सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 39

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
39
माली शिक्षण परिषदेचे दुसरे अधिवेशन १९११ च्या एप्रिल महिन्यात मुंबई येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्षपद भगवंतराव कांडलकर यांनी भूषविले होते. सत्यशोधक चळवळीला मातृसंस्था म्हणून कांडलकर माळी शिक्षण परिषदेतही सहभागी होत असत. करजगावातील दक्षता सभा, सत्यशोधक समाजाचे करजगावातील कार्यालय, १९२० ची करजगावातील ब्राह्मणेतर सभा, शाहीर भीमराव महामुनींचा करजगावात भीमपुराण कार्यक्रम, क्रांतीमों चा बावनकशी ‘सुबोध रत्नाकर’ कविता संग्रह प्रकाशन आदी सत्यशोधक उपक्रमात कांडलकरांचा सहभाग मोलाचा राहिला, त्यांचे पुत्र मोतीराव कोडलकर यांनीही पुढे सत्यशोधक समाजात संक्रिय होउन समाजाचे कार्य केले, अशा या करजगावकर सत्यशोधकाचे निधन १९३० साली झाले.
संदर्भ – १. करजगावातील सत्यशोधक चळवळ सतीश जामोदकर, २. अ.भा. माळी शिक्षण परिषदेचे कार्य सतीश आमोदकर, ३. सत्यशोधक समाज परिषद- अ. भा. व कार्यवृतांत -संपादक- प्राचार्य गजमल माळी
कांडलकर
मोतीराव भगवंतराव
(मृत्यू – ११ ऑक्टो. १९५०)
मोतीराव भगवंतराव कांडलकर हे मौजे करजगाव तालुका नवीन चांदूरबाजार, जिल्हा अमरावती येथील सक्रिय सत्यशोधक कार्यकर्ते होत. कांडलकर १९१५ सालच्या दरम्यान करजगाव सत्यशोधक शाखेचे सचिव होते. करजगावकर सत्यशोधक शंकरराव पाटील, मो. तु. वानखडे, कृष्णाजी कर्काजी चौधरी आदीच्या समवेत सत्यशोधक चळवळीत सहभागी होत असत.
दरम्यान, १६ फेब्रुवारी १९२१ रोजी करजगावात ‘दक्षता सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षस्थान मोतीराव कांडलकरांनी भूषविले होते. पुढे जून १९२० ला करजगावात ‘सहकारी पतपेढी ‘स्थापन झाली होती. या सहकारी संस्थेचे प्रवर्तक कांडलकर हेच होते. मोतीराव कांडलकर हे माळी शिक्षण परिषदांमध्येही अधूनमधून सहभागी होताना दिसतात. अशा या सत्यशोधकाचे निधन ११ ऑक्टोवर १९५० रोजी झाले. संदर्भ
करजगावातील सत्यशोधक चळवळ-सतीश जामोदकर
कांबळे
शिवराम जानबा
(जन्म १८७५)
सत्यशोधक गोपाळबाबा वलंगकरांची चळवळ पुढे मार्गस्थ करणारे, फुले यांच्या नंतरच्या पिढीतील पुणेकर सत्यशोधक, सोमवंशीय-मित्र पत्राचे संपादक, पर्वती मंदिर सत्याग्रहाचे आमंत्रक, पुणे नगरपालिकेचे नगरसेवक, सत्यशोधक शिवराम जानबा कांबळे यांचा जन्म १८७५ मध्ये झाला, शिवराम कांबळे यांचे वडील जानबा कांबळे हे भांबुर्डे (हल्लीचे शिवाजीनगर, पुणे) गावचे वतनदार महार होते. जानबा कांबळे हे पुणे येथे एका युरोपियन अधिकाऱ्याकडे नोकरीस असल्याने पुण्यास वास्तव्यास आले.
सत्यशोधक शिवराम कांबळे जन्माने अस्पृश्य असल्याने त्यांच्या शिक्षणाची आरंभी आबाळच झाली. कुशाग्र बुद्धीच्या शिवराम कांबळे यांनी बालवयात शारीरिक श्रमाचे काम करून अक्षर ओळख करून घेतली. दरम्यान, महात्मा फुले यांच्या वाङ्मयाचे अध्ययन करून, कोल्हापूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘मराठा दीनबंधु’ पत्रातून लेखनास प्रारंभ केला.
‘मराठा दीनबंधु’ पत्त्रात १५ ऑक्टोबर १९०३ रोजी त्यांचे एक पत्र प्रसिद्ध झाले. महार समाजाच्या व्यथा मांडून, इंग्रजी अंमलात महार बंधूंना शिक्षण घेणे सोयीचे होत असल्याने या समाजाची सर्वांगीण प्रगती अपेक्षित असल्याचा आशावाद त्यांनी या पत्रात व्यक्त केला होता. याच सुमारास शिवराम कांबळे यांनी ‘सूचीपत्र’ ग्रंथाचे लेखन हातावेगळे केले. इ. स. १९०३ साली ‘सूचीपत्र’ ग्रंथ स्वखचनि मुद्रित करून गावोगावी विनामूल्य वाटप केला.
इ. स. १९०२ मध्ये अहमदनगर येथील गोविंद मुकुंद वा अस्पृश्य इसमाने सार्वजनिक विहिरीवर पाणी भरले. या प्रकरणाचा गहजब होऊन, शेवटी कोर्टकज्जे होऊन न्यायमूर्ती बापू हरी गोडबोले यांनी कलम २७७ अन्वये गोविंद मुकुंद यांस दोन आठवडयांची शिक्षा सुनावली. पुढे या प्रकरणी गोविंद मुकुंद अपिलान सुटले. दरम्यान, या प्रकरणी सामाजिक अंगाने शिवराम कांबळे यांनी ‘डेली टेलिग्राफ’ आणि ‘डेक्कन हेरॉल्ड’ या पांमध्ये ८ डिसेंबर १९०३ रोजी लेख
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


