सोशल

महात्मा फुल साहित्य आणि चळव क्रमशा.41

महात्मा फुल साहित्य आणि चळव क्रमशा.41

उसंत मिळताच नंतरच्या पाच सहा वर्षांत जोतीरावांनी सर्वांच्यासाठी तौर मुलींच्या शाळा आणि महारमांग आदी अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी आणको तीन शाळा अशा एकंदर सहा शाळा स्थापन केल्या. अस्पृश्यांना शिक्षणाची ओढ नव्हती. तेव्हा लहुजी मांग आणि राणवा महार यांनी आपल्या लोकांची समजुत घालून मुलांना शाळेत धाडण्यास प्रवृत्त केले. या कामात त्यांना आपल्या उच्च्चवर्णीय मित्रांचे सुरुवातीपासून सहकार्य मिळाले. या शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी ज्या दोन समित्या नेमल्या, त्यात जगन्नाथ सदाशिव, अण्णा सहस्त्रबुद्धे, केशव शिवराम जोशी, विष्णू मोरेश्वर भिडे, बापू रावजी मांडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णु शास्त्री पंडित, सदाशिवराव गोवंडे, मोरोपंत वाळवेकर, सखाराम यशवंत, बाबा मनाजी डेंगळे हे लोक होते.

सर आस्किन पेरी, लुम्सडेन, रीव्हज, कँडी इत्यादी सरकारी अधिकाऱ्यांची व मिचेल प्रभृति खिस्ती धर्मोपदेशकांची सक्रिय सहानुभूती त्यांनी संपादन केली होती. शाळांना दक्षिणा प्राईझ कमिटीचे अनुदानही मिळाले होते. जुन्या पिढीतील बहुसंख्य लोकांचा तीव्र विरोध असला, तरी नव्या पिढीतील सुशिक्षितांनी जोतीरावांच्या या शिक्षणकार्याचे मनापासून स्वागत केले होते. विष्णुपंत थत्त्यांसारख्यानी शिकवण्याचा कामात मदत केली. केशवराव भवाळकर (जोशी) यांनी सावित्रीबाईंना स्वयंशिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन केले. कुणी थोड्याबहुत देणग्या देऊन मदत केली. इतरांनी नुसता नैतिक पाठिंबा दिला. परंतु लोकक्षोभाला खंबीरपणे तोंड देण्यास मात्र जोतीराव-सावित्रीबाईंनाच पुढे व्हावे लागले. या कामगिरीबद्दल सरकारने दोनशे रुपयांची शालजोडी देऊन विश्रामबागवाड्यात त्यांचा जाहीर सत्कार केला. त्याला उत्तर देताना त्यांनी ‘ईश्वराची इच्छा व सद्सद्विवेकबुद्धीचा आदेश यांना स्मरून आपण आपले कर्तव्य केले’; असे म्हटले होते. त्यांच्या ईश्वरनिष्ठ मानवतावादावरील क्रियाशील श्रद्धेचेच हे द्योतक आहे.

जोतीरावांच्या जीवितकार्याचे १८४८-१८६५ आणि १८६५-१८९० असे दोन कालखंड पडतात. पहिल्या कालखंडात त्यांनी स्त्रीदास्यविमोचन आणि दलितोद्धार या प्रश्नांकडे लक्ष दिले. उच्चवर्णियांच्या सुधारणावादातही स्त्रियांच्या प्रश्नांनाच अग्रक्रम मिळाला होता. जांभेकरांच्या ‘दर्पण’ पत्रातून त्या प्रश्नांवर

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button