सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 87

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 87

 

….. मी.जातीला याचा फटका पडून आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर जाण्याची शक्यता प्रबळ होईल. प्रगत जाती आरक्षणाच्या कक्षेतून बाहेर काढल्या पाहिजे, असा शेरा रोहिणी आयोग आणि कोर्टाने मारल्याच्या बातम्या येत आहे. तसे झाले तर मराठा जातीचे कुणबीकरणाचा पहिला फटका कुणबी जातीला पडेल आणि आरक्षणाच्या कक्षेतून कुणबी आणि मराठा बाहेर पडेल. म्हणून कुणबी जातीने जास्त सावध राहणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रात सरकारी नोकरी, उद्योग, बैंक, सहकार, साखर कारखाने, शिक्षण संस्था, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रात मराठा जातीचे प्राबल्य आहे.

त्यामुळे मराठा जातीचे कुणबीकरण झाल्याबरोबर कुणबी प्रगत जातीच्या श्रेणीत येईल. दुसरा फटका ओबीसी जातींना पडेल. मराठा अधिपत्याखालील महाराष्ट्रातील वरील संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण भरतांना एकट्या मराठा जातीची भरती करून तेली, माळी, कुणबी, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, कोळी, साळी, धनगर, वंजारी इत्यादी ओबीसींना टाळले जाईल. ओबीसी आरक्षण असलेल्या राजकीय जागा इतर ओबीसी जातींना द्यायची गरज उरणार नाही. यासाठीच ओबीसींमधून आरक्षणाचा आग्रह धरला जात आहे. दुसऱ्या बाजूने मराठा समाज ईडब्लूएस मधून गरीब मराठ्यांना मिळणाऱ्या संधीपासून मुकणार आहे. आणि एवढा मोठा मराठा समाज ईडब्लूएस श्रेणीतून बाद झाल्याचा फायदा ब्राह्मण व तत्सम जातींना होईल. म्हणूनच संभाजी भिडे आणि प्रस्थापित मिडिया ओबीसीकरणाला (कुणबीकरणाला) उचलून धरत आहे. अर्थात गरीब मराठ्यांच्या नावाने गळा काढणारे गरीब मराठ्यांनाच बुडवायला निघाले. हे गरीब मराठा तरुणांनी देखील समजून घेणे आवश्यक आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जातीनिहाय जनगणना आणि लोकसंख्या प्रमाणात प्रतिनिधित्व याच मुद्यावर संघर्ष करणे मराठा आणि ओबीसी दोन्ही भावंडांचे हीत आहे. दोघांच्या भांडणात तिसराच लोण्याचा गोळा फस्त करेल आणि हाती धुपाटणे येईल असे वागणे हिताचे नाही.

सामाजिक आधार घेऊन, सामाजिक समतेचा विचार घेऊन, ओबीसी दलित, आदिवासी, मराठा, मुस्लिम इत्यादी बहुजन समाजाच्या एकतेचे सुत्र, बंधुतेचा ध्यास घेऊन आंदोलन पुढे नेले तरच विषमतावादी धर्म व्यवस्था, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, भांडवली व्यवस्था इत्यादी द्वारे चाललेल्या शोषणाला पायबंद घालून समतेचे, समृद्धीचे बळीराज्य आणता येईल. आमदार पाडू, खासदार पाडू या वल्गणांमध्ये देखील दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे घडेल. एकट्या मराठा जातीचा अहंकार फुगवून इतर जातीचे उमेदवार पाडण्याचा विचार करु लागले तर इतर ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम एकवटेल आणि मराठा उमेदवारांची देखील तीच गत होऊ

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकार

शकते. आणि शोषकांना हेच हवे आहे. म्हणूनच भक्त लुडबुड करताना जास्त दिसते. बहुजन बेकीचे परीणाम आपल्याला भोगावे लागू नये म्हणून सर्वांनी सामंजस्याने वागणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ पंजाबराव देशमुख इत्यादी महापुरुषांनी दिलेल्या सूत्राच्या आधाराने स्त्रीशूद्रातिशूद्र शेतकरी कामगार बहुजनांच्या हितासाठी आपण समता, बंधूभाव, स्वातंत्र्य इत्यादी मूल्याची कास धरून एकतेने पुढे गेले पाहिजे. धर्माच्या, जातीच्या भिंती उभ्या करुन धुडगूस घालणाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे.

बेरोजगारीच्या विळख्यात युवा पिढीला ढकलणाऱ्या व्यवस्थेला उखडून फेकले पाहिजे. मराठा समाजाला पक्के आरक्षण देण्यासाठी इथल्या इथे उड्या मारणारे केंद्रात कायदा का? करत नाही, ५०टक्केची मर्यादा का काढत नाही? हे प्रश्न घेऊन लढणे जास्त महत्त्वाचे आहे. समाजाला गोलगोल फिरवून फसवणूक करणाऱ्या राजकीय खेळी समजून घेतल्या पाहिजेत. गोंड- गोवारी मध्ये स्वल्पविराम नसल्यामुळे अत्यंत मागास गोवारी समाजाला वर्षानुवर्षे फिरवणारे, मराठ्याचे कुणबी सहज करेल अशा भ्रमात मराठ्यांनी राहू नये. जातीनिहाय जनगणनेशिवाय पुढच्या संघर्षाला दिशा मिळू शकत नाही. लोकसंख्या कळू शकत नाही. म्हणून सर्व जातींची जातीनिहाय जनगणना हाच सामाजिक चळवळीचा कळीचा प्रश्न आहे. त्यासाठी सर्व मिळून संघर्ष करु.

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर गढूळ वातावरण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी बुद्धीवंतांनी समाजाला योग्य दिशानिर्देश करण्याची गरज आहे. वर्तमान वातावरणाचे एकूण बहुजन समाजावर काय परिणाम होऊ शकतात? याचे योग्य विश्लेषण बुद्धीवंतांनी पुढे आणले नाही तर समाजातील युवकांना समतावादी संस्कृतीचे भान कोण देणार? सत्यशोधक चळवळीच्या काळात देखील ब्राम्हणेतर चळवळीत मराठा मराठेतर दुफळी होऊन समतेचा संघर्ष कमजोर केला गेला. आजही त्याच दिशेने वातावरण तयार होताना दिसत आहे. हे टाळण्यासाठी बुद्धीवंतांच्या फळीकडून प्रयत्न झाले पाहिजे. बुद्धीवंतांमध्ये देखील ओबीसी आणि मराठा अशी विभागणी झाल्याचे दिसून येते. खरे तर सर्व बुद्धीवंतांनी एकत्र बसून यावर विचार विमर्श करून सांस्कृतिक दृष्ट्या योग्य निर्णय घेत सामाजिक ऐक्य निर्माण केले पाहिजे. ही सामाजिक विचारवंत आणि बुद्धीवंतांचीच जबाबदारी आहे. विषमतावादी, शोषित जातींना आपापसात लढवून कमजोर करण्यात तरबेज असल्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

□□□

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

(87)शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button