशोधक असल्याचे त्वरित लक्षात येते. अशा या सत्यशोधकाचे २६ जुलै २००२ रोजी पुणे येथे निधन झाले.
संदर्भ – १. दैनिक प्रभात ५-१-१९९७ तरुण खाटडिया यांचा लेख, २. दैनिक पुढारी २६-७-२००३ डॉ. य. ग. शिंदे यांचा लेख, ३. मराठामार्ग सप्टेंबर १९९६
घोरपडे
वामनराव नरसिंहराव (४ मे १८९७ ६ मार्च १९८१)
सत्यशोधक संपादक, कथाकार, चरित्रकार वामनराव नरसिंहराव घोरपडे हे पदवीधर (बी. ए.) असून, वर्धा जिल्हयातील तळेगाव टालाटुले येथे त्यांचा ४ मे १८९७ रोजी जन्म झाला. ते एक कडवे सत्यशोधक होते. पुढे वामनराव घोरपडे यांनी नागपूर येथून ‘तरुण महाराष्ट्र’ हे नियतकालिक चालविले. तसेच ब्रिजलाल बियाणी यांनी सुरू केलेल्या ‘राष्ट्रदूत’चे संपादकपदही त्यांनी भूषविले. पुढे १९३६ मध्ये त्यांनी सत्यशोधक व्यंकटराव गोडे यांचे २२ पानी अल्पचरित्र लिहून प्रसिद्ध केले. या चरित्राचे मुद्रक गं. ना. सराफ हे होते.
वामनराव घोरपडे अमरावती येथील सत्यशोधक डॉ. पंजाबराव देशमुखांचे सत्यशोधक चळवळीतील सहकारी होते. इ. स. १९२७ साली मोर्शी येथे लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हिंदू परिषदेत वामनराव घोरपडे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला होता. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पक्षाचे कार्यकर्ते स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षात विलीन झाले होते. शेष कार्यकत्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही सत्यशोधक आणि काही जलसाकार आपापल्या परीने सत्यशोधक चळवळीत कार्यरत होते. हाच धागा पकडून वामनराव घोरपडे यांनी ‘महाराष्ट्रातील बहुजन समाजवादाची मीमांसा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. हा ग्रंथ ज्योती प्रकाशन, नागपूर या प्रकाशनाने प्रकाशित केला.
वामनराव घोरपडे यांनी सत्यशोधक मताच्या तेरा कथा १९४४ सालापूर्वी लिहून पूर्ण केल्या होत्या. या कथांमधून प्रेम, प्रबोधन, अंधश्रद्धा निवारण, रूढीचे खंडण, बाधित परंपरा आदी बाबींचे चित्रण केले होते. ‘या कथांमधून स्त्री स्वातंत्र्या’चा पुरस्कार मोठ्या हिरीरीने घोरपडे यांनी केला होता. हा कथासंग्रह पुढे नागपूर येथून ‘योगायोग’ शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला.
वामनराव घोरपडे यांनी नागपूर येथून राष्ट्रीय जागृती मालेचा प्रारंभ केला. दोन- चार छोटे-छोटे ग्रंथ या मालेने काढले. ‘विचार’ व ‘भाषा’ आदींचे वाङ्मयमूल्य कसदार आहे. अशा या सत्यशोधकाचे ६ मार्च १९८१ रोजी वर्धा येथे निधन झाले. संदर्भ १. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य-डॉ. अशोक चोपडे, २. जागतिक कृषक क्रांतीचा विधाता लोकनेता डॉ. पंजाबराव देशमुख
– वीर उत्तमराव मोहिते.
घोलतकर
सखाराम हरी
(मृत्यू – १९ ऑक्टोबर १९२७)
सत्यशोधक सखाराम हरी घोलतकर हे कट्टर सत्यशोधक असून ब्राह्मणेतर पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील वसई येथून ‘प्रतिनिधी’ हे नियतकालिक सुरू केले होते. ते एक विद्याव्यासंगी सत्यशोधक होते. अशा या सत्यशोधकाचे दिनांक १९ ऑक्टोबर १९२७ रोजी निधन झाले. संदर्भ – विजयी मराठा, अंक २४-१०-१९२७
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




