सोशल

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी…

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी…
लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी…
मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी…
सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा…

सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 729 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या अगोदर आठ दिवस महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या भागातून मोठ्या प्रमाणात तरुण मंडळ सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधीच्या समोर ज्योत पेटवून ती ज्योत पायी आपल्या गावापर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून घेऊन जातात अशा प्रकारची ज्योत कोणत्याही संताच्या समाधी सोहळ्यास कोणत्याही संताच्या गावावरून घेऊन जात नाहीत फक्त सावता महाराज यांच्या अरण वरून हजारो ज्योती तरुण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्या गावाकडे घेऊन जातात ही एक आगळी वेगळी परंपरा आहे यामध्ये तरुणांना आनंद मिळतो त्यांच्या गावामध्ये ज्योत घेऊन गेल्यानंतर गावामध्ये ज्योतीचे मोठ्या प्रमाणात स्वागत होते

आणि सावता महाराजांच्या संजीवन समाधीचा सोहळा या ज्योत घेऊन गेल्यानंतरच होतो महाराष्ट्रामध्ये किमान 4000 गावांमध्ये एकाच वेळी भक्तिमय वातावरणात सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होतो अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून शंकरराव लिंगे यांनी देशात अनेक ठिकाणी आणि विदेशात ही हे लोन पोचविले आहे त्यामुळे भारतात सर्व दूर आणि काही देशांमध्ये सावता महाराज यांच्या संजीवन समाधी चा सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो अनेक गावांमध्ये संत सावता महाराज यांचे मंदिर आहे बऱ्याच गावामध्ये मंदिर बांधण्याची तयारी चालू आहे

ज्या ठिकाणी माळी समाजाची वस्ती आहे त्या ठिकाणी सावता महाराजांचे मंदिर बांधण्याचे काम चालू आहे संत शिरोमणी सावता महाराज हे जरी सर्व बहुजनांचे असले तरी अपवादात्मक म्हणूनच इतर समाजाने सावता महाराजांचे मंदिर बांधले आहे 99% मंदिर हे माळी समाजाने माळी समाजाच्या वस्तीवर गावात बांधलेली आहेत समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व माळी समाज एकत्र होतो माळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे परंतु या समाजाने आज पर्यंत आपली उपद्रवशक्ती दाखवली नाही त्यामुळे हा समाज विकासापासून कोसो दूर आहे राजकारण करणे या समाजाचे कामच नाही असे समजले जाते संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्याचे किर्तन साप्ताह जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज देहुकर मोरे महाराज यांचे सात दिवस कीर्तन होते

आषाढ वैद्य चतुर्थी दिवशी समाधी सोहळा समाधीवर दुपारी बारा वाजता पुष्पवष्टी करून केला याच दिवशी पांडुरंगाची पालखी पंढरपूरहुन अरणला येते कोणत्याही संताच्या गावाला पांडुरंगाची पालखी जात नाही सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला आषाढी वारीला एकत्र येतात परंतु संत शिरोमणी सावता महाराज यांची पालखी पंढरपूरला जात नाही सावता महाराजांनी एक अभंग म्हटलेला आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोटनाळा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता ने केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत त्यांनी आपल्या शेतामध्ये कष्ट करून जो भाजीपाला पिकवला फुले फळे पिकवले कृषी संशोधन केले कृषी क्रांती केली कष्ट केले कर्म केले त्यातच त्यांना पांडुरंग दिसत होता सर्व जनता पांडुरंगाला काही ना काही मागणी करते

परंतु पांडुरंग ज्या वेळेला पंढरपूर वरून सावता महाराजांना भेटण्यासाठी अरणला त्यांच्या शेतामध्ये येतात त्यांना शोधण्यासाठी ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज यांच्या पाठीमागे धावत येतात त्यावेळेला त्रयीलोख्याचा राजा विठ्ठल हा संत शिरोमणी सावता महाराज यांना लपण्यासाठी जागा मागतात कारण नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज यांना सापडू नये म्हणून त्यावेळेला सावता महाराज यांनी पांडुरंगाला आपल्या हृदयात कोंडले होते असा सावता महाराज यांचा महिमा अघाध आहे सावता महाराज यांच्या शेतामध्ये एक मसोबा नेहमी मशागत करण्यासाठी कुळवण्यासाठी नांगरण्यासाठी पेरणीसाठी आढावा येत होता

