रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ अंध मुलीची MPSC परीक्षेत बाजी

**अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
जळगाव
दैव जाणिले कुणी जाको राके साईया मारना सके कोईया रेल्वेस्थानकाच्या कचरा
पेटीत सापडलेल्या अनाथ अंध मुलीची MPSC परीक्षेत बाजी***
जन्मतः अंध असल्याने आई- वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. कचरा पेटीतनं बाहेर निघून आता ती सोन्याच्या पेटीकोट मध्ये जाण्याच्या तयारीत आहे मात्र आता त्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करीत माला ही एमपीएससीच्या ‘लिपिक ‘गट क’ मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
साधारण २० वर्षांपूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला ही जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत आढळून आली होती. पोलिसांनी आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध घेतला. परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांडहोम मध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशान्वये पोलीसांनी तिला वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारुन माला हिला वडील म्हणून स्वतःचे नाव दिले.
त्या आधारे तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला, इत्यादी कागदपत्राची पुर्तता करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अनाथ, बेवारस, दिव्यांग १२५ मुला-मुलींसोबत बालगृहात मालाचा जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षणही सुरू ठेवले.येथील विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी परीक्षा २०१८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्रा. प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली. २०१९ पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली.
येथील युनिक अकेडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने एमपीएससी परीक्षेची तयार केली.
तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक (टंकलेखक) परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला एवढ्यावरच थांबायचे नाहीतर युपीएससी परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे. आत्ता तिचे आई-वडील त्यांना माहीत झाले तरी ते तोंड दाखविण्याच्या लायकीचे राहिलेले नाही त्यामुळे आता त्यांच्या आई-वडिलांचा कधीही शोध घेऊ नये सांभाळ केला
तेच त्यांचे आई-वडील आहेत सांभाळ केलेल्या त्या आई-वडिलांना विनम्र वंदन नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड एवरीथिंग इज पॉसिबल केल्याने होत आहे ते केलेच पाहिजे त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही इच्छा असेल तर मार्ग दिसेल! या मुलीचा सर्व मुला मुलींनी आदर्श घ्यावा आणि आपली प्रगती आपणच करावी कोणत्याही पालकांना आई-वडिलांना दोष देऊ नये स्वतःची कर्तबगारी दाखवावी हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा!
अप्रतिम यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐
तिचे स्वप्न पूर्ण व्हावे नेहमीच यशाचा आलेख वाढता राहावा हीच निर्मिकचरणी प्रार्थना काही मदत लागल्यास योग्य वेळी संपर्क करा सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01
🙏🙏🙏🙏
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴


