अर्जदारःश्रीमती उज्वला महादेव थिटे पाटील,

न्यूज
2-07-2024
अर्जदारःश्रीमती उज्वला महादेव थिटे पाटील, मु/पो : अनगर, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर Mob. +91 83086 08803 Email: ujwalathite037@gmail.com
प्रति,
विषयः सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका तील माजी आ. राजन बाबुराव पाटील व त्यांची मुले बाळराजे राजन पाटील, अजिंक्यराणा राजन पाटील यांनी केलेले गुन्हे मोहोळ स्टे. पोलिस निरीक्षक श्री. विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. राजकुमार डुणगे व डी.वाय.एस.पी. श्री. अमोल भारती यांनी कसे मिटवले. व पाटील कुटुंबाला हे पोलिस अधिकारी कसे लाच घेऊन एका मराठी शेतकरी महीला व तिचा मुलगा यावर अन्याय केलेले प्रकरण मिटवायला मदत कशी करतात हे दाखविणे साठी ही पत्रकार परिषद
संदर्भ:
1. विधवा महिलेचा मानसिक छळ करणे,
2. गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडलेला असतानाही त्या संदर्भा किरकोळ गुन्ह्याची फिर्याद (FIR) दाखल करून घेणे,
3. ती फिर्याद घेण्यासाठी 12 तासापेक्षा जास्त वेळ, रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला थांबऊन ठेवणे,
4. घरावर दरोडा टाकणारे संशयित सूत्रधार हे बड़े राजकीय नेते माजी आमदार राजन पाटील व त्यांची दोन्हीं मुले असल्याचे सांगून सुद्धा त्यांच्याकडून लाच घेऊन त्यांची नावे FIR मधून वगळणे,
5. संपूर्ण फिर्याद देत असतानाचे व्हिडिओ शूटिंग करणे व सदर रेकॉर्डिंग मुख्य संशयित आरोपी राजन पाटील व त्यांच्या दोन्ही मुलांना दाखऊन, त्यांची FIR मधून नावे वगळण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेणे
6. माझ्या मुलावर खोटी अॅट्रोसिटीची केस दाखल करून त्याला 12 वी च्या परीक्षेला बसू न देऊन त्याचे शैक्षणिक वर्ष वाया घालवणे, दाखला वर अॅट्रासिटी चा गुन्हा नोंद करणे.
7. महिलेच्या स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी पोलिस अधिकाऱ्यांकडून पोलिस स्टेशन मध्ये लज्जास्पद वागणूक मिळणे,
8. ऐकटी तरुण विधवा महिला शेतकरी असल्याने, गावातील राजकीय नेते व माजी आमदार राजन पाटील त्यांची मुले वाईट नजर ठेवणे.
* मुलावर खोटी केस, करणे
• घरावर दरोडा टाकणे,
• शेतातील साहित्याची चोरी करणे
• पाईप लाईन तोडणे, शेतातील मोटर गायब करणे
• सालगड्याला व मजुरांना शेतात काम करू नये म्हणून धमकावणे
• शेत जाळून टाकणे
• घराची लाईट, पाणी तोडून टाकणे,
• गावातील किराणा दुकान, दूधवाला यांना धमकावून आम्हाला किराणा साहित्य व दूध देण्यास प्रतिबंध करणे,
• रात्री अपरात्री घरावर दगड फेकणे,
* उसाचे बील अडवून ठेवणे
* प्रचंड शारीरिक व मानसिक छळ करून गाव सोडून जाण्यास भाग पाडणे.
वरिल विषयास अनुसरून
मी श्रीमती उज्वला महादेव थिटे, रा. अनगर ता मोहोळ जिल्हा सोलापूर ची रहिवासी असून एक विधवा महिला शेतकरी आहे मला 28 एकर शेतजमीन आहे त्यावर माझा दरनिर्वाह चालतो. मला एकच मलगा आहे.. मला वडील नाहीत, भाऊ नाही, सासुसासरे वारलेत नवरा पण वारला. आम्ही दोघंच मायलेकर शेती करून खाते होतो. माझ बीए शिक्षण झाले आहे. मला व माझ्या मुलाला अनगर येथील माजी आमदार राजन बाबुराव पाटील व त्यांची मुले विक्रांत ऊर्फ बाळराजे राजन पाटील व अजिंक्यराणा राजन पाटील यांनी मनात राग धरून खूप मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे.
राजन पाटील व त्यांची मुले, गावातील मागासवर्गीय समाजातील माणसे आम्हाला घरी मारायला पाठवतात, त्यांच्या सांगण्यावरून त्याच मागासवर्गीय समजतील लोकांनी माझ्या मुलावर खोटी ऍट्रोसीटी केस केली, आम्हा दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. घरात दरोडा टाकला. एक वस्तू ठेवली नाही, 11 तोळे दागिने रोख रक्कम चोरून घेणे, शेतात नुकसान केले.