त्यावेळेला सावता महाराज म्हणाले जे जे विकास सासी आडवे येते त्यांनी बाजूला सरावे असे म्हणून त्यांनी तो मसोबा उचलून बांधावर ठेवला त्याच वेळेला गावामध्ये साथीचा रोग आला गावामध्ये अफवा उठली सावता महाराजांनी मसोबाला उचलून बांधावर ठेवल्यामुळे मसोबा कोपला आणि साथीचा रोग आला त्यामुळे गावातील लोकांनी चिडून जाऊन सावता महाराज यांची शेत पिके गंजी वैरण घर याची नाचदूस केली मोडतोड केली जाळपोळ केली बकरे कोकरे सगळे कापले अत्यंत अन्याय असा सावता महाराज वर झाला सावता महाराज अत्यंत दुःखी होते परंतु ते त्यातूनही सावरले गावातील साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी आपल्या शेतातील वनौषधी गोळा केली त्याचं औषध तयार केलं आणि गावातील प्रथम सरपंच यांचा मुलगा जो आजारी होता त्याला त्याचा काढा देऊन ते औषध साथीचा रोग आटोक्यात आणला त्यावेळेला सर्व गाव सावता महाराज यांना वाहवा करत होते त्यांची स्तुती करत होते परंतु सावता महाराज जो जो अन्याय केला होता त्याबद्दल कोणीही त्यावेळेला अन्याय केला

त्यांचा सूडबुद्धीने सावता महाराज यांनी बदला घेतला नाही त्यांच्याच मुलांना त्यांच्याच घरातील सदस्यांना वनौषधी देऊन रोग बरा करण्याचे काम सावता महाराज यांनी केलेला आहे सावता महाराज हे प्रपंचात राहून पांडुरंगाची भक्ती करत होते शेतातील काम करत करत भक्ती करत होते सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल त्या वेळेला ते पांडुरंगाची भक्ती करत होते त्यांचे कीर्तन अभंग लिहिण्यासाठी खाशाबा गुरव महाराज हे काम करत होते सेवाभावी वृत्तीने खाशाबा गुरव यांनी केलेले काम त्यांचे लिखाण पैकी फक्त 40 चा अभंग सापडलेले आहेत बाकी सर्व अभंग आणि लिखाण हे गायब झालेला आहे

नष्ट झालेला आहे किंवा त्याचं काय झालेला याचा पत्ता लागलेला नाही संत शिरोमणी सावता महाराज हे विज्ञानवादी संत असल्यामुळे अनेकांनी त्यांच्या भजन कीर्तनाला किंवा त्यांच्या विचाराला विरोध केला सावता महाराज यांनी वयाच्या 45 व्या वर्षी संजीवन समाधी त्यांच्याच शेतामध्ये घेतलेले आहे त्याच ठिकाणी आज त्यांचे समाधी मंदिर आहे त्यांच्या राहत्या घरी ही स्मारक उभारण्यात आलेले आहे शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात आलेले आहेत ओबीसी संघर्ष समिती अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या माध्यमातून शंकराव लिंगे यांनी सात सामुदायिक विवाह सत्यशोधक पद्धतीने याच ठिकाणी घेतले

आणि भारताला संत शिरोमणी सावता महाराज यांची मोठ्या प्रमाणात ओळख करून दिलीलिंगे यांनी 2017ला कोलंबिया अमेरिका न्यूयॉर्क डेट्रॉईड शिकागो मध्ये सभेत सावता महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला आहे त्यांचा महिमा महाराष्ट्रातील बहुजनांच्या घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम अविरत संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 701 व्या समाधी सोहळ्या दिवशी 701 दिवे लावून कामाची सुरुवात केली आज गावामध्ये रस्ते मंगल कार्यालय मंदिराचा जिर्णोद्धार विश्रामगृह सभागृह अरण ते गिड्डेवाडी पांडुरंग पालखी मार्ग गावातील रस्ते गटारी इत्यादी कामे शासनामार्फत करण्यात आली आहेत

गेल्या 30 वर्षाच्या जागृती नंतर अरण मध्ये लाखो सावता भक्त वारकरी वारकरी सांप्रदाय पंढरपूरला आषाढी वारीला आल्यानंतर किंवा पंढरपूरला पांडुरंगाला भेट दिल्यानंतर आवर्जून सावता महाराजांना भेट देण्यासाठी सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात स्मृती सोहळा सप्ताह निमित्त महाराष्ट्रातील अनेक सावता महाराज मंदिरातील तरुण मंडळी पायी ज्योत घेऊन जातात महाराष्ट्रात कोणत्याही संताच्या गावावरून ज्योत घेऊन जात नाहीत फक्त सावता महाराजांच्या पुण्यतिथी ला ज्योत नेली जाते त्यासाठी हजारो तरुण अरण ला येतात परंतु या ठिकाणी भाविकांना भक्तांना राहण्यासाठी चांगली सोय नाही

कोणत्याही प्रकारचे हॉटेल्स नाहीत होस्टेल्स नाहीत अनेक प्रकारच्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत अरण मध्ये सात सामुदायिक विवाह सोहळे 712 जोडप्याचा विवाह लाखोंच्या उपस्थितीत झालेला आहे वधु वर मेळावे विद्यार्थ्यांचा सत्कार समाज उपयोगी कार्यक्रम अरण अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा म्हणून उपोषण आंदोलन राजकीय मेळावे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहेत हे सर्व कार्यक्रम अखिल भारतीय माळी महासंघ सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांच्यावतीने घेण्यात आले होते त्यानंतर अनेक राजकीय कार्यक्रम ही येथे घेण्यात आले त्यामध्ये माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार Bandh Calm Mantri.Balasab, shivarkar. समाजवादी नेते अभिनेते निळू फुले सभापती नास फरांदे सर-सुधाकर रावजी गणगणे साहेब हर्षवर्धन पाटीलआनंदरावजी देवकाते साहेब साहेबअतुल सावे साहेब पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे साहेब धनाजी तात्या साठी बबन दादा शिंदे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित अनेक कार्यक्रम झालेले आहेत

