ड्रीम फाउंडेशन व पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ एन.एस.एस. विभाग तर्फे वारी करियरची ‘दिशा समृध्द जीवनाची’ या अभिनव उपक्रमाचे दि.९ ते १७ जुलै दरम्यान आयोजन

न्यूज
05-07-2024
ड्रीम फाउंडेशन व पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ एन.एस.एस. विभाग तर्फे वारी करियरची ‘दिशा समृध्द जीवनाची’ या अभिनव उपक्रमाचे दि.९ ते १७ जुलै दरम्यान आयोजन
सोलापूर दि.: ड्रीम फाउंडेशन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर जिल्यातील विविध महाविद्यालयात आषाढी वारीतील विविध दिंडीच्या प्रेरणेतून “वारी करियरची, दिशा समृध्द जीवनाची” या शैक्षणिक, करियर मार्गदर्शन, कृषि पर्यटन, उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन, अध्यात्मिक प्रबोधनपर युवा विकास दिंडीचे मंगळवार दि.९ जुलै २०२४ ते १७ जुलै २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक काशिनाथ भतगुणकी व ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ एन. एस. एस. विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. राजेंद्र वडजे यांच्या मुख्य समन्वयातून व ह.भ.प. गहणीनाथ औसेकर महाराज, सोलापूरचे जिल्हाधिकारी व सोलापूरच्या कृषि पर्यटनासाठी विशेष मार्गदर्शन कराणारे मा. कुमार आशिर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही दिंडी सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयात जाणार असून या दिंडीत वृक्षारोपण, समाज प्रबोधन व्याख्यान, व्यसनमुक्ती, किर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, सेंद्रीयशेती व उद्योग मार्गदर्शन होणार आहे.
सोलापूर शहर जिल्हयातील विविध शाळा, महाविद्यालय, प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक मंदिरे, कृषि पर्यटन केंद्र आणि विविध सोलापूरातील प्रसिध्द उद्योग यांचा विद्यार्थी यांच्याशी समन्वय साधावा व यातून विद्यार्थी, शिक्षक, महिला शेतकरी यांना प्रबोधनपर अध्यात्मिक, सामाजिक जनजागृतिसाठी या अभिनव दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे काशिनाथ भतगुणकी यांनी सांगितले आहे. या दिंडीतील पालखीत विविध संताचे ग्रंथ ठेवण्यात येईल. या उपक्रमात विविध तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार असून यामध्ये डॉ. शिवरत्न शेटे, श्रृतिश्री वडकबाळकर, प्रा. शिवाजी पवार, प्रबोधनकार येडवे व बिदरकर गुरुजी, शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, प्रशिक्षक अरविंद बगले, अमित कामतकर, शाहीर रमेश ख्याडे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, उद्योग, शेती व प्रशासकीय अधिकारी यांचे करिअर मार्गदर्शन होणार आहे. या दिंडीत पु. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यासह विविध शाळा, महाविद्यालये, विविध प्रसिध्द मंदिरे, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था संघटना यांना सहभाग असून प्रत्येक मुक्कामी ठिकाणी नागरीकांना भारंड, कीर्तन व प्रवचनातून प्रबोधन करण्यात येणार असल्याचे प्रा. राजेंद्र वडजे यांनी सांगितले आहे.
वारी करियरची या दिंडीचे उद्घाटन मा. डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरु पु.अ.हो. सोलापूर
विद्यापीठ) यांच्या शुभहस्ते मंगळवार दि.९/७/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठ प्रांगणात
होणार असून यावेळी शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, बालाजी अमाईन्सचे रामरेड्डी, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन.एस.एस. विभाग प्रमुख श्री. राजेंद्र वडजे इत्यांदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत “वारी करियरची, दिशा समृध्द जीवनाची…” या दिंडीचे शुभारंभ होणार आहे.
ही दिंडी सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयात सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत जाणार असून या दिंडीत बालाजी अमाईन्स तर्फे वृक्षारोपण आणि डॉ. कलाम कौशल्य विकास तर्फे मान्यवरांचे करियर मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना लाभणार आहे.
या दिंडीचे पहिला विसावा रुपाभवानी मंदिर, दुसरा विसावा वळसंग येथील स्वामी समर्थ सेवाधाम, तिसरा विसावा श्री संगमेश्वर देवस्थान हत्तरकुडल, चौथा विसावा भारतमाता आदिवासी विकास संस्था मोहोळ, पाचवा विसावा बार्शी भगवंत नगरी, सहावा विसावा श्री सिध्देश्वर मंदिर, सातवा विसावा एसव्हीसीएस संस्था अक्कलकोट रोड, आठवा विसावा गजानन महाराज मंदिर सोरेगांव या ठिकाणी नियोजीत असून या दिंडीचे संयोजन ड्रीम युवा मंच करीत असून “वारी करियरची, दिशा समृध्द जीवनाची…” या दिंडीच्या स्वागतासाठी व सहभागासाठी सतिष पाटील मो. ७२१९०९९९५५ व डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र मो. ९८३४३०६३३७ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी
केले आहे.
” वारी करियरची, दिशा समृध्द जीवनाची…” या दिंडीचा समारोप बुधवार दि.१७/७/२०२४ रोजी सायं. ५ वाजता चार हुतात्मा व पु. अहिल्यादेवी होळकर पुतळा, पार्क चौक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
आपला,
काशिनाथ भतगुणकी
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

