मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 60

मराठा आरक्षण विरुद्ध एडवोकेट मंगेश ससाने,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 60
बाई असू दे की तानूबाई बिर्जे अशा सर्व क्षेत्रात पहिला ठसा शूद्र मानल्या गेलेल्या जातीतील स्त्रियांचा आहे. त्यामुळे आताच्या राजकारणात कोणत्याही प्रतिगामी आणि तथाकथित पुरोगामी पक्षात अचानक फक्त उच्च वर्णीय स्त्रिया कशा दिसतात? त्या कुणाला डावलून तिथे केवळ आपल्या सत्ता, संपत्ती आणि राजकीय वारसाच्या जोरावर पोचल्या असतील तर मग आमचा वारसा कुठे कमी पडला? तो कधी आणि कसा नाकारणे सुरू झाले हा एक संशोधनाचा विषय आहे.
या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण विधेयकात ओबीसी स्त्रियांना कोटा मिळू ना देण्याच्या मागे ही मिलीभगत आणि त्यांचे षडयंत्र तुम्हाला दिसून येईल.
जुने रसायन नवी बाटली
महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन बिल नावाने अतिशय गाजत वाजतं आणण्यात आलं. आणि दोन्ही सभागृहात मंजूर झाले, असे जाहीर केले आणि हास्यास्पदरीत्या त्यावर कायदा बनल्यानंतर दहा वर्षांनी ते अमलात आणले जाईल असा युक्तीवाद करून नारी शक्ती वंदन करण्या ऐवजी तिचा मान भंग आणि अपेक्षा भंगच करण्यात आला.
लोकसभेत एकूण ५४२ सदस्य आणि राज्यसभेत एकूण २२४ सदस्य असतात. आता सध्या १७ व्या लोकसभेत एकूण ७८ महिला खासदार सदस्य आहेत. आणि राज्यसभेत एकूण २४ महिला सदस्य आहेत. म्हणजे संसदेत एकूण १०२ महिला सदस्य आहेत.
म्हणजे एकूण ७६६ सदस्यांपैकी केवळ १०२ महिला सदस्य आहेत. याचा अर्थ संसदेत अजूनही ३३ टक्के महिला सदस्य नाहीत. खरेतर एकूण ३८३ महिला सदस्य असतील तर त्यांची बरोबरीने ५० टक्के भागीदारी असेल.
आता यात ज्या खासदार आहेत, त्यापैकी अनेक जणी प्रचंड श्रीमंत, उच्च वर्णीय, उच्च वर्गीय आणि राजकीय घराणेशाही परंपरेतून आलेल्या दिसतात. लोकसभेतील महिला खासदारांची संख्या १०२ आहे. परंतु ही संख्या राज्यसभा आणि लोकसभा मिळून आहे.
हे चित्र आपल्याला पुन्हा एकदा स्पष्ट करते की, ३३ टक्के आरक्षण नसताना सुद्धा आज लोकसभा आणि राज्यसभा येथील महिला नेत्यांची यादी बघितली तर त्यात सर्वाधिक संख्या, ही उच्चवर्णीय जातीतील स्त्री प्रतिनिधींची आहे. तसेच बोटावर मोजता येतील अशा एस सी, एस टी आणि सर्वात कमी संख्या ओबीसी महिला प्रतिनिधींची आहे.
ओबीसी महिला आरक्षण
‘कोटा मध्ये कोटा, ठरवला खोटा’ ही गोष्ट नारी शक्ती वंदन अधिनियम, २०२३ पारित करताना सुद्धा सिद्ध झाली आहे.
नारी युद्ध वंदन अधिनियम, २०२३
महिलांसाठी संसदेत एक तृतीयांश जागा राखीव असाव्या असे विधेयक पहिल्यांदा खासदार राजीव गांधी यांनी संसदेत ठेवले होते. आता असे दाखवण्याचा प्रयत्न झाला की २७ वर्षे रखडलेले बिल आता नव्या विधेयकाच्या रूपात संसदेच्या नव्या इमारती मध्ये पारित करण्यात येत आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियम, २०२३ सर्वानुमते पारित करण्यात आले,
अशी घोषणा करण्यात आली. परंतु पुन्हा एकदा या आरक्षणातून मुस्लीम महिला आणि इतर मागासवर्गीयांना वगळून सामाजिक अन्याय करण्यात आला. म्हणून ही लढाई ओबीसी आणि मुस्लिम महिलांसाठी सामाजिक न्यायाची लढाई आहे.-
नारी शक्ती वंदन अधिनियम, २०२३, हे नवीन नाव घेतले तरी मसाला तोच आहे. नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत याचा आणखी एक पुरावा म्हणजे पूर्वीच्या बिलात एस सी, एस टी यांनाच कोटा होता, तसाच तो ठेवला आहे, पण ओबीसी महिलाना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
हे जुनेच रसायन नवीन बाटलीत घातले आहे. नाव बदलून जुनेच महिला आरक्षण विधेयक आणले आहे, म्हटले तरी गैर नाही. लोकसभा आणि राज्यसभेने हे मंजूर केले आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी जवळपास २७ वर्षे लागली, असे म्हंटले तरी बिल पारित करण्यासाठी ओबीसी स्त्रियांच्या व मुस्लिम स्त्रियांच्या कोटा बद्दल मौन बाळगले गेले. एकमताने पारित असा दिखावा करून कायदा दहा वर्षांनी बनेल असे सांगून पुन्हा मंजूर झालेल्या बिलाला सुद्धा बस्त्यात ठेवण्यात आले.
विधेयकाचा इतिहास
हे विधेयक पहिल्यांदा १९९६ मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकार. त्यानंतर हे विधेयक गीता मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले, ज्याने डिसेंबर १९९६ मध्ये लोकसभेला आपला अहवाल सादर केला परंतु कोणताही निकाल लागला नाही, हे विधेयक ११व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द झाले. त्यानंतर १९९८ ते २००३ पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारकडून
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




