माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ऑगस्ट रोजी शिंदे परिवारांच्या हस्ते नागरी सत्कार

न्यूज
30-07-2024
माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ऑगस्ट रोजी शिंदे परिवारांच्या हस्ते नागरी सत्कार
१३ जगाच्या पोशियाचा व भजन स्पर्धेतील विजेत्याचा सन्मान होणार
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या ३ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, मातोश्री सौ. उज्वलाताई शिंदे व खा.प्रणितीताई शिंदे परिवारांच्या हस्ते जामगुंडी मंगल कार्यालयात सका. १०.०० वा. नागरी सत्कार होणार असून यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनिय आदर्श निर्माण करणाऱ्या १३ बळीराजाचा तसेच भजन स्पर्धेत विजेते ठरलेल्या मंडळाचा सन्मान केला जाणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गौरव समितीचे वतीने करीत आहोत.
सहकार, कृषी, पणन, बँकींग, साखर, उद्योग, क्रिडा, कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ध्येयाने काम करणारे माजी आमदार दिलीपराव माने यांचा ३ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून गौरव समितीचे वतीने सका. १०.०० वा. जामगुंडी मंगल कार्यालयात त्यांचा नागरी सत्काराचे आयोजन केलेले आहे. देशांचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, सौ. उज्वलाताई शिंदे, व खा. प्रणितीताई शिदे या शिंदे परिवारांच्या हस्ते हा नागरी सत्कार आयोजित केलेला असून या समारंभास सिध्देश्वर साखर कारखान्याचे धर्मराज काडादी, माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, शिवशरण पाटील, जेष्ट नेते बळीरामकाका साठे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार तसेच जिल्हातील, शहरातील मान्यवरांच्या उपस्थित होणार आहेत.
माजी आमदार दिलीपराव माने यांच्या नागरी सत्कार समारंभाचे वेळी कृषी क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत नाविण्यपुर्ण प्रगत शेती करणाऱ्या १३ शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये मल्लिकार्जुन हालप्पा बिराजदार-पाटील (निचर्गी), नचीसाहेब बारुदवाले (भंडारकवठे), आप्पाराव मुंजप्पा कोले (कंदलगांव), मल्लिकार्जुन म्हमाने (हिपळे), दयानंद हल्ले (आहेरवाडी), निबण्णा जंगलगी (भंडारकवठे), मळसिध्द शेंडगे (मंद्रुप), काशिनाथ राठोड (फताटेवाडी), अंबण्णा पंडीत कांबळे (येळेगांव), केदार दिडोरे (होटगी) मल्लण्णा म्हेत्रे (टाकळी), रामचंद्र बाळकृष्ण ढेपे (पाकणी), शिवाजी लक्ष्मण पाटील (तेलगांव) यांचा सन्मान जगाच्या पोशिंद्याचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात येणार आहे. तर वाढदिवसानिमित्त गोविदश्री मध्ये दोन दिवस घेण्यात झालेल्या भजन स्पर्धेतील विजेते मंडळाचा सन्मान देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीचे वतीने विद्यार्थी, महिला, वारकरी सांप्रदाय, क्रिडा क्षेत्रात संधी उपलब्द करुन दिली आहे. २० जुलै रोजी शहरातील ६४ केंद्रावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत विक्रमी ५३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. २७ व २८ जुलै रोजी झालेल्या भजन स्पर्धेत ४४ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. व १० ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धा याशिवाय पाककला, होम मिनिस्टर असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
माजी आमदार दिलीपराव माने हे सर्व क्षेत्रात करीत असलेले कामाचा गौरव व त्यांच्या पुढील वाटचालीस बळ, शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नागरी संत्काराचे आयोजन केले असून ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. जामगुंडी मंगल कार्यालय, आसरा, जुळे सोलापूर येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभास सोलापूर जिल्हा-शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन करीत आहोत.
या पत्रकार परिषदेस सचिन चौधरी, गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, श्रीकांत मेलगे-पाटील, युवराज चव्हाण, सुनिल जाधव, उमेश भगत उपस्थित होते.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