माझी शेती करणाऱ्या वाटेकऱ्याला धमकी देतात शेती करू नका म्हणून वारंवार त्रास देतात. माझे शेतातील उतपन्न येत असलेले ऊसबील है अनाधिकृत पणे बँक अधिकारी यांना हाताशी धरुन सोसायटी । कर्जामध्ये वजा करून घेतले. हे सर्व मी सोलापूरचे एस.पी. श्री. शिरीष सरदेशपांडे साहेब यांना सांगितलं की, मला असा त्रास आहे. तर त्यांनी मला मोहोळला संबंधित लोकांच्या विरोधात तक्रार करा असे सांगितले.या सदर्भातील सर्व पुरावे माझ्या कडे आहेत.
एस.पी. साहेबांच्या सांगण्या वरून मी, राजन पाटील व त्यांच्या मुलांच्या विरोधात मुख्य संशयीत सूत्रधार म्हणून 29-4-2023 रोजी मोहोळ पोलिस स्टेशनला तक्रार द्यायला गेले असता, पी.आय. श्री. विनोद घुगे साहेब, ए.पी.आय.श्री. राजकुमार डुणगे साहेब हे माझं काही ऐकून घेत नव्हते. ते पुर्णपणे राजन पाटील यांच्या दबावाखाली काम करत होते. 12 तास मला पोलिस स्टेशनला बसवून घेतले गेले. माझ्या फिर्यादीत माझ्या घरावर टाकण्यात आलेल्या दरोड्याचे मुख्य सूत्रधार संशयित म्हणून मी माजी आमदार राजन
पाटिल व त्यांच्या दोन्ही मुलांची नावे घेतली होती. त्यामुळे माझी तक्रारच दाखल करून घेत नव्हते. मला गोड बोलून माझ्या समाधानासाठी तकलादू एन.सी तक्रार दाखल केली गेली.
राजन पाटलांच्या व त्यांच्या दोन्ही मुलांच्या सगण्यावरून माझ्या घरावर 3-5,2023 रोजी दरोडा टाकला. किती वस्तू चोरून घेऊन गेले याची शहानिशा करायला पोलिस आले तेव्हा चोरीची व्हीडीओ शुटींग कैलेले पुरावे पोलिसांकडे आहेत. चोरी तपासणी साठी आणखी फॉरेन्सिक टीम येणार आहे असे मोहोळ पोलिस स्टेशन वरून गुप्त खबर राजन पाटीलला देण्यात आली. त्यानंतर लगेच निम्म्या वस्तु माझ्या घरात पुन्हा आणून ठेवल्या. ते सुद्धा विडीओ शूटिंग पोलिसांकडे आहे पण त्यानी मला ते दिले नाही आमच्या कडे कोणतेही शूटिंग नाही अस माहीती अधिकार च्या पत्रानुसार सांगत आहेत.
सदर दरोडा राजन पाटील व त्याच्या दोन्ही मुलांच्या सांगण्या वरून, गावातील दलित समाजातील लोकांनी टाकल्याचा संशय मी माझ्या फिर्यादी मध्ये नमूद करून सुध्दा पोलीसांनी मुख्य संशयित सूत्रधार म्हणुन राजन पाटिल व त्यांच्या दोन्ही मुलांची नावे FIR मध्ये घेतली नाहीत. किंबहुना त्यांना प्राथमिक चौकशी करिता पोलिस स्टेशनला बोलावले नाही. फिर्यादी स्वतः माहिती देत आहे म्हंटल्यावर किमान संशयीत आरोपींचे मोबाईल लोकेशन तपासून, त्यांचे मोबाईल नंबर कॉल ट्रेसिंग करिता लाऊन, प्रथम दर्शनी पुरावा मिळवण्याचा तरी प्रयत्न करणे पोलिसांकडून अपेक्षित होते. मला सकाळी 11 ते रात्री 11असे बारा तास बसवून ठेवले परंतु मी जशी दिली तशीच्या तशी FIR नोंदवून घेतलीच नाही. परंतु राजन पटलाबरोबर तोडपाणी करण्यासाठी मी FIR देत असतानाचे व्हिडिओ शूटींग तेवढे केले. तेच व्हिडिओ शूटींग राजन पाटलांना दाखवून, त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा लागत असल्याची भीती दाखवून पोलिसांनी लाखो रुपये उकळले.
