मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 27

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 27
४. भान नसलेले आंदोलन
राजाराम सूर्यवंशी
सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण हा आजचा विषय आहे आपल्या देशावर महात्मा गांधीचे अनेक उपकार झालेले आहेत त्यातला एक सर्वात मोठा उपकार आहे सत्याग्रहाचे हत्त्यार । त्या खालोखाल दुसरा उपकार आहे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा ।
सत्याग्रह म्हणजे स्वताच्या वा आपल्या समुहाच्या हितासाठी वापरावयाचे
वैयक्तिक आत्मक्लेषाचे, उपोषणाचे हत्यार ! या सत्त्याग्रह वा उपोषण आदोलनात व्यक्तीगत अभिनिवेश अधिक व सामाजिक जाणीठ कमी असते, तर सविनय कायदेभंग चळवळीत लोकांचा सहभाग असतो. या चळवळीत आत्मभान व सामाजिक भान दोन्ही असतात. टोकाचा वा अतिरेकी अभिनिवेष नसतो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंनी त्यांच्या त्यांच्या सामाजिक जीवनात टोकाच्या वा वैयक्तिक अभिनिवेषाला अजिबात थारा दिला नव्हता. त्यांचा सारा भर सामाजिक आंदोलन व लोक सहभागातून उभारलेल्या चळवळीवर होता त्यामुळे त्यांच्या चळवळीना सामाजिक भान आपोआप प्राप्त होत असे म. फुले व डॉ. आंबेडकरांनी चुकूनही वैयक्तिक सत्त्याग्रह व उपोषण केले नाही. कारण या चळवळीत सामाजिक जाणिवांना जागा नसते हे त्या गुरु-शिष्यांना पक्के ठाऊक होते.
याउलट महात्मा गांधीचा भर वैयक्तिक सत्त्याग्रह व प्राणांतिक उपोषणावर होता. येथे सारासार विवेकाला चारा नसतो. वैयक्तिक अभिनिवेश दांडगा असतो. सरकार व प्रतिपक्षाला झुकविण्याची खुमखुमी असते. पुना पॅक्ट च्यावेळी याचा अनुभव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आला होता.
आता त्याच अनुभवाची पुनरावृत्ती माननिय शिंदे सरकार व ओबीसी समाजाला येत आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात निघालेले मागील काही वर्षातील मोर्चे ही चळवळ होती. त्यात शिस्त होती, संयम होता. व दीर्घकाळ लढाई लढण्याचा मानस होता त्या मोर्चामध्ये लोकसहभाग असल्याने त्यांनी सामाजिक भान
राखले होते, ते अरी मराठा मोर्च असले तरी त्यात निम्मी संख्या ओबीसी, दलित व इतर परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची होती. कारण मराठ्यांतील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळावा ही त्यामागची मुख्य भूमिका होती. सामाजिक
न्यायाची लढाई पुढच्या टप्यावर नेणारे हे लोकशाहीप्रधान मोर्चे होते. या मोच्यांची रास्त दखल मायबाप सरकारने घेवून त्यांना केंद्र व राज्य सरकारतर्फ दहा टक्के आरक्षण देऊन त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला होता व हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, सामाजिक जाणीवक जोपासणारा महाराष्ट्र हे सिध्द्ध केले होते.
मात्र गेल्या पाच महिन्यांपासून चालवले उपोषण तंत्र व सरसकट आंदोलन ही चळवळ नाही यात सामाजिक भान नाही. हा फक्त उठाव आहे. आग्रह आहे. आमचं फक्त ऐका असा वैयक्तिक अभिनिवेष आहे तशी मानसिकता आहे. जी सामाजिक न्याय व लोकशाहीला मारक असून चळवळीला बाधक आहे. ती हुकुमशाहीप्रधान आहे. उठाव हा भावनिक असतो. व अशा कृतीमध्ये मुद्देसूदपणा नसतो, फक्त जोश असतो.
आदिवासी चळवळीमध्येही असे उठाव होते त्याला उलगुलान म्हणतात मात्र या उलगुलानमध्ये आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याची नियतकालिक कृती असते. समाज परिवर्चातनाचा अंडर करंट असतो, कारण त्यांच्या जन्म चळवळीतून झालेला असतो.
मात्र उठावांमध्ये स्वतःचे म्हणण तेवढ ठासून मांडता येते. समोरच्याची व शासनाचीही दुसरी बाजू असते हे त्यांना मान्य नसते. अशा उठावांना काही कारणांनी समोरच्यांच्या समोर जेव्हा नमतं घ्यावं लागतं, तेव्हा त्यांची चिडचिड होते. त्रागा होतो. सद्या या बाबींचा अनुभव सारा महाराष्ट्र व उभा देश घेत आहे. इतिहासातील काही उठातांचे व अशाप्रकारच्च्या अभिनिवेषी आंदोलनांचे
तटस्थ अवलोकन केल्यावर आपल्या लक्षात येते की, यातील काहींना आंदोलनाचा
प्रारंभ बरोबर जमत होता. मात्र कुठे थांबायचं हे कळत नव्हते. अशा उठावदार
आंदोलनातून समाज परिवर्तन झालेच नाही. उलट समाज व आआंदोलनकर्ते मात्र अधिक कर्मठ बनत गेलेत. यांच्याही काही मागण्या रास्त व विधाने सुसंगत असतात, मात्र त्या बिनतोड नसतात. त्यांच्या मागण्या व विधानांना तोडीस तोड उत्तरं मिळू लागली की मग फार काळ त्यांना टिकाव धरता येत नाही. तेव्हा त्यांचा तोल जातो.
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 27
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


