सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.26

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.26
झेंडे विठ्ठलराव सखाराम
(जन्म १८७४-मृत्यू १९३३)
ब्राह्मणेतर – सत्यशोधक चळवळीतील एक अग्रणी पुणेकर सत्यशोधक विठ्ठलराव सखाराम झेंडे यांचा जन्म इ. स. १८७४ साली झाला. विठ्ठलराव झेंडे हे पुणेकर सत्यशोधक दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे यांचे सहकारी होते. त्यांचा अबकारी आणि शेतीचा व्यवसाय होता. राजर्षी शाहू महाराजांचे ते निस्सीम भक्त होते. पुण्यात राजर्षी शाहू महाराजांचे आगमन झाले की, झेंडे कायम शाहू महाराजांसमवेत राहत असत. पुणे येथे पार पडलेल्या पाटील परिषद आयोजनातही झेंडे यांचा सक्रिय सहभाग होता.
सत्यशोधक विठ्ठलराव झेंडे हे पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना अन्य दुसरे न. पा. सदस्य केशवराव जेधे यांनी ४ जुलै १९२५ रोजी महात्मा फुले यांच्या स्मारकाचा ठराव पुणे नगरपालिकेत मांडला होता. या क्रांतिकारी ठरावाचे झेंडे हे अनुमोदक होते. या ठरावावर पुणे नगरपालिकेच्या प्रशस्त दिवाणखान्यात रावबहादूर ल. ज. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली साधक-बाधक चर्चा घडून आली. या बैठकीला सायंकाळी ५.३० ला प्रारंभ झाला. पुणे न. पा. चे जवळपास सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते. या क्रांतिकारी ठरावाचे मांडणीकार केशवराव जेधे, अनुमोदक विठ्ठलराव झेंडे, न. प. सदस्य वायाळ आणि सणस एकत्र सभागृहात उपस्थित होते. सनातनी न. पा. सदस्यांनी केशवराव जेधे यांच्या बोलण्यात अडथळे निर्माण केल्याने जेधे, झेंडे, सणस आणि वायाळ आदी सत्यशोधकांनी सभात्याग केला. यानंतर सभागृहात एकांगी कुटिल चर्चा होऊन जेधे यांनी मांडलेला आणि झेंडे यांनी अनुमोदित केलेला हा क्रांतिकारी ठराव रात्री नऊ वाजता फेटाळण्यात आला.
उपरोक्त ठराव फेटाळल्याने अनुमोदक विठ्ठलराव झेंडे नाउमेद झाले नाहीत. उलट केशवराव जेधे, विठ्ठलराव ठुबे, दिनकरराव जवळकर आदींच्या खांद्याला खांदा लावून सत्यशोधक चळवळीत सक्रिय राहिले. पुणे येथील पुढे नावलौकिक पावलेल्या गुरुवर्य बाबूराव जगताप यांची ‘श्री शिवाजी शिक्षण संस्था’ स्थापन
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




