माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा होणार; गौरव समितीकडून चित्रकला, भजन स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

न्यूज
19-07-2024
माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा होणार; गौरव समितीकडून चित्रकला, भजन स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला स्पर्धा, भजन स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा यासह सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबीर आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणीजणांचा सत्कार समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी आमदार दिलीप माने यांचा दि. 3 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा केला जाणार आहे. दिलीप माने हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील नावाजलेले कार्यकुशल व्यक्ती म्हणून ओळखले जातात. विविध क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून विकासकामाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. तोच दृष्टिकोन ठेवून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते पृथ्वीराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस गौरव समितीने विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. २० जुलै २०२४ रोजी ‘भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. सुमारे 64 शाळा आणि उपकेंद्रावर या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 50 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येक केंद्रनिहाय रोख बक्षिसे देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
“सोलापूरला कलेची मोठी परंपरा आहे. सोलापूरच्या मातीत अनेक दिग्गज कलाकार घडले आहेत. ही परंपरा कायम राहावी, नवनवे कलाकार पुढे यावेत असाच दृष्टीकोन दिलीप माने साहेबांचा कायम असतो. त्यांनी नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांचा हाच दृष्टीकोन आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे या स्पर्धेत प्रत्येक पाल्यांनी आपल्या मुलांचा सहभाग नोंदवावा,” असे आवाहन पृथ्वीराज माने यांनी केले आहे.भजन स्पर्धेचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच माननीय मानेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची जोड देत जुळे सोलापूर येथील गोविंदश्री मंगल कार्यालय येथे भजन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. २७ व रविवार २८ जुलै, २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत पार पडणार आहे.
या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११०००, द्वितीय ७००० तर तृतीय ५००० आणि उत्तेजनार्थ २१०० असे पारितोषिक असेल. या भजन स्पर्धेसाठी जास्तीत जास्त भजनी मंडळानी दि. २५ जुलै पूर्वी नाव नोंदवून सहभाग घेण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
रक्तदान शिबीर, नागरी सत्काराचे आयोजन
याशिवाय गौरव समितीच्या वतीने २ ऑगस्ट रोजी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे अभिषेक आणि महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ग्रामीण आणि शहरी भागातील रहिवाशी भवत्तांना समितीच्या वतीने सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.
माने यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ३ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील जामगुंडी मंगल कार्यालय येथे माने यांचा जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या हस्ते नागरी सत्कार समारंभ पार पडणार आहे. याशिवाय या दिवशी सोलापुरातील गुणवंत विद्यार्थी आणि आधुनिक शेती करून कृषी क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या बळीराजाचा सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान
शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच महिला भगिनीच्या कला गुणांना वाव देण्यासाठी पाक कला, होम मिनिस्टर स्पर्धा यांचेही आयोजन केले जाणार आहे. तसेच शहर आणि ग्रामीण भागात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तरी सोलापूर शहर, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी या विविध कार्यक्रमप्रसंगी सहभाग नोंदवावा असे आवाहन दिलीप माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


