भाऊ कातोरे व संजय मते यांना पालक मंत्री डॉ.विजय गावित यांचे आश्वासन

भाऊ कातोरे व संजय मते यांना पालक मंत्री डॉ.विजय
गावित यांचे आश्वासन
प्रतिनिधी भंडारा
गोसे प्रकल्प अधिनस्त ज्या
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे अशा शेतकऱ्यांच्या मृत्यू परांत त्यांचे वारस किंवा रक्ताच्या नातेवाईकांच्या नावे सरसकट प्रकल्पग्रस्त प्रमाण पत्र देणे काळाची गरज असतांना सबंधित विभाग सदर प्रमाण पत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याने याबाबत १३एप्रिल २०२४ रोजी जिल्हाधिकारी योगेश
कुंभेजकर यांच्याशी भेटून चर्चा करण्यात आली असता त्यांनी यास्तव शासनाकडे पाठपुरावा करून मार्गदर्शन मागवून प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे याबाबत अखेर प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते तथा जिल्हा पुनर्वसन समिती चे अशासकीय सदस्य भाऊ
कातोरे आणि ओ बी सी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी या मागणी बाबत शासन प्रशासनाच्या सबंधित विभागाला लेखी पत्र सादर करून सदर विषय स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वी तातडीने निकाली काढण्याची विनंती पूर्वक मागणी केली होती मात्र याकडे हेतू पुरसस्पर दुर्लक्ष केल्यास नाईलाजास्तव १५ ऑगस्ट २०२४ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता
त्यामुळे जिल्हा पुनर्वसन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाऊ कातोरे
आणि संजय मते याची समजूत घालून १४ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ.गावित यांचे भंडारा जिल्ह्यात आगमन होत असल्याचे त्यांच्याशी शासकीय विश्रामगृह कक्षात भेट घालून चर्चा करण्याचे सांगितले असता याबाबत पालक मंत्री डॉ गावित यांच्याशी भाऊ कातोरे आणि संजय मते यांनी प्रकल्प ग्रस्त प्रमाण पत्र व इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच आ.डॉ.
परिणय फूके यांना अवगत करून सदर मागणी निकाली काढण्याचा आग्रह धरण्यात आला असता याप्रकरणी शासन स्तरावर पाठपुरावा करून सविस्तर चर्चा करण्यासाठी भाऊ कातोरे आणि संजय मते यांना २० ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई येथे पाचारण करण्यात आले असून मागणी मान्य करण्याचे आश्वासन पालक मंत्री डॉ गावित यांनी दिले असल्याने आत्मदहनाचा आंदोलन मागे घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य भाऊ
कातोरे आणि ओ बी सी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी दिली आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे व त्यांची नोकरी करितामर्यादा संपली आहे. वारस नाला तर सरसकट प्रमाणपत्र देण्याची काळाची गरज असताना
शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