परंतु या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला नाही शासकीय पूजा होत नाही अनेक वेळा अनेक मंत्र्यांनी अ वर्ग तीर्थक्षेत्र करण्याच्या घोषणा केल्या परंतु अ वर्ग तीर्थक्षेत्र झाले नाही ही शोकांतिका आहे याच ठिकाणी आमदार रोहित दादा पवार यांनी उंच असा वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकवलेला आहे या मंदिराचे चार मुख्य पुजारी आहेत एक सावता महाराज दोन शिवाजी महाराज तीन दत्तोबा महाराज चार शंकर महाराज चार घराण्याकडे अलटून पलटून एक एक वर्ष पुजारी म्हणून त्यांना मान देण्यात येतो कारण हे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मुलीचे वंशज आहेत म्हणून यापैकी एका वंशाला म्हणजेच दत्तोजी महाराज यांचा मुलगा रमेश पुजारी यांना रोहित दादा यांनी एक चांगली नवीन कोरी चार चाकी गाडी सावता महाराज यांचा आणि त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी दिले आहे मंदिरामध्ये कोणतही राजकारण होऊ नये ही अपेक्षा आहे अरण मध्ये सात दिवस मोठी यात्रा भरतेचैत्र महिन्यात ही चंदन ओटी ची यात्रा भरते लाखो भाविक दर्शनासाठी येतात नेत्रदीपक नारळ हंडी बघण्यासाठी एकाच वेळेला लाखो लोकांची झुंबड लहान जागेमध्ये होते त्यावेळेला अरण मध्ये गर्दीच गर्दी होते यावर कोणाचे कसलेही नियंत्रण त्यावेळेला राहत नाही सावता महाराजांच्या कृपेने आणि पांडुरंगाच्या कृपेने हे कार्यक्रम आजपर्यंत सुरळीत सुव्यवस्थित पार पडलेले आहेत

अरण तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी सरकारने पहिल्यांदा अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा वनौषधी संशोधन केंद्र तयार करावे यात्रेसाठी मोठे पटांगण आरक्षित करावे चांगल्या सुविधा असलेले शासकीय हॉटेल जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा स्मृती दिनाचा दिवस शोधून त्या दिवशी अरणला आठवडा बाजार भरावा सोलापूर जिल्ह्यातील सर्व मार्केट यार्डना संत शिरोमणी सावता महाराज मार्केट यार्ड असे नाव द्यावे मंदिराचा जिर्णोद्धार सुशोभीकरण सावता महाराजांची ऐतिहासिक विहीर त्याचे सुशोभीकरण करावे वारकरी सांप्रदाय संत महात्म्यांचे विचार प्रबोधन कला कॉलेज निर्माण करावे पांडुरंग पालखी मार्ग डांबरीकरण वनीकरण करावे एसटी महामंडळाच्या सर्व गाड्या एक्सप्रेस गाड्या अरणला थांबा द्यावा मोडलिंब रेल्वे स्टेशनला सर्व गाड्यांना थांबा द्यावा भक्त मंडळ साठी राहण्यासाठी वस्तीग्रह स्वच्छतागृह भोजन ग्रह शासनामार्फत करावे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळादिनी शासकीय पूजा झालीच पाहिजे मंदिराचा कलर सावता भक्त मंडळींनी केला

अशी मंदिरातील अनेक कामे भक्त मंडळींनी केलेली आहेत शासनाचे मोफत अन्नदान क्षेत्र शिव भोजन थाळी त्वरित चालू करावीखाशाबा गुरव महाराज यांचे मंदिर अरुण मध्ये बांधावे आत्तापर्यंत घोषणा खूप झालेले आहेत त्या सर्व घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केलेले आहेत परंतु आता एकदा तरी मुख्यमंत्री आणि अरण ला भेट द्यावी आणि अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा आणि त्याच लागणारा सूनियोजित आराखडा तयार करून योजनाबद्ध पद्धतीने निधी उपलब्ध करून द्यावा इत्यादी मागण्या संत सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केल्या आहेत सावता महाराज यांच्या 729 व्या समाधी सांगता सोहळ्यास विनम्र अभिवादन! शंकरराव-लिंगे अध्यक्ष संत सावतामाळी प्रतिष्ठान 73 87 37 7 801 सावता महाराजांचे भक्त असाल सावता महाराज यांना मानत असाल तर हा लेख आपण जास्तीत जास्त सोशल मीडियामध्ये फॉरवर्ड करा.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button