राजन पाटील व त्यांच्या मुलांची दहशत झुगारून मी महिला असून त्यांच्या अंन्याय अत्याचाराच्या विरोधात न डगमगता पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेल्यामुळे मला गावात राहणे मुश्किल झाले आहे. मुलावर खोटी केस, करणे, घरावर दरोडा टाकणे, शेतातील साहित्याची चोरी करणे, पाईप लाईन तोडणे, शेतातील मोटर गायब करणे, सालगड्याला व मजुरांना शेलात काम करू नये म्हणून धमकावणे, शेत जाळून टाकणे, घराची लाईट, पाणी तोडून टाकणे, गावातील किराणा दुकान, दूधवाला यांना धमकावून आम्हाला किराणा साहित्य व दूध देण्यास प्रतिबंध करणे, रात्री अपरात्री घरावर दगड फेकणे, असे प्रकार करून मला प्रचंड मानसिक व शारिरीक त्रास दिला जात आहे. तरीही मला गावात या ना त्या कामासाठी जावं लागलं म्हणून गावात जाण्यापूर्वी मी पोलिस संरक्षण मागत होते. त्या कारणा वरून डी. वाय.एस.पी अमोल भारती यांनी मला अरेतुरे भाषा वापरत ऑफीस मधून बाहेर काढलं माझी बेंग, मोबाईल हिसकावून घेतला. तुला अटक करतो असे बोलले. तरी मी गप्पच राहीले. याचा पुरावा माझ्या कडे आहे. ऑन ड्युटी ऑफिसरला काय बोलायचे म्हणुन मी शांत राहीले. अमोल भारती यांची तक्रार मी एस.पी ऑफीसला 23-8-2023 रोजी केली आहे. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. मी वारंवार पोलिस स्टेशनला जाते, एट्रोसीटी, जीवे मारण्याची धमकी, दरोडा सर्व तक्रारीची संदर्भाने केलेल्या तपासा बद्दल माहीती मागते तर एकही अधिकारी मला समाधानकारक उत्तरे देत नाहीत. उलट तरुण एकटी विधवा महिला असल्याने कायम लज्जास्पद वाईट वागणूक देतात. पूर्ण पोलिस प्रशासन है राजन पाटीलांचे पैसे खाऊन त्यांना वाचवण्याचे काम करत आहे. मी पोलिस स्टेशनला तक्रार साठी जात होते, 12, 12 तास बसत होते तिथे मला तिथे कशी वागणूक दिली गेली याचे तेथील सी.सी.टी.वी. सर्व कैद झाले होते. आता ते पोलिस कर्मचारी सीसीटीवी फुटेज पण मिटवून टाकलेत, मी माहीती अधिकार खाली फुटेज मागितले तर त्यानी फुटेज स्टोरेज मधून कालबाह्य झाले असे लेखी उत्तर दिले आहे. राजन पाटील यांनी माझे डीसीसी शाखा अनगर येथिल 2023 साल चे ऊसबिल बैंक प्रशासक कुंदन भोळे, सीइओः विलास देसाई, बँक इन्स्पेक्टर संजय गुंड, बैंक शाखाधिकारीः मेटकरी आण्णा, बँक मॅनेजर : भाजीभाकरे, गटसचिवः श्रीमती शैला दिक्षित असे सर्वांना हाताशी धरूनअनाधिकृत पणे अडकवून ठेवले आहे.. हया ऊसबिल संदर्भात मी सहकार आयुक्त यांना ही 30-6-2023 रोजी तक्रार करून आले.. पण कुणीच दाद देत नाही.. माझ्या मुलाच्या शाळा सोडल्या चा दाखला वर शाळेने अॅटरोसीटी चा गुन्हा त्या वर नोंद केला. शेरा दिला त्या मुळे कोणतेही कॉलेज माझ्या मुलाला अॅडमिशन देत नाहीत अस अल्पवयीन मुलाचं भविष्य खराब केल त्याला शिक्षणा पासून वंचित ठेवले, यासाठी मी बाल हक्क आयोग अध्यक्ष मुंबई याच्या कडे गेले असता त्यानी शिक्षणाधिकारीला पत्र देऊन शाळेची चौकशी करा अस सांगितलं तर तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक इतर स्टाफ तिथे येऊन आम्ही शेरा काढून देतो अस म्हणतात पण माझा मुलाचं दीड वर्षे शिक्षण बुडाले त्याला मानसिक त्रास झाला तो आता शाळा शिकायला नको म्हणत आहे तो आज 10,12 हजार रु वर कामाला जाल आहे याला कोण जबाबदार त्या शाळेवर हायकोर्टात केस टाका गुन्हा दाखल झाला करून शाळेचे ग्रांट रद्द करा असा सल्ला मला दिला बाल न्यायालय सोलापूर यांनी दिला.. पण मी ते अजून ही केल नाही कारण इतर हजार दोन हजार मुलाचं भविष्य खराब होईल म्हणुन, आज नीट परिक्षा चा घोटाळा समोर आला आहे तर किती रोज सोलापूरात मिडीयात गोंधळ सुरु आहे.. आता मिडीया द्वारे हया माझ्या मुलाच्या दाखला ची बातमी किती पसरेल. मी सगळी कडे न्याया