सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.86

सत्यशोधकाचे अंतरंग
क्रमशा.86

चोपडे अशोक (जन्म २८ फेब्रुवारी १९६२)

विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, विदर्भातील सत्यशोधक समाजाचे भूतपूर्व अध्यक्ष, अ. भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष तथा बिनीचे सत्यशोधक कार्यकर्ते डॉ. अशोक चोपडे हे मौजे आजंती, ता. नेर, जिल्हा यवतमाळ येथील मूळ रहिवासी असून, सध्या ते वर्धा येथे वास्तव्यास आहेत.

डॉ. अशोक चोपडे यांनी विदर्भात दौरे करून सत्यशोधक समाज संघटन वाढविले. सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, संशोधक असलेल्या डॉ. अशोक चोपडे यांनी काही वर्षे मराठी विषयाचे ते सातत्याने अध्यापनही केले. सत्यशोधकी ब्राह्मणेतर चळवळीवर लेखनही करतात आणि व्याख्यानेही देतात. ते नागपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘मराठामार्ग’ या मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

त्यांचे आतापर्यंत ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक जोतीराव फुले’, ‘विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य’ हे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. विशेषतः ‘विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य’ या ग्रंथासाठी त्यांनी विदर्भातील १४० सत्यशोधकी साहित्यिकांचा कसून धांडोळा घेतला आहे. त्यांचे हे सत्यशोधकी कार्य असाधारण आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने जोतीराव कालखंडोत्तर विदर्भातील सत्यशोधकांना न्याय दिला आहे.

डॉ. अशोक चोपडे यांनी विदर्भात सत्यशोधक चळवळीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून दिनांक ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर १९९६ रोजी सत्यशोधक समाजाचे २५ वे अधिवेशन वर्धा येथे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घेतले. तसेच सत्यशोधकी तिसरे साहित्य संमेलन आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने नागपूर येथे दिनांक २८ व २९ जानेवारी २००६ रोजी घेतले.

डॉ. अशोक चोपडे यांनी महात्मा फुलेलिखित ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button