सोलापूरराजकारण

मंगळवेढ्यात महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ — हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन**

**दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

मंगळवेढ्यात महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ — हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन**


मंगळवेढा येथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि नारळ फोडून पार पडला.
हा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय समाधान दादा आवताडे, तसेच सोलापूर जिल्हा भाजप अध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना चव्हाण, भाजपचे प्रदेश सदस्य व निवडणूक प्रभारी आदरणीय राजू बापू सुरवसे, आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष प्रकाश आप्पा गायकवाड, माजी नगराध्यक्ष अशोकरावजी माळी साहेब, भाजप शहराध्यक्ष नागेजी डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगरपालिका पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांची सुरुवातीलाच ओळख करून देण्यात आली.

आमदार समाधान आवताडे यांनी गेल्या चार–पाच वर्षांत तालुक्यात केलेल्या विकासकामांचा तपशीलवार लेखाजोखा जनतेसमोर मांडला.

यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब म्हणाले की,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि मी — ही एक मजबूत विकासाची साखळी आहे. मंगळवेढा नगरपालिका भाजपच्या ताब्यात आली तर कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

संतांच्या भूमीत भव्य विकास आराखडा

मंगळवेढा ही संतांची पवित्र भूमी असून येथे 14 संत होऊन गेले आहेत —
महात्मा बसवेश्वर, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, दामाजीपंत आणि इतर दुर्लक्षित संतांच्या सन्मानार्थ
➡ संतांचे तीर्थक्षेत्र विकास आराखडा
➡ भव्य संत स्मारक
लवकरच मंजूर करून उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की,
“अंडरग्राउंड गटार, नियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य, शाळा–शिक्षण, संतांचे तीर्थक्षेत्र, महात्मा बसवेश्वर स्मारक — या सर्व विकासकामांसाठी निधी फक्त भाजप सरकारकडूनच मिळू शकतो. विरोधी पक्षांना निवडून दिले, तर निधी कोणाकडे मागणार?”

त्यांनी भाजप उमेदवारांना कमळ चिन्हावर आणि मित्रपक्ष अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हावर भरघोस मतदान करून विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आमदार समाधान दादा आवताडे यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला.

दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01 — हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये नक्की जोडा

बातमी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड, कॉमेंट करा
बेल आयकॉन दाबा विसरू नका

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button