ताल कटोरा इंडोर स्टेडियम मध्ये ओबीसी न्याय हक्क संमेलन यशस्वी !

मागोवा
दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे दिल्लीतून
ताल कटोरा इंडोर स्टेडियम मध्ये ओबीसी न्याय हक्क संमेलन यशस्वी !
काँग्रेस पक्षाचे ओबीसी जय हिंद यांनी आयोजित केलेल्या न्याय हक्क संमेलन राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीच्या टाळकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या ओबीसी न्याय हक्क संमेलनात देशातील ओबीसी नेत्यांनी तुडुंब भरले यशस्वी आयोजन! राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, भूपेश बघेल, सिद्धरामय्या आणि जय हिंद यांनी ओबीसी समाजासाठी न्याय आणि आरक्षण यावर ठाम भूमिका घेतली.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण आणि जातीय जनगणनेची मागणी केली, तसेच मोदी सरकारवर ओबीसींचा अन्याय केल्याचा आरोप केला. सुरुवातीला राहुल गांधी म्हणाले माझ्या हातून ओबीसीसाठी जे काम व्हायला पाहिजे होतं ते मी केलं नाही ती माझी चूक आहे एससी एसटी च्या समस्या लवकर समजतात परंतु ओबीसीच्या समस्या समजत नाहीत कारण त्यांचा डाटा नाही ओबीसी समाज मागत नाही किंवा उघड बोलत नाही तेलंगणामध्ये रेवन रेड्डी यांनी डाटा गोळा केला आणि 1000 km वर जमीन फाटली आणि सर्व समुद्रात सुना मिळाली त्या प्रकारे तेलंगणामध्ये डाटा गोळा केला आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सुनामी आली त्यासाठी आता मी ओबीसीला न्याय देण्याचं काम करणार आहे असेही सांगितले मला आता देशांमध्ये 50 आयकॉन ची गरज आहे आज स्टेजवर अशोक घायल होत सिद्धरामय्या भूपेश बघेल स्वामीनारायण सचिन पायलट विजय वडेट्टीवार जय हिंद यांच्यासारखे सहा आयकॉन दिसत आहेत मला 50 यांच्यासारख्या आयकॉन ची ची गरज आहे मी ओबीसी ला आता न्याय देणार आहे शासन प्रशासनामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी खाजगी शिक्षणामध्ये आरक्षण आणि योग्य प्रकारे डाटा गोळा करण्यासाठी योग्य प्रकारची मॉडेल म्हणून तेलंगणाची जात निहाय जनगणना झाल्याप्रमाणे देशातील सर्व राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना राहुल गांधी म्हणाले फक्त पाच टक्के लोकच या देशाची सत्ता सांभाळत आहेत त्यामुळे 60% ओबीसी समाज हा नेशन बिल्डर देश निर्माण करणारा समाज मागे राहिला आहे तो आता मी त्यांना मागे ठेवणार नाही आपण पुढे या मी तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे असे गौरव उद्गार व विशेष साठी राहुल गांधी यांनी काढले
मल्लिकार्जुन खरगे यांनी ओबीसी हितासाठी शाश्वत धोरणं आणि सामाजिक समावेशन आवश्यक असल्यावर भर दिला.
अशोक गेहलोत यांनी राहुल गांधींच्या ओबीसी हितासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना समाज सुधारक म्हणून मानले.
सिद्धरामय्यांनी ओबीसी आरक्षणाचा विस्तार, जातीय जनगणनेला महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी धोरणं आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला.
भूपेश बघेल यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन ओबीसींचा विकास करावा, अशी मागणी केली.
सचिन पायलट यांनी ओबीसी नेतृत्वाने एकत्र येऊन अधिकारांसाठी लढण्याचं आवाहन केलं.
विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या ओबीसी हितासाठीच्या धोरणांना पाठिंबा दिला आणि मोदी सरकारवर ओबीसी न्यायात कमी कामगिरी केल्याचा सूचक आरोप केला.
राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष जय हिंद यांनी ओबीसी समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी एकत्र येऊन ठाम लढण्याची शपथ घेतली.
ही परिषद ओबीसी समाजाच्या न्याय आणि विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या कटिबद्धतेचं दर्शन आहे. या अगोदर दिल्लीतील ताल कटर स्टेडियम मध्ये ओबीसी समाजाचा मेळावा संमेलन काँग्रेस पक्षाने घेतले होते त्यावेळेला ताल कटोरा स्टेडियम मधील मध्यभाग सुद्धा पूर्ण भरलेला नव्हता या वेळेला मात्र गेल्या वेळेपेक्षा 25 पट लोक अधिक स्टेडियम मध्ये होती आणि 25 पट लोक अधिक स्टेडियमच्या बाहेर होते म्हणजे हा मेळावा कमालीचा यशस्वी झाल्याचे चित्र होते ओबीसी जागृत झाल्याचे चित्र होते अतिशय उत्साही वातावरण होते देशाच्या कानाकोपऱ्यामधून काश्मीर पासून कन्याकुमारी पांडेचरीपर्यंत गुजरात पासून गुहाटी पर्यंत सर्व ओबीसी समाज ताल कटोरा स्टेडियम मध्ये एकत्रित झाल्याचे चिन्ह दिसत होतं
शिवक्रांती टीवी दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे दिल्लीहून मागोवा


