सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 41

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
41

भटके यांच्यासाठी अशा प्रयत्नांची गरज असताना हे घडले नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्यांनी पालातव साजरा केला. सत्ताही जातीसाठी माती खाते याचा अनुभव पुन्हा आला. भटके अ. ब, क, ड आणि इतर मागास (SEBC) यांनाही शासनाने विशेष मोहीम हाती घेऊन गावागावात जाऊन जात प्रमाणपत्र द्यावेत. अशी भावना गेल्या पचास वर्षात का झाली नसेल? यांचे उत्तर सर्वानाच माहिती आहे. या आरक्षणातून सत्ता त्यांना समान संधी देऊ इच्छित नाही. उत्पचाचे कोणतेही स्रोत हाती नसलेल्या आणि व्यवस्थेने लाचार बनवलेल्या लोकांना आहे त्या स्थितीत ठेवण्याची सत्तेची इच्छा असते. म्हणून हे घडते आहे.

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या दैन्याच्या या चक्रात पिळून निघालेल्या लोकांचे आर्थिक दैन्य त्या दैन्यातून जन्माला येते. हे सारे घडते तेव्हा हताश, हतबल, असाह्य स्थिती निर्माण झालेली असते. ही स्थिती गुलाम बनवते. विवेक हरवतो, त्यातून दैव, नसीब, प्रारब्ध, प्राक्तन प्रबळ होते. हे प्रबळ झाले की जात आणि धर्म हेच आधार उरतात. परिणामी सत्ता त्याचा गैरफायदा घेऊन दैन्यात असलेल्या सत्ताहीन, शस्त्रहीन, संपतीहीन, आस्तित्वहीन लोकांना अधिक नागवते. म्हणून ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे धोरण सरकार राबवते आणि गरिबांना अस्तित्वहीन ठेवत गुलाम बनवते. हे सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक दैन्य नष्ट व्हाव म्हणून महात्मा जोतीराव फुले यांनी ऐतिहासिक राजकीय संघर्ष केला.

सर्व स्तरात आरक्षणाची मागणी केली. त्याशिवाय ‘नेशन’ (Nation) होणारच नाही ही भूमिका घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हाच लढा देत समता आणि सामाजिक न्याय यासाठी घटनात्मक तरतूद केली. आता सताच घटनात्मक तरतूदीशी अप्रामाणिक झाली आहे. ज्या जातीकडून आपल्या जातीच्या हाती सत्ता सोपवली जाते तेच आपल्या जातीसाठी आरक्षण देण्यासाठी सत्ता राबवत आहेत, दुबळ्या जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे करतो आहोत असा गाजावाजा सर्वच नेते महानेते एका सुरात करीत आहेत. घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतल्याने सत्तेतील मुखंडांनी मूळ आरक्षणाला धक्का न लावता त्यांना त्यांच्यातच सामील केले.

धक्का न लावता ओबीसीतूनच दिले आणि आपण प्रामाणिक असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे भाविण, भडमुंजा, गुरव, गवंडी, जोगीण, कोल्हाटी, कापड़ी, कसबी, कुंभार, कासार, मानभाव भोपी, मेदार, पांचाळ, सुतार, सोनार, फुलारी, रंगारी, शिंपी, परीट, न्हावी, तेली, माळी, साळी, बागबान, काथार वाणी, मोमीन, अतार, तांबोळी, कोळी, चांडाळ, दर्जी, डोंबारी, लोहार, घिसाडी, गोसावी, पिंजारी, फकीर, मुलाणा, भामटे. बेरड, धनगर, बेलदार, सिक्कलगर, भुते, गारूडी, गोंधळी, गोपाळ, पांगुळ, नंदीवाले, वासुदेव, मसणजोगी यासह ४०० जाती आणि नव्याने समाविष्ट मराठा-कुणबी यांच्यात समता प्रस्थापित करण्याचे धोरण नव्या महायुती सरकारचे महाधोरण स्पष्ट झाले. आरक्षणाला धक्का न लावता सरळ घुसखोरीला परवाना दिलात.

आता मूळच्या लाभ न मिळालेल्या लोकांना यापुढेही लाभ मिळणार नाही याची तरतूद गोड गोड बोलून करण्यात आली आहे. यासाठी सर्वच पक्षातील नेते- महानेते समर्थन देत राहिले. उघड उघड समर्थन देणाऱ्यांना माहीत आहे की, ओबीसी आपले काहीही वाकडे करू शकत नाहीत, सर्व प्रकारच्या सत्ता आपल्या हाती आहेत. सत्ताहीन, संपत्तीहीन, अस्तित्वहीन लोक संख्येने अधिक असले तरी त्यांच्यात आपल्या विरोधात लढण्याचे बळ नाही यातुन हे सारे घडले आहे. ओबीसीमधील अनेक जातीच्या भयावह स्थितीबद्दल महाराष्ट्र देशीचा एकही विवेकवादी माणूस बोलला नाही. ७५ वर्षात ओबीसींचा राजकारणात सर्वच पक्षांनी फायदा घेतला. अलीकडे भाजपने याचा अधिक फायदा घेतला. मात्र ओबीसींसाठी एकही राजकीय पक्ष ओबीसीच्या सामाजिक न्यायासाठी बोलत नाही.

अस्तित्वहीन लोकांचे ७५ वर्षात असेच शोषण झाले आहे. ओबीसीतील ४०० जातीपैकी ३०० जाती अशा असतील की त्यांना विधीमंडळ, संसदेपर्यंत जाता आले नाही. साधे जिल्हा परिषदेत पदाधिकारी होता आले नाही. आरक्षणाची अटच आहे की, सत्तेमध्ये पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे. जे गेल्या ७५ वर्षात मिळाले नाही ते यापुढे मिळेल अशी कोणतीही शक्यता राजकारणी लोकांनी शिल्लक ठेवली नाही. उलट त्यांचे संपूर्ण अस्तित्वच त्यांना मान्य नाही. हे चित्र देशाच्या प्रत्येक राज्यातील आहे. त्या त्या राज्यातील प्रबळ जातीच्या हाती सत्ता असल्याने बहुसंख्य ओबीसी जातीचा प्रस्थापित राजकारणी खेळणे म्हणून उपयोग करतात.

भटक्या-विमुक्त भटक्या अ, ब, क, ड या जातीही महाराष्ट्र राज्याबाहेर केंद्र सरकारसाठी ओबीसी आहेत. गोरगरीबांच्या लेकरांसाठी ओबीसींतून आरक्षण मागणाऱ्या आणि त्यांच्या मागणीसाठी झटणाऱ्या नेत्यांनी, महानेत्यांनी आजूबाजूला बघितले आहे का? मसणजोगी, वडार, कैकाडी, कोल्हाटी, भाविण, बेरड, फकीर, उचले यासह बलुतेदार अलुतेदार यांची स्थिती काय आहे? यातील खूप जाती अशा आहेत की, त्यांना गाव-शिवारात स्थान नाही. संसार पाठीवर घेऊन आज़ इथे, उद्या तिथं फिरणाऱ्या जातीचे काय? बलुतेदारांमधील हजारो कुटुंब काही क्योंनी गावे का बदलतात? या छोट्या जाती प्रबळ जातीच्या दबावाखाली का असतात? ग्रामसेवकः तलाठ्यापासून जिल्हाधिकारी-पोलीस अधिक्षकांपर्यंतची सरकारी यंत्रणा प्रबळ जातीच्या

 

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button