सोशल

*आदिवासी वयोवृद्ध विधवा महिलेच्या सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीतील गुंडगिरीच्या जोरावर बेकायदेशीरपणे मुरमाची चोरी

*आदिवासी वयोवृद्ध विधवा महिलेच्या सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीतील गुंडगिरीच्या जोरावर बेकायदेशीरपणे मुरमाची चोरी

करणाऱ्या चावरे कुटुंबीय, जीसीपी मालक-चालक, मुरूम वाहणारे ट्रॅक्टर मालक-चालक यांच्यावर गुन्हे दाखल करून जमिनीची केलेली नुकसान भरपाई श्रीमती रुक्‍मीनबाई महादू कारलेवाड या वयोवृद्ध आदिवासी विधवा महिलेस भरून द्यावी.*

– लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांची प्रशासनाकडे मागणी.

( लोकाधिकार प्रतिनिधी )
लातूर :- लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी गावात आदिवासी विधवा महिलेच्या सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीतील मुरमावर दिवसाढवळ्या दरोडा पडला असून यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्या सर्वावर गुन्हे दाखल करून जमिनीची केलेली नुकसान भरपाई श्रीमती रुक्‍मीनबाई महादू कारलेवाड या वयोवृद्ध आदिवासी विधवा महिलेस भरून द्यावी, अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गुंजोटी गावातील तलाठी नेमका करतोय काय ?
गावामधून सिलिंग मधल्या जमिनीतील मुरूम खोदून घेऊन जात असलेले माहिती असून सुद्धा तलाठ्याने वरिष्ठांना रिपोर्ट का केला नाही ? असाही प्रश्न लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी विचारला आहे.
लाखो रुपया चा मुरूम दिवसाढवळ्या जेसीपी लावून ट्रॅक्टरने घेऊन जात असताना गुंजोटी गाव ज्या मंडळ अधिकाऱ्याच्या कक्षेत येते तो मंडल अधिकारी काय झोपा घेत आहे का ? असेही पन्हाळे यांनी म्हटले आहे.
९ ऑगस्ट २०२४ रोजी तहसीलदार आणि प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन अजून कुंभकर्णाच्या भूमिकेत असण्याचे कारण काय ?
आदिवासी कुटुंबातील महादू जेटीबा कारलेवाड यांना सिलिंग मधून १९७६ मध्ये मिळालेली ही जमीन आहे.
आता महादू कारलेवाड हे मयत आहेत. २०१० साली त्यांचा २८ फेब्रुवारी रोजी वर्धापकाळाने मृत्यू झाला आहे.
मयत महादू जेटीबा कारलेवाड यांच्या मागे त्यांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी आणि चार विवाहित मुली आहेत.
सिलिंग मध्ये कारलेवाड यांना मिळालेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर वारस हक्काने सन २०२० मध्ये कारलेवाड यांची विधवा पत्नी आणि त्यांच्या चार विवाहित मुली यांच्या नावे अहमदपूर न्यायालयाने दिलेल्या वारस प्रमाणपत्रानुसार सातबाराला वारस हक्काने नोंद झाली.
१. पत्नी रुक्मीणबाई कारलेवाड, वय ७० वर्षे, धंदा घरकाम, रा. गुंजोटी ता. अहमदपूर जि. लातूर
२. विवाहित मुलगी अंजना भ्र. नवनाथ भनगीरे, वय ४५ वर्षे, धंदा घरकाम, रा. आष्टा ता. चाकूर जि. लातूर
३. विवाहित मुलगी रंजना भ्र. रमाकांत कोलपुसे, वय ३५ वर्षे, धंदा घरकाम, रा. धानोरा (बु) ता. अहमदपूर जि. लातूर
४. विवाहित मुलगी धोंडुबाई भ्र. मारोती रुईलवाड, वय ४० वर्षे, धंदा घरकाम; रा. रेती बंदर मुंब्रा मुंबई ता. जि. मुंबई
५. विवाहित मुलगी अर्चना उर्फ रंजना भाऊसाहेब रायनुळे, वय ३० वर्षे, धंदा घरकाम, रा. काशीलिंगेश्वर नगर, फुलाबाई बनसोडे हॉस्पीटल जवळ, लातूर. ता.जि. लातूर
गुंजोटी गावात अवैध धंदे करणारे चावरे तिघे बंधू गुंडगिरीच्या जोरावर आदिवासी विधवा महिलेच्या सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीतील मुरमावर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत.
सिलिंग मध्ये दिलेल्या जमिनीतील अवैधपणे मुरमाची चोरी करून बेकायदेशीरपणे मुरमाचा उपसा करणे आणि एका आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेवर अन्याय करणे या प्रकरणी चावरे कुटुंबीयांवर किनगाव पोलीस स्टेशनला अहमदपूर तहसीलदार यांनी गुन्हा नोंद केला पाहिजे. तसेच गुन्हा नोंद करून लाखो रुपयाचा विकलेल्या मुरमाची वसुली करून संबंधित आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेला तिची भरपाई अहमदपूरच्या तहसीलदार यांनी करून दिली पाहिजे.
आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेच्या सिलिंग मध्ये मिळालेल्या जमिनीतील मुरमाची विक्री करणारे चावरे बंधू आणि हा मुरूम विकत घेणारे जे कोणी असतील ते गुत्तेदार तसेच जमिनीतील त्या मुरमाचे खोदकाम करणारे जेसीपी मालक, चालक, मुरमाची अवैद्य वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक, चालक यांच्यावर मुरमाच्या चोरीप्रकरणी जबरी गुन्हे नोंद झाले पाहिजेत, अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती वैशाली ठाकूर घुगे मॅडम याप्रकरणी लक्ष घालून एका आदिवासी विधवा वयोवृद्ध महिलेला न्याय देतील का ?
कर्तव्यात कसूर करून गुंजोटी गावात अवैद्य मुरमाचे खोदकाम आणि मुरमाची विक्री करून वाहतूक होत असताना गप्प राहणारे तलाठी जायभाये आणि मंडलाधिकारी नागदरे यांच्यावर अहमदपूरच्या तहसीलदार पांगरकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कठोर कार्यवाही केली पाहिजे.
तसेच संबंधितांकडून ती जमीन पूर्ववत वाहतुकीस योग्य करून त्या वयोवृद्ध महिलेला तिच्या जमिनीची केलेली संपूर्ण नुकसान भरपाई मिळवून पूर्ववत त्या महिलेच्या ताब्यात द्यावी, आणि वयोवृद्ध विधवा आदिवासी महिला श्रीमती रुक्‍मीनबाई महादू कारलेवाड यांना लातूर जिल्हा प्रशासनाने न्याय द्यावा, अशी मागणी लोकाधिकार संघाचे व्यंकटराव पनाळे लोकाधिकारप्रमुख यांनी केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button