साठी पळतेय पण राजन पाटील व त्यांच्या मुलांने सर्वांना पैशावर विकत घेतलं आहे, मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, शिक्षणमंत्री आय, जी, डीजीपी मॅडम, महीला आयोग, राज्य व केंद्रीय कडे पण निवेदन दिलं आहे. पण तिथंही माझी कुणीही दखल घेतली नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार साहेबांना मी भेटून सर्व प्रकरण सांगितले त्यांनी विधानसभा हिवाळी अधिवेशनात माझा मुद्दा तारांकित प्रश्न म्हणुन उपस्थित केला तर तो पटलावर येऊ नये म्हणून एका माजी आमदार महीलेने त्यांच्या वर दबाव टाकला व ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.. 635 हा नंबर माझ्या केस चा होता. तरी मी हार न मानता आता मानवी हक्क आयोग, पोलिस प्राधिकरण याच्या कडे तक्रारी केल्या तर त्याच्या नोटीसा पोलिस अधीक्षक यांना गेलेल्या आहेत.. सुनावणी लवकरच चालू होईल. पण तिथेही दबाव टाकला गेला तर मी नेमकं कुणाकडे न्याय मागू मला काही समजेना. राजन पाटीलाने माझ्या डोक्यावर छप्पर ठेवलं नाही, घरात एक वस्तू नाही, शेतात नुकसान केलय, ऊस बील कापून घेतलंय, गावात जाऊन राहावं तर जीव मारण्याची धमकी दिली आहे.. पोलिस काही मदत करत नाहीत, हा असाच अन्याय चालू राहीला तर मला व मुलाला आत्महत्या करावी लागेल. राजन पाटील यांच्या दहशतीमुळे आम्ही मायलेकरं एक वर्ष झालं पूणे येथे राहतोय, कष्ट करून खातोय, अन्याय अत्याचाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले असते तर मला माझे स्वतःचे गाव, घर, जमीन सोडून जाण्याची वेळ आली नसती. 28 एकर बागायती शेतीची मालकी असूनही लोकांच्या दरात कामाला जाण्याची वेळ आली नसती. माझ्या मुलाची 12वी ची परीक्षा बुडाली नसती, त्याला अर्धवट शिक्षण सोडून लोकांच्या हाताखाली नोकरी करण्याची वेळ आली नसती.
कष्ट करून स्वतःच्या हिमतीवर मुलाचे पालनपोषण करणाऱ्या एकट्या विधवा महिलेला आधार द्यायचा सोडून मोहोळच्या पोलिस अधिकाऱ्यांनी राजन पाटलाचे पैसे खाऊन माझ्यावर गाव सोडून जाण्याची वेळ आणली. माझा जगण्याचा, चरितार्थ करण्याचा अधिकार काढून घेतला. माझे मतदार यादीतील नाव गायब केले माझा मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला, स्वतंत्र भारतात माझ्या मूलभूत हक्कावर पाणी सोडावे लागण्यासाठी मोहोळ पोलिस स्टेशनचे अधिकारी जबाबदार आहेत. मी प्रहार संघटना चे अध्यक्ष बच्चु भाऊ कडू याना सर्व घटना सांगितली आहे त्यानी मला माझ्यावर झालेल्या अन्याय विरुध्द लढण्या साठी 500,600 महीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, एसपी कार्यालय व राजन पाटील यांच्या अनगर येथिल घरासमोर थाळीनाद धरणे आंदोलन करू हा शब्द दिला आहे.. त्या संबंधित चे निवेदन मी आयुक्त, अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना दिले आहे, यानी कुणी अॅकशन घेतली नाही तर मी 100% आंदोलन करणार, हे सर्व सांगण्या साठी च आज मी सर्व सामान्य एक मराठा महीला शेतकरी ही पत्रकार परिषद घेत आहे. या लोकांना अददल घडावी व समाजाला या राजन पाटील च खर रूप दिसावं
म्हणून माझी पत्रकार बंधुना विनंती आहे की, माझ्यावर चा अन्याय, माझी तक्रार व पोलिस स्टेशनला दिलेली फिर्याद सदर प्रकरणी आरोपींना सामील झालेल्या पोलिस अधिकारी कसे लाचखोर आहेत, एका आईचा अन्याया विरुद्ध चा लढा ही सत्य चालू घटनेची दखल महाराष्ट्रातील माझ्या मराठा, मुस्लिम इतर 18 पगड जातिधर्माच्या सर्व माता, बंधुभगिनी नी घ्यावी मला माझ्या या लढाईत सहभागी होऊन मला कसा न्याय मिळवून देता येईल. अशी बातमी छापून आपण पत्रकारांनी मला न्याय दयावा विनंती
आपली विश्वासू
उज्वला थिटे पाटील
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




