सोशल

*सत्यशोधकाचे अंतरंग

*सत्यशोधकाचे अंतरंग
*
इंगळे

बावननाथ रामनाथ

 

बावननाथ रामनाथ इंगळे (मास्तर) हे मौजे तेल्हारा (ता. अकोट), जि. अकोला येथील सत्यशोधक होत. त्यांची १ जानेवारी १९३४ रोजी ‘दैनकैवार’ शीर्षकाची दहा पृष्ठांची एक पद्य पुस्तिका रॉयल प्रेस, अकोला येथून प्रकाशित झाली आहे. प्रस्तुत पद्यात भारतीय शेतकरी आणि मजुरांच्या हलाखीचे वर्णन करण्यात आले आहे. भारतीय शेतकरी आणि मजूर कंगाल का आहेत? या बाबीचाही या काव्यसंग्रहात शोध घेऊन नोकरशाही आणि भांडवलशाही अनेक शतकांपासून शेतकरी आणि शेतमजुरांचे शोषण करीत असल्याचे म्हटले आहे. संदर्भ-दैनकैवार-बी. आर. इंगळे (मास्तर)

इंगोले

शंकरराव बळीराम

(२६-११-१९१६-२३-८-१९८)

विदर्भातील बिनीचे सत्यशोधक पंजाबराव देशमुख, वीर उत्तमराव मोहिते, दौलतराव गोळे आदींचे सत्यशोधक सहकारी शंकरराव बळीराम इंगोले ऊर्फ बाबूराव इंगोले यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९१६ रोजी नांदोरा (गवळ्या) तालुका आष्टी, जिल्हा वर्धा येथे झाला. मोर्शी येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण इवल्यावर नागपूर विद्यापीठातून ते बी.ए., बी. टी. (बी.एड्.) झाले. पुढे त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. दरम्यान, मोर्शी येथील सत्यशोधक श्यामराव गुंड यांच्या सहवासात ते आले. पुढे अमरावती येथील सत्यशोधक पंजाबराव देशमुख, वीर उत्तमराव मोहिते यांनी ‘भगवा झेडा’ चित्रपटाविरुद्ध निषेधाची जंगी मिरवणूक काढली, ही मिरवणूक सफल करण्यात शंकरराव इंगोले यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या निषेध मिरवणुकीमुळे पंजाबराव देशमुख, काशीनाथ बापू देशमुख, श्यामराव गुंड, उत्तमराव मोहिते, शंकरराव इंगोले आदी सत्यशोधकांचा विदर्भात सत्यशोधक म्हणून नावलौकिक झाला,

सत्यशोधकांचे अंतरंग / २८

पुढे एप्रिल महिन्यात (१९४०) वीर उत्तमराव मोहिते यांनी चालत्या ‘भगवा झेडा’ चित्रपटाचा पडदा भल्या मोठ्या सुज्याने आरपार फाडल्य. या प्रकरणी शंकरराव इंगोले आणि अमरावतीचे सर्व सत्यशोधक मीहित्यांच्या पाठीमागे

पोलादी भिंतीप्रमाणे उभे राहिले, शंकररावांनी आष्टी परिसरात सत्यशोधक तत्त्वज्ञानावर अनेक व्याख्याने दिली. अनेक ठिकाणी सहमीजने आयोजित केली. अनेक विहिरी अस्पृश्यांना खुल्या केल्या. पुरोहिताविना अनेक सत्यशोधकी विधी संपत्र केले, कन्या सुलचाचा विवाह सत्यशोधकमते लावला. शंकरराव इंगोले हे अमरावती येथील ‘फूले विचारक प्रसारक मंडळाचे सदस्य होते. अशा या सत्यशोधकाने २३ ऑगस्ट

१९९८ रोजी गाडगेनगर, अमरावती येथे निधन झाले.

उगले हरी

गोविंद पाटील

(जन्म सुमारे १८७६- मृत्यू १९४९)

मौजे जोपूळ, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील हरी गोविंद पाटील उगले हे सत्यशोधक असून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ सत्यशोधक गणपतराव दादा भोरे यांचे ते जवळचे नातेवाईक होते. त्यांचा जन्म सुमारे १८७६ सालचा असून त्यांचे इयत्ता मराठी सातवीपर्यंत शिक्षण झालेले होते. सत्यशोधक गणपतराव दादा मोरे एका प्रसंगी सत्यशोधक फौजदार डो. आर. भोसले यांना घेऊन जोपुळास आले. भेटीगाठीनंतर जोपुळातील खंडेराव गोपाळ पाटील उगले आणि हरी गोविंद पाटील उगले यांना सत्यशोधक तत्त्वज्ञान समजावून सांगितले. बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सत्यशोधक होण्याची गळ घातली. या प्रसंगी हरी गोविंद आणि खंडेराव उगले यांनी सत्यशोधक समाजाची दीक्षा घेतली. दोघे आजन्म सत्यशोधक राहिले,

पुढे १९१४ मध्ये गणपतराव मोरे यांनी सत्यशोधक जलसा उभा केला. या जलशाचे हरी गोविंद पाटील हे एक हरहुत्ररी कलावंत होते. या जलशाला धान्याच्या स्वरूपात गावकरी मदत करत असत. गोळा झालेले हे धान्य त्वरित

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button