कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा
~_सत्यशोधक शंकरराव लिंगे_~
सावता महाराज कधीही पंढरपूरला वारीला गेले नाहीत त्यांनी आपल्या शेतामध्ये परिश्रम केले त्यामुळे शेतात आलेल्या पिकामध्ये फळांमध्ये फुलांमध्ये त्यांना पांडुरंग दिसत होता ते म्हणतात पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी पंढरपूरला वारीला कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही आपलं काम इमानदारीने कष्टाने केलं तर पांडुरंग आपोआप आपणाला प्रसन्न होऊन फळ देतो आशीर्वाद देतो आपली प्रगती करतो श्रमाशिवाय आपली प्रगती होत नाही सर्व संतांच्या पालख्या आषाढी वारीला दरवर्षी पंढरपूरला लाखोच्या संख्येने येतात एकमेव संत शिरोमणी सावता महाराज यांची पालखी पंढरपूरला जात नाही पंढरपूर होऊन पांडुरंगाची पालखी कोणत्याही संताच्या गावाला जात नाही फक्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनी आषाढ वद्य चतुर्दशीला अरण ला येते सावता महाराज यांच्या शेतामध्ये पांडुरंग पंढरपूरन आले होते त्यांना शोधण्यासाठी नामदेव आणि ज्ञानदेव त्यांच्या पाठीमागे शोधत आले होते
त्यामुळे पांडुरंगाने सावता महाराज यांना लपवण्यासाठी जागा मागितली त्यांनी वेळाने छाती कापून पांडुरंगाला आपल्या छातीमध्ये स्थान दिले असा एकमेव संत शिरोमणी सावता महाराज अरण आहेत म्हणून सावता महाराजांचे स्थान इतर संतापेक्षा फार वेगळे आहे आणि श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणून त्यांना शिरोमणी म्हणतात आहे ते म्हणतात प्रपंच राहून परमार्थ करता येतो भक्ती करता येते नाचू गाऊ अंगणी कळी काळाच्या माथी मारू सोठे वैकुंठीचा देवच आणू कीर्तनी इतका विश्वास सावता महाराजांचा आपल्या कर्तुत्वावर श्रमावर भक्तीवर होता आपण जर चांगलं काम केलं काम करत करत पांडुरंगाची भक्ती केली कोणत्याही अडचणीवर मात करून आहे त्या ठिकाणी पांडुरंग आपल्याबरोबर येतो आपल्याबरोबर असतो आपल्याबरोबर आणता येतो आपल्या सहवासात ठेवू शकतो त्यासाठी जप जाग त्याग तप कर्मकांड करण्याची गरज नाही असा संत शिरोमणी सावता महाराजांचा महिमा आगाद आहे
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
०’ अवघी विठाई माझी ‘ पुस्तक प्रकाशित ….
० जयकुमार चर्जन यांनी गुंफले व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प …
सकल ओबीसी समाज समितीचे वतीने अमरावती शहरात वारकरी संप्रदायातील अठरापगड जातीतील संतांचे जीवनावर प्रकाश टाकणारी दहा व्याख्याने आयोजित केल्या गेली आहे . अमरावती शहरातील विविध भागात ही व्याख्याने होत आहे .याच व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात वारकरी संप्रदायात संत शिरोमणी म्हणून आदराचे स्थान असलेले कर्मवादी व प्रागतिक विचारांचे संतश्रेष्ठ श्री .सावता महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित विदर्भातील सत्यशोधक विचारवंत , लेखक व पत्रकार जयकुमार चर्जन यांनी लिहिलेले ‘ अवघी विठाई माझी ‘ हे संतपर पुस्तक प्रकाशित झाले आहे . रविवार दि .१४ / ७ / २०२४ रोजी अमरावती येथील सावता कॉलनी येथील श्री . संत सावता महाराज सभागृहात संपन्न झालेल्या अलुतेदार , बलुतेदार , भटक्या विमुक्त जनजाती ( सकल ओबीसी समाज ) समन्वय समिती, अमरावती जिल्हा आयोजित संत चरित्र व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात मान्यवरांचे हस्ते सदर पुस्तक प्रकाशित केले गेले . श्री. चर्जन यांचे लोकशिक्षक कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या कार्यकतृत्वावर प्रकाश टाकणारे ‘ मायबापहो … हाक गाडगेबाबांची ‘ हे वैचारिक पुस्तक मागच्या वर्षीच प्रकाशित झाले होते . त्यानंतर ‘अवघी विठाई माझी ‘ हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे . मुंबई येथील पी . आर . गृपस् पब्लीकेशनने प्रकाशित केलेल्या ‘ अवघी विठाई माझी ‘ या पुस्तकास परभणी येथील प्रागतिक कीर्तनकार ह . भ .प. धर्मकिर्ती महाराज( नितीन सावंत ) यांची प्रस्तावना तर राष्ट्रीय वारकरी महामंडळाचे सदस्य , जेष्ठ साहित्यिक व अभ्यासक ह . भ .प. प्रा . रामकृष्णादादा महाराज पाटील , जामनेर ( मुक्ताईनगर ) यांचे आशीर्वाद व महाराष्ट्रातील पुरोगामी कीर्तनकार ह .भ .प. संत श्री .सत्यपाल महाराज ( अकोट ) यांच्या शुभेच्छा लाभल्या आहे .
