श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापुर या मंडळाच्या वतीने आषाढ मासात विश्वशांती

न्यूज 20-07-2024
श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापुर या मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीहि श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळच्या २५ वा वर्ष रौप्य महोत्सव असून या आषाढ मासात विश्वशांती आणि जनकल्याणार्थ वैदिक मंडळाच्या नियोजित वास्तूच्या जागेत आषाढ मास कार्यक्रम आयोजीत केलेले आहे.
कार्यक्रम स्थळ – श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापुर संचालित
श्री वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र श्रीराम नगर जानकी नगर जवळ जुळे सोलापुर
ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री १००८ जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ,
ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ. यांचे मंगळावर दिनांक २३ जुलै ते शुक्रवार २६ जुलै २०२४ पर्यंत सकाळी ८:३० इष्टलिंग पूजा सायंकाळी ७ वाजता आशीर्वचन.
सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ७ वाजता पंचाचार्य द्वजा रोहण शिवाचार्यरत श्री ष ब्र डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी गौडगाव माजी संसद सोलापुर, श्री ष ब्र श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, नागणसुर, रेवूर, श्री ष. ब्र नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी मैंदर्गी, श्री ष ब्र शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी नावदगी, श्रीष. ब्र गुरुशांतलिंग शिवाचार्य स्वामीजीकल्लहिप्परगा यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ठीक ८ वाजता नवचंडी होम प्रीत्यर्थ यज्ञ मंटपात सर्व देवता स्थापना करून दुर्गासप्तसती पारायण व नवचंडीयाग प्रारंभ होणार आहे आणि सायंकाळी ठीक ४ वाजता कल्याण नगर श्री दत्त मंदिरापासून श्री वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र पर्यंत सुहासिनी कुंभ सवाद्य समेत जगद्गुरुंच्या भव्य शोभायात्रा, आणि सायंकाळ ठीक ६ वाजता धर्मसभा उद्घाटन जगद्गुरुंच्या सानिध्यात शिवाचार्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुनिता बाबासाहेब कल्याणी उद्योगपती, पुणे, प्रमुख अतिथी, सौ. निर्मला धर्मराज खेणी उद्योगपती पुणे या दाम्पत्य व श्री धर्मराज काडादी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी सोलापुर यांच्या उपस्थितीत सौ कविता गुरुसिध्दय्या हिरेमठ धारवाड यांनी समाजात उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केल्याबद्धल काशीपीठ वतीने “श्रीमती मालती महारुद्रप्पा खेणी मातृ शक्ती राष्ट्रीय पुरस्कार” प्रधान करणार आहे या नंतर जगद्गुरुंचे आशीर्वचन आणि उपस्थित सर्व सुवासिनपूजा वटीभरणे कार्यक्रम आणि महाप्रसाद होणार.
मंगळावर दिनांक २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ७ वाजता महामृत्युंजय होम, सकाळी ८:३० वाजता जगद्गुरू यांचे इष्टलिंग महापूजा, प्रसाद, आणि सायंकाळी ७ वाजता शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी माजी संसद, सोलापुर यांचे धर्मोपदेश व जगद्गुरुंचे आशीर्वचन व महाप्रसाद.
बुधवार दिनांक २४ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता नवग्रह होम व ८:३० वाजता जगद्गुरुंचे इष्टलिंग महापूजा, सामुहिक महिला श्रीरुद्र पठण ९:३० वाजता श्रीललित सहस्रनामावली पठण सहित कुंकुमार्चन आणि जगद्गुरुंचे आशीर्वचन महाप्रसाद,
सायंकाळी ७ वाजता डॉ शिवरत्न शेठे यांचे हिंदू धर्माच्या वर्तमान काळातील आचरण विषयवर व्याख्यान नंतर जगद्गुरुंचे आशीर्वचन महाप्रसाद.
गुरुवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता श्रीरुद्रयाग ८:३० वाजता जगद्गुरुंचे इष्टलिंग महापूजा आणि जगद्गुरू सानिध्यात आणि शिवाचार्यांच्या उपस्थितीत अय्याचार आणि शिवदीक्षा विधी कार्यक्रम
आणि सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. श्री गहनीनाथ महाराज औसा संस्थान मठ व सहअध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, पंढरपूर यांचे प्रवचन आणि जगद्गुरुंचे आशीर्वचन महाप्रसाद होणार.
शुक्रवार दिनक २६ जुलै रोजी सकाळी ठीक ९ वाजता श्री जाग्द्गुरुंचे इष्टलिंग महापूजा व होमाचे पूर्णाहुती, आशीर्वचन कार्यक्रमाचे सांगता समारंभ नंतर महाप्रसाद.
या पाच दिवसीय कार्यक्रमात शिवाचार्यरत्न श्री.ष.ब्र. वीरतपस्वी वीरभद्र शिवाचार्य स्वामीजी कडगंची, श्री रेवणसिद्धेश्वर आश्रम सोलापुर, श्री ष. ब्र डॉ पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी ब्रह्ममठ माळकवटा श्री. ष.ब्र. श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, नागणसुर, रेवूर, श्री ष.ब्र. नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी मैंदर्गी, श्री. ष. ब्र शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी नावदगी, श्री.ष.ब्र. सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी शहापूर कर्नाटक, श्री.ष.ब्र. गुरु शांतवीर शिवाचार्य स्वामीजी औसा, श्री.ष. ब्र गुरुशांतलिंग शिवाचार्य स्वामीजी कल्लहिप्परगा, श्री ष. ब्र राजशेखर शिवाचार्य स्वामीजी हुब्बली, श्री. ष. ब्र चन्नयोगीराजेन्द्र शिवाचार्य स्वामीजी ब्रहन्मठ होटगी सोलापुर, श्री म.नी. प्र बसवलिंग स्वामीजी अक्कलकोट, श्री म. नी. प्र स्वामिनाथ स्वामीजी किरीटमठ संस्थान सोलापुर, मंडळाचे मार्गदर्शक व्याख्यान केसरी श्री बसवराज शास्त्री हिरेमठ व वे. मु. श्री सिद्धय्या स्वामी हिरेमठ, उपस्थित राहणार आहे संगीतकार गायक गानविभूषण श्री शिवरुद्रय्या गवई गौडगाव जिल्हा कलबुर्गी तबलावादक मांत्रिक श्री शांतकुमार जेरटगी यांचे भक्तीगीत संगीत कार्यक्रम होणार आहे.
पत्रकार परिषद मध्ये उपस्थित डॉ. शिवयोगी शास्त्री होळीमठ संस्थापक अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष वे. मु. श्री बसवराज शास्त्री पुराणिक, उपाध्यक्ष वे. मु. श्री कल्लय्याशास्त्री गणेचारी, सचिव श्री विद्यानंद स्वामी सर, सदस्य श्री नंदकिशोर हिरेमठ, वे. मु. श्री रेवणय्या स्वामी (वैभवलक्ष्मी मंदिर जुळे सोलापुर), श्री नागेश स्वामी श्री सौरभ स्वामी , वे.मु.श्री चिदानंद स्वामी (संतोषीमाता मंदिर जुळे सोलापुर), वे. मु. श्री संगय्या स्वामी शेगाव, वे. मु. श्री महेश बेंबळगी वे. मु. श्री ईश्वर स्वामी होळीमठ उपस्थित होते.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


