अशिक्षित जामनेर अज्ञान अंधश्रद्धा मजुराचे केंद्र!

अशिक्षित जामनेर अज्ञान अंधश्रद्धा मजुराचे केंद्र!
जामनेर का खराब झाले?
जामनेर तालुक्यातील बहुजन हे शेती करतात.शेतीतून जेमतेम उत्पन्न मिळते.बारा महिने राबूनही जेमतेम पोट भरते.शेतकरी जमीनीचे मालक आहेत.पण गरीबीत खितपत पडलेले आहेत.येथे कुणबी, मराठा आणि वंजारा समाज मोठा आहे.पण यात शिक्षणाचे प्रमाण इतर तालुक्यातील तुलनेने कमी आहे.या लोकांना महसूल, भुमि अभिलेख, पोलिस, ग्रामपंचायत, नगरपालिका,कोर्ट यातील कायद्याचे ज्ञान कमी आहे.म्हणून त्यांची आर्थिक लुटमार जास्त होते.एका शेतकऱ्याची जमीन मोजायला सरकारी दराने चार हजार रुपये लागतात.तेथे चाळीस हजार खर्च होतात.असा माझा अनुभव आहे.तरीही दोन तीन वर्षे हेरझारा घालाव्या लागतात.याची तक्रार मी स्वतः शेतकऱ्यांना सोबत घेऊन यांचेच आमदार गिरीश महाजन यांना भेटून केली.महाजन यांनी या कामी काडीमात्र मदत केली नाही.पांच मिनिटे भुमि अभिलेख कार्यालयात आले नाहीत.का?याची कारणे शोधली पाहिजे.मी तर शोधून जाहिर करतोच.शेतकरी लुटले गेले आणि महाजन श्रीमंत कसे झाले?हे गणित जामनेरच्या लोकांना कधी कळलेच नाही.कोणी शिकवलेच नाही.मतदार कंगाल आणि आमदार मालामाल कसा झाला?डोके चालवले पाहिजे.
जामनेर तालुक्यातील मराठा , कुणबी, वंजारा समाजातील काही कार्य असले तर कोणीतरी गावात दारूचे ड्रम भरून ठेवतो.तरूण मुले पाणपोई सारखे येतात आणि पितात.मेंदूंचा सत्यानाश करवून घेतात.या मुळे पोटा पाणी शिवाय दुसरे काही सुचतच नाही.काही लोकांचे मेंदू विचार करू लागले तर त्यांना गोद्री सारखे मेळावे भरवून वेडे केले जाते.हा मेळावा भरवून किती लोक नरकात जाणारे होते,ते आता स्वर्गात जाणार आहेत?किती तरूणांना कामधंदा, नोकरी मिळणार आहे?असा विचार करायला मेंदू रिकामा तर पाहिजे.तो जर आधीच बधीर करून ठेवला तर मग दुसऱ्याच्या विचाराने चालावे लागते.त्या विचारांची उधारी म्हणजे राजकीय दुकानदारी.आता या दुकानातील गिऱ्हाईक हुषार झाला पाहिजे.तो शुद्धीवर ठेवला पाहिजे.पण हे दुकानदार त्याला शुद्धीवर येऊ देत नाहीत.
जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची या आर्थिक स्थितीचा गैरफायदा इतर ठिकाणचे धनवान घेत आहेत.या तालुक्यातील शेती पड्या दराने घेत आहेत.हे चालू राहिले तर जामनेर तालुका हा फक्त मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जाईल.
दारूमुळे दिमाग खराब झाला.भुकेने माणूस लाचार झाला.तर असा माणूस पशु सारखा वागतो.त्याला माय बहिण मुलगी असा काहीच फरक कळत नाही.त्याचा हा परिणाम आहे.म्हणून वारंवार असामाजिक,अनैतिक प्रकार घडत आहेत.याला पोलिस आणि न्यायाधीश शिक्षा तर देतीलच पण हा प्रकार थांबवू शकत नाहीत.एक झाले कि दुसरे ,दुसरे झाले कि तिसरे.चौथे.गुन्हेगार पळाला आणि पब्लिक पोलिस मधे वाद झाला.
जामनेर तालुक्यातील आज रोजी अनेक कुटुंबे गावात घर नाही म्हणून जंगलात झोपडी बनवून राहात आहेत.यांना घरकुल दिले पाहिजे.वस्तीत राहायला दिले पाहिजे.अशी विनंती मी त्या महिलांना घेऊन गिरीश महाजन,बीडीओ इंगळे यांचेकडे घेऊन बोललो.महाजन हेच ग्रामविकासमंत्री असूनही त्यांनी लक्ष दिले नाही.काय उपयोग,आपला आमदार मंत्री बनून?उद्या याच महिलांवर अत्याचार झाला तर महाजन जातील रडायला.हे चांगले नाही.
मला वाटते हा बौद्धिक ,सामाजिक, नैतिक दोष आहे.तो आपणच घालवू शकतो.कोणत्याही कार्यात दारू आणू देऊ नये.मुलांना दारू पासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे.त्यासाठी आई बाबांनी सुद्धा काही बंधने पाळणे आवश्यक आहे.घर,शेती, लग्न व्यवहारात नैतिकतेचे पालन करणे आवश्यक आहे.जे त्याचे आहे ते त्याला देणे आवश्यक आहे.माझे शेत ही माझेच.शेजाऱ्याचेही माझेच.अशी प्रवृत्ती जामनेर तालुक्यात जास्त आहे.प्रबुद्ध,पुरखे ग्रामस्थांनी यांचा न्यायनिवाडा गावातच केला पाहिजे.तरूण ,तरूणीवर चांगले संस्कार करण्यासाठी स्वतावर संस्कार करवून घेतले पाहिजे.सत्य,सभ्य, सज्जन, न्यायी माणसाला नेता मानले पाहिजे.जो दारू देतो तो नेता नसतोच.तो चोरी करून आणतो म्हणून देतो.त्याचा तिरस्कार केला पाहिजे.
मी जामनेर तालुक्यातील अनेक गांवात गेलो.मला खूप चुकीचे आढळले.कोणी सरपंच ने गावठाण विकून टाकली. कोणी अतिक्रमण करून रस्ता बळकावला.कोणी शेजारी शेतकऱ्यांची जमीन बळकावली.कोणी कोणाच्या आंदोलनात कार घुसडली.हे चांगले वर्तन नाही.परिणाम वाईट होत आहेत.ही चूक ईश्वराची नाही.ही चूक माणसांची आहे.आपली चूक आपण दुरूस्त करू शकतो.केली पाहिजे.तरच गाव गराडा टिकेल.आई, बहिणी,मुली सुरक्षीत राहातील.आणि तुम्ही आपण सुद्धा!
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


