सोशल

मंडलनामा क्रमशः 26. ख्रिश्चन, जैनांमध्ये संपर्क

मंडलनामा क्रमशः 26. ख्रिश्चन, जैनांमध्ये संपर्क

मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘वर्षा’ बंगल्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन व इतर मान्यवर मुस्लिम नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत मुस्लिम ओबीसींना प्रमाणपत्र मिळण्यातील प्राथमिक अडचणी दूर झाल्या. त्यानंतरही काही अडचणी येतच होत्या. या काळात मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा यासाठी जनजागृती व संघटना विस्तार करण्याचे ठरवले. संघटना विस्तारासाठी प्रामुख्याने मेळावे व परिषदा घेण्यावर भर होता. पहिला मोठा मेळावा ४ सप्टेंबर १९९४ रोजी ख्रिश्चन सेवा मंदिर, सोलापूर येथे झाला. या मेळाव्यात मुस्लिमांसोबतच धर्मांतरित ख्रिश्चनांनाही ओबीसीचे लाभ मिळवून देण्यावर चर्चा झाली. ज्याप्रमाणे मुस्लिमांना व्यवसायावर आधारित ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळवण्यात आला. त्याप्रमाणे ख्रिश्चानांनाही मिळू शकतो, अशी त्यामागील भूमिका होती.

धर्मांतर केलेले अनेक ख्रिश्चन उदरनिर्वाहासाठी पूर्वीच्या धर्मातीलच व्यवसाय करतात. त्यात अनेक ओबीसी जाती आहेत. परंतु, धर्मांतर केल्यामुळे त्यांच्याकडे पुरावे नाहीत. मोठ्या संख्येने गरिबीत जीवन कंठत असलेल्या खिश्चनांना आरक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न होता. पण सोलापूरच्या मेळाव्यानंतर या आघाडीवर फार काम झाले नाही. सुरुवातीच्या काळात काही ख्रिश्चन कार्यकर्ते जोडले गेले. पण आम्ही आमच्याच समस्येत गुंतत गेलो. शिवाय त्यांच्याकडून फार प्रतिसाद मिळाला नाही. हा संपर्क नंतर कमी कमी होत गेला.
मी जालना येथील काही ख्रिश्चनांना ओबीसी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मदत केली आहे. वसई भागात दौऱ्यानिमित्त गेलो असता फादर फान्सिस दिब्रेटो यांची भेट झाली होती. त्यांनी प्रोटेस्टंट पंथ मानणाऱ्यांमध्ये अनेक जण पूर्वाश्रमीच्या ओबीसी जातींमधील असल्याचे सांगितले होते.

ख्रिश्चनांप्रमाणेच जैन समाजातील ओबीसींनाही प्रमाणपत्र काढून देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. त्या काळात इचलकरंजी भागातील काही जण आमच्या संपर्कात आले. त्यांनाही मदत केली. पण त्यांच्यातून जैन ओबीसींसाठी काम करणारे नेतृत्त्व विकसित झाले नाही. प्रामुख्याने महाराष्ट्रातील स्थलांरित जैनांपेक्षा मराठी जैनांमध्ये ओबीसीप्रमाणे परंपरागत व्यवसाय करणारी अनेक कुटुंबं आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात मराठी जैन आढळतात. ओबीसी प्रवर्गासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३४० नुसार कोणत्याही धर्माची आडकाठी नाही. त्यामुळे जैन व खिश्चन धर्मातील परंपरागत ओबीसीसदृश्य व्यवसाय करणाऱ्यांना मंडल आयोगाचा लाभ मिळाला पाहिजे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button