सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 57

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः57
नियोजित अधिवेशन घ्यावे म्हणून मुद्दाम तरवडी येथे जाऊन सत्यशोधक मुकुंदराव पाटलांची १९४९ साली त्यांनी भेट घेतली होती. मात्र, इसारवाडी येथे दोनदिवसीय अधिवेशनाचे नियोजन होणे जरा कठीण होईल म्हणून अधिवेशन आयोजनाचे प्रकरण रेंगाळत राहिले, नंतर पुन्हा त्यांनी १९५३ साली इसारवाडी येथे अधिवेशन व्हावे म्हणून प्रयत्न केले; मात्र इसारवाडी येथे आतापर्यंत अधिवेशन झालेच नाही. पुढे ४ डिसेंबर १९६७ रोजी ज्येष्ठ सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे कर्करोगाने निधन झाले. या दुःखद प्रसंगीही ते तरवाडी येथे धावून गेले.
भानुदासराव निरक्षर असले तरी त्यांनी इसारवाडीतील मुलांसाठी स्वतःच्या घरात काही दिवस रात्रीची शाळा सुरू केली होती. त्यांच्याच प्रयत्नाने इसारवाडी येथे १९५७ सालच्या सुमारास जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन झाली. वेळप्रसंगी ते गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाईही करत असत. ते संध्याकाळी गावातील मुख्य भागात कंदिलही लावत असत. तसेच सामूहिक भोजनाच्या पंक्तीला ते सत्यशोधक श्लोकही म्हणत. अशा या निःस्पृह सत्यशोधकाचे १९९० साली पुनर्वसित इसारवाडी गावी निधन झाले.
संदर्भ – १. नामदेवराव भानुदासराव खोंडे (६७) इसारवाडीकर यांची मुलाखत्त, २. उत्तमराव माधवराव पाटील (७५) तरवडीकर यांची मुलाखत
गणपती ऊर्फ
हरी महाराज
(जन्म १८८७)
वारकरी संप्रदायात रमणारे; परंतु त्याला आचरणात सत्यशोधक टच देणारे गणपती ऊर्फ हरी महाराज यांचा जन्म १८८७ साली झाला. गणपती महाराजांचे वडील विठोबाजी भभूतकार हे काचणूर, जिल्हा वर्धा येथे वास्तव्य करून होते. जमीनजुमला नसल्याने भभूतकार हे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. दरम्यान, वडील विठोबाजी भभूतकार यांचे अकाली निधन झाल्याने बालवयात गणपती महाराज यांना काचणूर सोडून नातेवाईकांकडे वास्तव्यास जावे लागले;
मात्र पुढे त्यांनी मंगरूळ – दस्तगीर (ता. चांदूर रे,, जि. अमरावती) येथे कायम वास्तव्य केले.
इ. स. १९३३ सालानंतर सप्ताह समाप्तीप्रसंगी ‘दहीपोहे’ ऐवजी भाकरीचा काला भक्तांना वाटण्याचा प्रघात त्यांनी मंगरूळ दस्तगर येथे पार पाडला. हा भाकरीचा काला स्पृश्य-अस्पृश्याना एकाच पंगतीत वाटला जात असे. यानंतर अस्पृश्यतानिवारण, स्नेहभोजन, मंदिर प्रवेश, आंतरजातीय विवाह आदी पुरोगामी चळवळी हयातभर त्यांनी राबविल्या. तसेच मोर्शींचे ख्यातनाम सत्यशोधक अॅड. नारायणराव अमृतकर आणि नायगाव (ता. चांदूर रे.) चे हरीच्या जलशाचे सर्वेसर्वा राणा गुलाबराव शिसोदे पाटील हे त्यांचे शिष्यगण होते. १९२७ साली अमरावती येथे ‘भरलेल्या ब्राह्मणेतर परिषदेत कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी त्यांचा हार्दिक सत्कार केला होता.
नुसती अक्षरओळख असलेल्या या संताची १९२२ साली मुंबईच्या निर्णयसागर प्रेसमधून ‘हरिगीता’ नावाचा काव्यग्रंथ प्रसिद्ध झाला. हरिगीता तीन खंडांत विभागली असून दोन हजार अभंग या गीतेत आहेत. गणपती महाराजांच्या निर्वाणानंतर फार पुढे म्हणजे इ. स. १९७६ साली ‘गणपती ऊर्फ हरी महाराज यांचा ‘ओवीबद्ध’ चरित्रग्रंथही प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ जगदंबा प्रेस, अचलपूर, जिल्हा अमरावती येथून मुद्रित झाला.
थोडक्यात भजन-कीर्तनाच्या विचारपीठावरून गणपती महाराज यांनी हयातभर सत्यशोधक मताची पाठराखण केली. आपल्या एकुलत्या एका मुलाचा ज्ञानेश्वर महाराजांचा आंतरजातीय विवाह सुलोचनाबाईशी लावून एक सत्यशोधकी उदाहरण जगासमोर ठेवले. मात्र, या विवाहाला मंगरूळ-दस्तगीर येथे विरोध झाल्याने वर्धा येथील सत्यशोधक अॅड. नायडू यांच्या बंगल्यावर हा आंतरजातीय विवाह १९२७ साली संपन्न झाला. या विवाहानंतर इ. स. १९३५ च्या आसपास त्यांनी ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी चर्चा करून स्वतःच्या घरातील विठ्ठल-रुखमाईच्या मंदिराला कुलूप ठोकून मूर्तिपूजा बंद केली. या प्रकरणाने चिडलेल्या काही समाजकंटकांनी शिमग्याच्या होळीत फेकून उभयतांस जिवंत जाळण्याचा कट रचला होता, परंतु अशा या भ्याड हल्ल्यांना गणपती महाराज पुरून उरलेले होते. संदर्भ – १. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य – डॉ. अशोक चोपडे, २. नागपूर पत्रिका – २६-९-१९८७ – लेख – पुंडलिक किचक, मंगरूळ दस्तगीर
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