सदर प्रकाशन सोहळा व व्याख्यनमालेच्या व्दीतिय पुष्पाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अभियंता शांतारामजी होले शहराध्यक्ष माळी महासंघ ,व्याख्यानमालेचे आयोजक व प्रमुख मार्गदर्शक इंजिनिअर वासुदेवराव चौधरी समन्वयक सकल ओबीसी समाज , सावित्री शक्तीपीठ पुणेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ .शीला चर्जन, प्रभाताई भागवत आदि मान्यवर उपस्थित होते . ‘अवघी विठाई माझी ‘ या पुस्तकात संत सावता महाराजांचे ४० अभंग अर्थासह दिले असून संत सावता महाराज व चमत्कारिक आख्यायिका , सावता महाराज समाधी … एक प्रश्नचिन्ह , संत सावता महाराज यांच्या अभंगविचारातील विरोधाभास यासारखी संशोधात्मक प्रकरणे स्वतंत्र जोडलेली आहेत .
संत शिरोमणी सावता महाराज यांचे जीवन कार्यावर साहित्यिक जयकुमार चर्जन यांनी प्रकाश टाकून या व्याख्यानमालेचे व्दीतिय पुष्प गुंफले आहे .
सदर व्याख्यानमाला व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक श्रीराम कोल्हे, अध्यक्ष बारा बलुतेदार अठरा पगड जाती, सूत्रसंचालन श्री. डी. एस. पवार अध्यक्ष अ. भा. माळी महासंघ अमरावती, व्याख्याता जयकुमार चर्जन, आभार प्रदर्शन प्रा. रुपेश फसाटे यांनी केले. यावेळी जेष्ठ साहित्यिक ,विचारवंत इंडियन बुक्स ऑफ रेकॉर्टमध्ये नोंद झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया ‘ ऋणानुबंध ‘ वधूवर परिचय मेळाव्याचे संयोजक प्रा .श्रीकृष्ण बनसोड सर , सौ . रजनीताई आमले ,सुभाष गोहत्रे ( धनगर समाज ) , श्रीमती भागवत अध्यक्ष विदर्भ प्रांत, अरविंदराव अकोलकर कार्याध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ अमरावती, श्रीकृष्ण मोहोरे (तेली समाज ), अनुष्का बेलो कार ( सुतार समाज ) कॉ .नंदकिशोर नेतनराव , सकल ओबीसी समाज समितीचे पदाधिकारी गणेशराव मानकर , शरद वऱ्हेकर,एड् प्रभाकर वानखडे, आशीष मालधुरे , शैलेश काळे , इंजि .मृणेश गणोरकर यासह अलुतेदार -बलुतेदार समाजातील शेकडो मान्यवर हजर होते .
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्रीसंत सावता महाराज हे
वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ रोहणाऱ्यांपैकी एक संत असून त्यांनी मांडलेला श्रमजीवी सिद्धांताचे शब्दांकित दर्शन ‘अवघी विठाई माझी ‘ पुस्तकातून आपणास हे पुस्तक वाचतांना होईल . सावता महाराजांनी आपल्या कर्मातच विठ्ठल स्वरुप पाहिले होते . त्यांची कर्मप्रधान भक्ती या पुस्तकात संशोधन व विज्ञाननिष्ठ पध्दतीने मांडलेली आहे .
जयकुमार चर्जन
परतवाडा अमरावती




