मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 30

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 30
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही
रमेश बिजेकर
आरक्षण आणि शिक्षणाचा घनिष्ट संबंध राहिला आहे. हजारो वर्ष
स्त्रीशुद्रातिशुद्रांना शिक्षण बंदी आणि उच्च वर्णजातींना शिक्षणाचे आरक्षण हे वर्णजातीव्यवस्थेचे फलित होते. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने अनुसुचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक समुह आणि स्त्रीयांसाठी आरक्षण अस्तित्वात आणले. हे आरक्षण सहजासहजी मिळाले नाही. राज्यघटना मसुदा समितीतील डिबेट आणि आरक्षण विरोधी आंदोलनाने विरोधी मानसिकता वारंवार पुढे येत गेली आहे. जाती व्यवस्था विरोधी फुले-आंबेडकरी आंदोलन आणि राज्यघटनेनी दिलेल्या आरक्षणाने उच्च जातीयांच्या आरक्षणाला धक्क्का बसला. ही सल उच्च जातीयांच्या मनात आजही कायम आहे. म्हणुन ते जाती आधारावर आरक्षणाला विरोध करतात व आर्थिक आधारावर आरक्षणाचा पुरस्कार करतात. आता तर ते जातीनिहाय जनगणनेला विरोध करून त्यातुन जातीव्यवस्था बळकट होण्याचा तर्क मांडत आहेत.
जातीव्यवस्थेने जाती-जातीत माणसांची विभागणी केली. जाती बंदिस्त
व्यवसाय, जातीअंतर्गत विवाह आणि जातीगत वस्त्या ही प्रमुख लक्षणे जाती व्यवस्थेची
आहेत. ब्राह्मणी व्यवस्थेने ही रचना कायम राहावी यासाठी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक भूमिका सातत्याने घेतली. जाती-जाती मधील तेढ कायम ठेऊन धर्म चौकटीत एकत्र बांधण्यास ते यशस्वी झाले आहेत. परलोकवादी धर्म संस्कृतीतुन ईहलोकांतील शोषण प्रक्रिया दडवुन ठेवल्या गेली. त्यामुळे सर्व शोषीत जातींचे हितसंबंध एक आहेत ही जाणीव शोषीत जातींची विकसित होऊ दिली नाही. रा स्व. संघाकडुन जातीचे अस्तित्वच नाकारले जाते. जातीचे अस्तित्व नाकारणे म्हणजे जाती व्यवस्थेचे समर्थन असते. हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.
फुले, शाहू आंबेडकरांनी जातीचे अस्तित्व उलगडुन दाखवुन त्यातुन मुक्तीचा मार्ग सुचवला. किमान न्याय व प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाची भूमिका त्यांनी घेतली, परंतु स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात आरक्षणाची निट अंमलबजावणी केली नाही. २०१४ नंतर आरक्षण छुप्या पध्दतीने संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. एका बाजुला सार्वजनिक व सरकारी नोकऱ्या कमी केल्या, तर दुसऱ्या बाजुला सामंती उत्पादन पध्दतीचा ढांचा कायम ठेऊन आधुनिक भौतिक लाभापासुन
उत्पादक जातींना दुर ठेवले. आपण विकासशील आहोत. हळुहळु हे लाभ श्रमिकांना मिळतील अशी खोटी आशा सत्ताधारी सतत दाखवत राहिले. भारत विकसनशील देश आहे, कृषी प्रधान आहे असे कित्येक वर्षापासून शाळा कॉलेज मध्ये शिकवल्या जात आहे. विकसनशील देशातील सामाजिक वास्तव व त्यातील अर्थव्यवस्था लेविस यांनी उलगडून दाखवली आहे. विकसनशील अर्थशास्त्राची मांडणी डक्यु आर्थर लेविस यांनी केली आहे. त्यांनी द्वैत अर्थशास्त्राची मांडणी केली. त्याच्या मते विकसनशील अर्थव्यवस्थेतुन एकाच वेळेस दौन विभिन्न अर्थव्यवस्थांचे सह- अस्तित्व असते. एक व्यवस्था आधुनिक, भांडवलप्रधान, श्रमाची उत्पादकता असलेली व म्हणुन चांगली राहणीमान देणारी, दुसरी श्रमप्रधान, मोठ्या प्रमाणात छुपी बेरोजगारी असलेली, श्रमाची उत्पादकता खुप कमी असलेली आणि म्हणून श्रमिकांचे राहणीमान कमी दर्जाची असलेली असते. लेविस याच्या मते विकासाची प्रक्रिया म्हणजे श्रमाची उत्पादकता कमी असलेल्या अर्थव्यवस्थेतुन बाहेर काढून श्रमाची उत्पादकता वाढवणा-या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणे होय. लेविसचं म्हणन भारताच्या समाज व्यवस्थेला लावुन बघितल्यास जाती व्यवस्थेचे विदारक वास्तव पुढे येते. उतरंडीच्या जाती रचनेमध्ये बलुतेदार उ अलुतेदार (दलित, आदिवासी, ओबीसी.) जाती उत्पादक (श्रमिक) राहिल्या आहेत, यांची श्रम उत्पादकता वाढावी असे अर्थ नियोजन करण्यात आले नाही. कारण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ब्राह्मणी वर्चस्त कायम राहिल्यामुळे श्रभिक जातीची उत्पादकता वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा दृष्टीकोन स्विकारला नाही. त्यामुळे श्रमिक जातीचे जीवनमान दिवसेंदिवस खालावत गेले आहे. कॉ. शरद पाटलांनी आपले लक्ष याकडे वेधलं आहे. युरोपीयन देशात सामंती उत्पादन पध्दती नष्ट करुन आधुनिक उत्पादन पध्दती स्विकारल्या गेली. त्यामुळे युरोप मधील आधुनिक व अतिरिक्त उत्पादनाचे लाभ श्रमिकांना काही प्रमाणात मिळाले. भारतात सामंती (जाती) उत्पादन पध्दती कायम ठेऊन आधुनिक उत्पादन पध्दती स्विकारत्या गेली, त्यामुळे पंरापरागत उत्पादक जाती आधुनिकतेचे व अतिरिक्त उत्पादनाचे वाटेकरी उरले नाहीत, असे शरद पाटील सांगतात, जाती व्यवस्थेच्या बळकटीकरणाची भूमिका ब्राह्मणीभांडवली सत्ताधा-यांनी सातत्याने घेतली. हे यातुन स्पष्ट होते.
भांडवली देशात श्रमाची उत्पादकता वाढण्यासाठी गुणवत्तापूर्ण विनामुल्य शिक्षण, सुदृद्ध सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व शेतीचे आधुनिकिकरण करून उत्पादकता वाढवण्याचे नियोजन केले आते. आधुनिक विचारसरणी व आधुनिक
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 30
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




